उन्हाळ्यामध्ये थंड वाटण्यासाठी ताकाचे सेवन केले जाते. इतर कोल्ड्रिंक्स पेक्षा ताक पिणे कधीही चांगले !!!! साधारणतः ताक सकाळी नाश्त्याच्या वेळी दुपारी जेवताना किंवा जेवणानंतर केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का ? उपाशीपोटी ताक पिण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होत असतात. तेच आपण या लेखामधून बघणार आहोत.
उपाशी पोटी ताक पिण्याचे फायदे –
१. उपाशीपोटी ताक पिल्याने पचनक्रिया मजबूत बनते. पचन संस्थेला मजबूत करण्याचे काम ताक करते.
२. ताकामध्ये सुंठ पावडर मिक्स करून उपाशीपोटी घेतल्याने व त्याचे पोटदुखी दूर होते.
३. उपाशीपोटी ताक हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचाही काम करते. पोटाच्या आतल्या भागामध्ये असे काही पदार्थ असतात, जे पोटाच्या आतल्या भागाला नुकसान पोहोचवू शकतात. अशा हानिकारक पदार्थांना बाहेर काढण्यात काढून टाकण्यासाठी ताक उपयुक्त ठरते. त्यासाठी ताकामध्ये जिरं, काळीमिरी पावडर आणि कढीपत्ता बारीक करून मिक्स करावे. यामुळे पोटातील अनावश्यक घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते.
४. उन्हाळ्यामध्ये शरीराला डीहायड्रेशन चा प्रॉब्लेम होतो. ताकामध्ये मीठ मिक्स करून प्यायल्याने dehydration चा प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते.
५. उपाशी पोटी ताक पिणे हे जुलाबा मध्ये देखील खूप उपयुक्त ठरते. ताकामध्ये सुंठ पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने जुलाब दूर होण्यास मदत होते.
६. वजन नियंत्रणात ठेवण्यातही ताक मदत करते. सकाळी उपाशी १ ग्लास ताक प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते अशामध्ये व्यक्ती कमी जेवण करतो. आणि त्याला योग्य ते पोषक तत्वे आणि ऊर्जाही मिळते.
७. उपाशीपोटी ताक पिणे हे त्वचेला चमकदार बनवण्याचही काम करते. त्वचेसाठी आवश्यक पोषक तत्त्वे यामध्ये असतात.
८. शरीरातील vitamin D ची कमी ताकामध्ये काळीमिरी टाकून घेतल्याने दूर होण्यास मदत होते. त्यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत राहण्यास मदत होते.
९. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक मदत करते. तसेच उपाशी पोटी ताक पिल्याने ऍसिडिटी ची समस्या दूर होण्यातही मदत होते.
१०. उपाशी पोटी ताक पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन सारखे पौष्टिक पदार्थ कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम दूर करण्यास उपयुक्त असतात. म्हणून उपाशीपोटी नियमितपणे ताकाचे सेवन जरूर केले पाहिजे. पण हे प्रमाणातच घेणे जरुरी आहे कारण जास्त प्रमाणात घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढूही शकते.
ताक घेत असाल तर या गोष्टींची काळजी जरूर घ्या –
जर तुम्हाला सर्दी, दमा, ब्लडप्रेशर, डायबिटीस चा त्रास असेल वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, पित्ताचा त्रास असेल तर अशावेळी ताक पिताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असतं. नाहीतर ताकाचे फायदे मिळणे ऐवजी त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात चला तर मग बघूया कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.
⇒ दही किंवा ताक वापरताना ते खूप जास्त आंबट नसावे. दही ताक जेवढे जुनं होत जात तेवढं ते आंबट होत जातं. आयुर्वेदानुसार असे आंबट ताक किंवा दही घेतल्यास घशामध्ये दुखणं, दाताच्या समस्या जसे सेन्सिटिव्हिटी जाणवणे असे त्रास होऊ शकतात. म्हणून जास्त आंबट ताक घेणे टाळले पाहिजे.
⇒ फ्रिजमध्ये ठेवलेलं ताक पिणे आपण टाळलं पाहिजे. टाके थंड प्रकृतीचे असते आयुर्वेदानुसार ते वात पित्त कफ तिने दोष कमी करणारे असते पण फ्री मध्ये ठेवलेले ताट हे वात पित्त कफ दोष कारक म्हणजे वाढवणारे बनते. त्यामुळे तो आजार आहे ( पित्त) तो वाढण्याचा संभव असतो. सारखा आजार होण्याची शक्यता असते. फ्रिज मधलं ताक हे वजन वाढवण्याचे काम करते.
⇒ ताकाचं हे सेवन दुपारी करावं. सूर्यास्त नंतर ताक पिण्यात आले पाहिजे. ताकाचे सेवन तुम्ही दुपारी जेवणाच्या थोडा वेळ अगोदर जेवताना मधून मधून किंवा जेवण झाल्यानंतर देखील करू शकता.
समारोप –
मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण उपाशीपोटी ताक पिण्याचे कोणते फायदे आपल्या शरीराला होत असतात ते बघितले. उन्हाळ्यामध्ये तर टाक हे आपल्या शरीरासाठी अमृताप्रमाणे काम करते. कारण ते आपल्या शरीराला सोबतच थंड ही ठेवते. पण ते प्रमाणातच घेणे हे तितकेच गरजेचे आहे. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!