पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असते. हे आपण आपल्या मोठ्यांकडून ऐकत आलो असतो. पण तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्यामुळे नक्की कोणते फायदे होतात याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. तेच आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यासोबतच आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी कसे आणि किती प्रमाणात प्यावे हे देखील बघणार आहोत.
आपल्या शरीरामध्ये आयन कॅल्शियम मॅग्नेशियमचे अनेक धातू असतात त्यांची शरीराला गरज असते त्यातील तांब्या आपल्या शरीरात असणाऱ्या मायक्रो मिरल आहे म्हणजे याची शरीराला कमी प्रमाणात गरज असते. जरी याची शरीराला कमी गरज असली, तरी या धातूचे शरीराला होणारे फायदे भरपूर प्रमाणात आहेत.
तांब हा धातू आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. त्यामुळे तो आपल्याला बाहेरून फळभाज्या फूड मधून घ्यावा लागतो. आणि फळभाज्या आणि इतर अन्ना मधून हे शरीराला कमी प्रमाणात मिळतं किंवा absorb होतं. जेव्हा पाण्यामधून आपण हा धातू घेतो तेव्हा तो आपल्या रक्तामध्ये डायरेक्टली मिसळतो आणि चांगल्या पद्धतीने अब्जोब केला जातो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
चला तर मग बघूया तांब्याचे भांड्यातील पाणी पिल्यामुळे कोणकोणते फायदे होतात ते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे –
1. थायरॉईड कंट्रोल मध्ये राहतो –
तांब हा धातू थायरॉईड यांचे फंक्शन सुधारायला किंवा चांगलं करायला मदत करतो. त्यामुळे त्यांना थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनी शरीरातील थायरॉईडचे प्रमाण कमी करण्यासाठी तांब्यातील भांड्यातील पाणी जरूर पिलं पाहिजे.
2. पचन सुधारण्यास मदत होते –
तांब हा धातू ऍसिड सिक्रेशन कमी करायला खूप मदत करतो तसेच पचनक्रिया ही सुधारतो. म्हणून ज्यांना ऍसिडिटी ची तक्रार असते त्यांनी दिवसाची सुरुवात ही एक ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने केली पाहिजे. या पाण्यामुळे पोट साफ व्हायलाही मदत होते. ऍसिडिटी मध्ये हे पाणी पिणे खूप फायद्याचं आहे.
3. कोलेस्ट्रॉल, बीपी कमी करतो –
तांबा हा धातू आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो. हाय ब्लड प्रेशर कमी करायला ही मदत करतो. आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतो म्हणून सर्वांनीच हे पाणी पिणे फायद्याचे आहे.
4. संधिवातामध्ये फायद्याचे आहे –
ज्यांना गुडघेदुखी संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरते. या पाण्यामुळे शरीरातील यूरिक ॲसिड कमी होते. त्यामुळे सांधेदुखी मध्ये आराम मिळतो. संधिवातामुळे गुडघ्यांना किंवा इतर ठिकाणी आलेली सूज कमी करण्यासाठी हे पाणी मदत करतं तसंच हे पाणी हाडे मजबूत करण्याचं कामही करतं.
5. अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात –
तांब्यामध्ये अँटिबॅक्टरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आपल्या शरीरात असेल, तर ते दूर करण्याचे आणि इतर इन्फेक्शन आपल्या शरीरापासून दूर ठेवण्याचे काम हे करतं.
6. हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं –
तांबे हा धातू आपल्या शरीरामध्ये लोह आयन जास्तीत जास्त करायला मदत करतो म्हणून हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. म्हणून ज्यांना शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवायचा असेल त्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी हे रोज पिलं पाहिजे.
7. त्वचेसाठी खूप चांगले आहे –
तांब हे अँटी ऑक्सीडेंट असते. त्यामुळे स्किन साठी खूप चांगलं आहे. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. चेहऱ्यावरील फाईल लाइन्स रिंकल्स सुरकुत्या कमी करायला हे पाणी मदत करते म्हणून
8. ब्रेन आणि हार्ट दोन्हींसाठी चांगलं असते –
तांबे हा धातू ब्रेनचे फंक्शन सुधारण्यामध्ये मदत करतो. ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल ठेवायला ही मदत करतो म्हणून हार्ट चा प्रॉब्लेम असल्याने तर हे पाणी पिलंच पाहिजे. तसेच ज्यांना ब्रेन च फंक्शन सुधारायचे आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवायचे असेल स्मरणशक्ती सुधारायची असेल तरीसुद्धा हे पाणी पिणे खूप फायद्याचं आहे लहान मुलांना हे जर लक्षात राहत नसेल तर त्यांना हे पाणी दिले पाहिजे.
9. वजन कमी करण्यामध्ये उपयुक्त –
आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यामध्ये हे खूप मदत करते. रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी सकाळी उपाशीपोटी घेतल तर शरीरावरील चरबी कमी करण्याचे काम हे पाणी करतं.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना कोणती काळजी घ्याल ?
1. तुम्ही तांब्याचे जार, बॉटल, ग्लास यातले काहीही वापरू शकता. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरा.
2. तांब्याचे भांडे घेताना ही खात्री करून घ्या की ते तांब असली आहे, चांगल्या क्वालिटीचे आहे. कारण ओरिजनल तांब्या मधूनच आपल्याला योग्य तो फायदा मिळत असतो.
3. तांब्याचे भांडे हे व्यवस्थित स्वच्छ केलेलं असायला हवं. तांब्याची भांडी मेंटेन करायला थोडी जड असतात. ही लवकर काळी होतात. पण आपल्या हेल्थ साठी याचे फायदे आहेत त्यासाठी आपण एवढा त्रास घेऊच शकतो.
4. तांब्याचे गुण पाण्यामध्ये उतरायला कमीत कमी आठ तास लागतात म्हणून तुम्ही कमीत कमी आठ तास तरी पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवून मगच पिलं पाहिजे. तुम्ही रात्री पाणी भरून ठेवल आणि मग सकाळी उठल्यावर ते पिलं तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो.
5. तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे दररोज बदललं गेलं पाहिजे. जास्त वेळ भांड्यात पाणी राहिल्यावर त्या पाण्यामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त होते. आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात तांबे जाणे हे चांगले नाही. यामुळे ही वेगवेगळे रोग होऊ शकतात.
6. तांब्याच्या भांड्यातील पाणी हे आपण नेहमी घेणे हे चांगलं नसतं कोणताही आजार असणाऱ्यांनी किंवा नसणाऱ्यांनीही, सर्वांसाठी हा नियम लागू होतो, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना हे तीन महिने प्या. नंतर एक महिना गॅप द्या, म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे थांबवा. नंतर पुन्हा तीन महिने तुम्ही येऊ शकता. असे तीन महिन्यानंतर एका एक एक महिना गॅप देऊन तुम्ही तांब्याचे पाणी पिल, तर त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या शरीरावर बघायला मिळतील.
समारोप –
तर आज आपण या लेखामध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे बघितले. एवढे सगळे फायदे बघितल्यावर तुम्हीही लवकरच तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यास सुरुवात करत अशी मला आशा आहे. अन्य आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!