मित्रांनो स्वागत आहे तुमचं, आरोग्य मंत्र २४ वर !!! ताप हा आपल्याला अधून मधून येतच असतो. ताप हा वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतो. सामान्यतः जेव्हा आपल्या शरीराचे तापमान जास्त होते त्याला आपण ताप असे म्हणतो. आज आपण ताप येण्याची कारणे कोणकोणती असू शकतात ? याबद्दल जाणून घेऊ. त्यासोबतच मी तुम्हाला ताप म्हणजे नक्की काय ? ताप आल्यावर तुम्ही घरीच कोणती काळजी घ्याल ? आणि ताप असल्यावर तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता हे पण सांगणार आहे. म्हणून लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. ताप हा नेहमीच चिंता करण्यासारखा असतो असं नाही. बहुतेकवेळा ताप हा आपल्या शरीरातील virus वगैरेंना मारायला मदत करत असतो. त्याबद्दल सविस्तरपणे लेखामध्ये पुढे बघूच. आता सुरवातीला आपण बघू ताप म्हणजे नक्की काय असतो ते.
ताप म्हणजे काय ??
वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्या शरीराचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा जास्त होते त्याला आपण ताप आला असे म्हणतो . आपल्या शरीरावर जेव्हा व्हायरस आणि बॅक्टरीया चा हल्ला होतो तेव्हा त्यांच्यावर प्रतिहल्ला म्हणून आपली immunity system activate होते आणि आपल्या शरीराचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे अनेकदा बहुतांश व्हायरसचा नाश होतो. म्हणूनच ताप येणे हे नेहमीच वाईट आहे असे नाही. हे एका दृष्टीने आपल्या फायद्याचेच आहे. आणि तो आपल्या immunity system चा एक भाग आहे हे तुम्हाला आता समजले असेलच. त्यामुळे सुरवातीला हे आपण positively घेतलं पाहिजे.
पण जर हा ताप १०२ डिग्री पेक्षा जास्त असेल आणि २-३ दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला तरी कमी होत नसेल आणि तापासोबत अंग दुखणे, डोके दुखणे, डोळे जळजळणे, थकल्यासारखे वाटणे यांसारखे त्रास जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे.
ताप येण्याची कारणे कोणकोणती असू शकतात ?
छोट्या आजारापासून ते मोठ्या रोगापर्यंत ताप येण्याची खूप करणे असू शकतात. जसे अनेक प्रकारचा जंतू संसर्ग , मलेरिया , वेगवेगळे इन्फेकशन्स तापाची काही संभाव्य करणे आपण खाली बघुयात –
- ताप हा एक आजार नसून आपल्या शरीरातील बिघडलेली यंत्रणा दाखवणारे एक लक्षणच आहे.
- व्हायरल किंवा बॅक्टरीयल इन्फेकशन्स – कोणतेही व्हायरल किंवा बॅक्टरीयल इन्फेकशन्स जसे कान,
- घशाचे इन्फेकशन, स्किन इन्फेकशन, लिव्हर इन्फेकशन, जठार आतड्यांचे विकार यामुळे सुद्धा ताप येऊ शकतो.
- तसेच टीबी, मलेरिया, डेंग्यू , चिकनगुनिया, टायफॉईड यामध्ये पण मुख्यतः ताप येत असतो. सर्दीमध्ये पण तुम्हाला कधी कधी ताप येत असतो.
- काही साथीचे आजार जसे स्वाईन फ्लू यामध्येही ताप येत असतो.
- कधी थकवा किंवा वातावरणातील बदलांमुळेही ताप येऊ शकतो.
- तीव्र उन्हात जास्त वेळ काम केल्यामुळेही ताप येऊ शकतो.
- घटक ट्युमर मध्ये तसेच काही लसीकरण जसे टिटेनस, डीपथिरिया, न्यूमोकोकल लास यामुळेदेखील लहान मुलांमध्ये ताप येऊ शकतो.
ताप आल्यावर कोणती काळजी घ्याल ??
⇒ जस मी वर सांगितले ताप हा आपल्याला एक प्रकारे चांगल्यासाठीच येत असतो. म्हणून लहान मुलांना ताप आला तर लगेच घाबरून जाऊ नका.
⇒ आपलं तर ठीक आहे पण लहान मुलांना ताप आला तर आपण लगेच पॅनिक होऊन जातो. आणि मुलांना जाड कपडे, स्वेटर वगैरे घालून देतो. पण यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अजून वाढते आणि त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागते.
⇒ अशा वेळी मुलांना किंवा तुम्हाला ताप असेल तर तुम्ही पण मोकळे सुती कपडे घाला. फॅन वगैरे एकदम बंद करून ठेऊन नका. नॉर्मल तापमान असू द्या. त्यामुळे शरीराचे तापमान हळू हळू कमी होण्यास मदत होईल.
⇒ नेहमी लक्षात ठेवा , ताप हा १०३ डिग्री / १०४ डिग्री होत नाही आणि तापामध्ये दिसून येणारी इतर लक्षणे जसे डोके दुखणे गाळून गेल्यासारखे वाटणे, अंग दुखणे , लहान बाळ असेल तर ते किरकिर करते, सतत रडत राहणे असा त्रास जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत ताप हा आपल्यासाठी फायदेशीरच असतो.
⇒ पण जर ताप हा ४ – ५ दिवसांपेक्षा जास्त आहे आणि इतर लक्षणे दिसून त्रास पण जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जरूर दाखवलेच पाहिजे.
मित्रांनो ताप येण्याची कारणे कोणती असू शकतात हे आपण बघितले. ताप आल्यावर कोणती काळजी घ्यावी हे पण जाणून घेतले आता आपण बघूया ताप असल्यास कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतील ते.
ताप आल्यावर करत येतील असे घरगुती उपाय –
⇒ घरी जर थर्मामीटर असेल तर तापमानाची नोंद ठेवा.
⇒ तापमधेय तुम्ही आपल्या शरीराला hydrate ठेवले पाहिजे. म्हणून जास्त पाणी प्या. तामध्ये आपले तोंड खराब होते, तोंडाची चव जाते काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. पण भरपूर पाणी हे आपण प्यायलाच हवे यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते आणि शरीराचे तामण कमी होण्यास मदत होते.
⇒ थकवा आणि तापमान बदलामुळे जर तुम्हाला ताप आला असेल तर भरपूर झोप आणि आरामाने तुम्ही लवकर बरे व्हाल. तापमध्येच नाही तर कोणत्याही आजारामध्ये मनाला आणि शरीराला योग्य आराम मिळाल्यावर तब्येत लवकर चांगली होते.
⇒ तसेच जास्त तापामध्ये तुम्ही cold sponging म्हणजे पूर्ण शरीर तुम्ही गर पाण्याने पुसून काढू शकता. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
⇒ याशिवाय तुम्ही पॅरासिटामोलची ५०० gm ची एक गोळी दार सहा तासांमधून एकदा घेऊ शकता. ६ ते १२ वर्षपर्यंतच्या मुलांनाअर्धी गोळी देऊ शकता.
⇒ पण दुसरे कोणतेही औषध डॉक्टरच्या सल्य्याशिवाय घेऊ नका.
समारोप –
तर मित्रांनो या लेखामध्ये आपण तो म्हणजे काय हे समजून घेतले नंतर ताप येण्याची करणे कोणकोणती असू शकतात ? ती बघितली आणि मग ताप आल्यावर करण्यासाठीचे काही घरगुती उपाय पण बघितले. हा लेख वाचल्यावर तुम्हला समजले असेल कि ताप आल्यावर प्रत्येकदा पॅनिक होण्याची गरज नाही त्याच्या लक्षणांवरून आपण काय असेल ते ठरवू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटलं ते मला खाली कंमेंट नक्की सांगा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही जाणून घ्यायला मला खूप आवडेल. अधिक आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा जरूर भेट द्या. तोपर्यंत मला राजा द्या. हा लेख वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
FAQs
Q1. ताप कमी करण्यासाठी काय करावे?
Ans – जास्त तापामध्ये तुम्ही पूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढू शकता.
तापामध्ये तुम्ही कोणतेही काम करणे टाळले पाहिजे भरपूर झोप घ्या आराम करा. याने तुमच्या शरीर ताजेतवाने होईल आणि तुम्ही लवकर बरे व्हाल.
Q2. ताप येण्याची कारणे कोणती?
Ans – कोणत्याही प्रकारच्या इन्फेकशन मुळे ताप येऊ शकतो. जसे कि सर्दीन्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, क्षयरोग, सायनसचे इन्फेकशन मुळे तसेच थकव्यामुळे, हवामान बदलामुळे किंवा जास्त वेळ तीव्र उन्हात काम केल्यामुळेही ताप येऊ शकतो.
Q3. माझे तापमान 104 असल्यास मी काय करावे?
Ans – १०४ डिग्री ताप असल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवणे उत्तम राहील. खूप जास्त ताप तुम्ही जास्त वेळ राहू देऊ नका. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. ताप हा मेंदूत जाण्याचीही शक्यता असते.
Q4. तापाचे प्रकार किती आहेत?
Ans – तापाचे वेगवेगळे प्रकार असतात –
- थंडी वाजून येणार ताप
- विशिष्ट वेळेमध्ये येणार ताप
- अंगात मुरलेला ताप
- येत जात राहणारा ताप
Q5. एखाद्या प्रौढ व्यक्तीने तापासाठी रुग्णालयात कधी जावे?
Ans – प्रौढ व्यक्तीने साधारणतः १०३ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त ताप असल्यावर डॉक्टरकडे जावे.
Q6. जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्ही उबदार राहावे की थंड? Ans – जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा कंफर्टेबल वाटेल असे आसपासचे तापमान ठेवायला पाहिजे आणि थंडी वाजत असल्यास एखादे स्वेटर किंवा शाल अंगावर घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला तापामध्ये एकदम जास्त तापमान कार्याचे नाहीये.
Q6. जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा याचा अर्थ काय होतो ?
Ans – ताप आला असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान हे नेहमीच्या वाढलेले असते. कधी हे तापमान १०४ किंवा त्यापेक्षा जास्त होते.
Q7. आपण ताप उपचार करावा?
Ans – कमी ताप असेल आणि काही त्रास जाणवत नसल्यास उपचाराची काहीच आवश्यकता नाहीये. हा ताप त्याम्च्या विरस बॅक्टरीयांना मारण्याचे काम करतो. १०२ डिग्री च्या वरील ताप असेल आणि सोबत त्रास पण जाणवत असेल तेव्हा उपचार करण्याची गरज असते.
Pingback: हि आहेत लिव्हरवर सूज येण्याची कारणे, लक्षणे आणि करा हे घरगुती उपाय