उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती आहेत ? त्यावर उपाय काय करावेत ?

आपल्याला कधीतरी उचकी ही लागत असते. उचकी लागल्यावर आपण कुणीतरी आठवण केली असेल असं म्हणतो. आणि ही लागलेली उचकी थांबवण्यासाठी पाणी पिणे, श्वास थांबून ठेवणे असे अनेक उपाय केले जातात. सामान्यतः उचकी ही फार फार तर पाच ते दहा मिनिटांपर्यंत राहते. त्यानंतर आपोआप बंद होते. पण काही वेळा 24 ते 48 तासांपर्यंत उचकी राहू शकते. अशावेळी उचकीमुळे खूप त्रास होतो, डोकं दुखते, घसा दुखू लागतो, पोट आणि पाठही दुखायला लागते. त्यावर आपण सोपे उपाय करून ती थांबवू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती आहेत ? या लेखाच्या माध्यमातून आपण उचकी लागणे म्हणजे नेमके काय आणि उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती आहेत ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवातीला बघूया आपल्याला उचकी लागते तेव्हा नेमकं काय होतं.
उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती आहेत ? त्यावर उपाय काय करावेत ?

उचकी लागणे म्हणजे नेमकं काय ?

आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये एक पडदा असतो त्याला श्वासपटल (डायफ्राम) असे म्हणतात. हा स्नायूंनी बनलेला असून आपल्या श्वास घेण्यामध्ये आणि सोडण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा हा डायग्राम पोटाच्या दिशेने जातो त्यामुळे आत मध्ये येणारे हवा फुफुसांमध्ये जाते. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा हा डायग्राम फुफुसाच्या दिशेने येतो आणि फुफुसातली हवा तोंडामार्फत बाहेर जाते. ही क्रिया घडत असताना डायग्राम चे स्नायू काही वेळा अचानकपणे आकुंचन पावतात. अशावेळी आपल्या गळ्यामध्ये जास्त प्रमाणात हवा प्रवेश करते. त्यावेळी आपले शरीर ही हवा शरीरामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आपल्या गळ्यातील स्वरतंतू एकमेकांच्या जवळ येतात आणि हीक असा विशिष्ट आवाज होतो त्यालाच आपण उचकी येणे असे म्हणतो.

उचकी लागते तेव्हा नेमकं काय होतं ते आपण बघितले. ही उचकी लागण्याची नेमकी कारणे कोणती कोणती असू शकतात ते आता आपण बघू.

उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती ?

⇒ अन्ननलिका, जठर, किंवा घश्याच्या आतील भागातील सुज आल्यानेही उचकी लागू शकते

⇒ यकृताला सूज आल्यामुळेही उचकी लागते

⇒ घाई घाई मध्ये जेवण केल्यामुळे.

⇒ खूप तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे.

⇒ कार्बोनेटेड पेय (cold drink ) पिल्याने.

⇒ जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे.

⇒ हवा घेणे तसेच चिंगम खाताना किंवा धूम्रपान करताना हवा पोटात गेल्यामुळे उचकी लागू शकते.

⇒ जास्त प्रमाणात हसल्यामुळे ही उचकी लागू शकते.

⇒ मानसिक ताण किंवा चिंता केल्यामुळे.

⇒ इन्फेक्शन काही विषारी घटक शरीरामध्ये पसरून त्याचा परिणाम किडनी लिव्हर वर झाल्यामुळे ही उचकी लागू शकते.

⇒ बऱ्याच वेळेला उचकी लागण्याचं नेमकं कारण समजून येत नाही. म्हणजे अनेकदा आपल्या लागलेल्या उचकीचे नक्की कारण कोणते आहे हे समजत नाही.

अशी उचकी लागल्यावर आपण काही उपाय करून ती थांबवू शकतो चला तर मग बघूया उचकी लागल्यावर करण्यासाठी काही सोपे उपाय.

उचकी थांबवण्यासाठी सोपे उपाय –

⇒ उचकी लागल्यावर करता येते असा सर्वात सोपा उपाय म्हणजे शांत आणि दीर्घ श्वास घ्या. असे काही क्षण केल्याने बऱ्याचदा उचकी थांबते.
⇒ चमचाभर मधामध्ये लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण खाल्ल्याने उचकी थांबण्यास मदत होते.
⇒ थंड पाणी तोंडामध्ये घ्या आणि ते हळूहळू करून गिळा यामुळे हे उचकी थांबण्यास मदत होते.
⇒  धने जिऱ्याचा काढा मुळे ही उचकी थांबते.
⇒ आल्याच्या रसामध्ये थोडं सैंधव मीठ आणि थोडं मध टाकून हे चाटण थोडं थोडं चाटल्यामुळेही उचकी मध्ये आराम मिळतो.
⇒शहाळ्याचे पाणी पिल्याने ही बऱ्याचदा उचकीचा त्रास कमी होतो.
उचकी लागल्यावर कानात बोटे घालून श्वास रोखून धरावा आणि श्वासाची लय बदलावी आरामशीर श्वास घ्यावा यामुळे बऱ्याचदा उचकी थांबते.
व्यक्तीला उचकी एका मिनिटांमध्ये ५ ते ६ वेळा किंवा ५० ते ६० वेळा पर्यंत येऊ शकते. आणि ही उचकी काही वेळा पर्यंत राहून नंतर आपोआप बंद होते. तुम्हाला जर 48 तासांपेक्षा जास्त काळ उचकीचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. जास्त प्रमाणात उचकी येणे हे काही आजारांचे लक्षण असू शकते जसे अन्ननलिकेचे विकार, निमोनिया, युरेमिया, आतड्यांचे रोग, यकृताचा कर्करोग इत्यादी.

समारोप –

मित्रांनो आज या लेखांमध्ये आपण उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे कोणती असू शकतात याबद्दल माहिती घेतली. सोबतच उचकी थांबण्यासाठी काही सोपे उपायही बघितले. तुम्हालाही उचकीचा त्रास होत असेल तर या  उपायांनी ही थांबायला नक्की मदत होईल. अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

FAQs – 

Q1 उचकी लागल्यास काय करावे?

Ans  – उचली लागल्यावर सर्वात आधी आपला श्वास काही वेळ थांबून ठेवावा आणि मग दीर्घ श्वास घ्यावे याने उचकी थांबायला मदत होते. थंड पाणी तोंडात भरून मग हळू हळू हे पाणी प्यायल्याने उचकी बंद होण्यात मदत होते .

Q2 उचकी लागण्याचे कारण काय आहे?

Ans  – उचकी लागण्याची कारणे –

  • यकृताला सूज आल्यामुळे,
  • अन्ननलिका, जठर, किंवा  घश्याच्या आतील भागातील सुज आल्याने,
  • जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे.
  • जास्त प्रमाणात हसल्यामुळे.
  • इन्फेक्शन काही विषारी घटक शरीरामध्ये पसरून त्याचा परिणाम किडनी लिव्हर वर झाल्यामुळे.
  • मानसिक ताण किंवा चिंता केल्यामुळे.

Q3 अल्कोहोलमुळे हिचकी का येते?

Ans  – अल्कोहोल जोराने प्यायल्याने पोटाच्यास्तरांना आणि अन्ननलिकेला त्रास होऊ शकतो आणि डायफ्रॅम लात्रास झाल्यामुळे उचकी येऊ शकते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top