अनेक वेळा आपल्या ला सकाळी उठल्या उठल्या टाचा इतक्या जास्त दुखत असतात की पाय जमिनीवर ठेवून उभे राहता येत नाही. खास करून सकाळी टाच दुखी चा त्रास जास्त जाणवतो. तुम्हाला माहित आहे का आपल्याला टाच दुखीचा त्रास का होतो ? या लेखामधून आपण टाचा दुखण्याची कारणे कोणती असतात बघणार आहोत.
काही वेळा आपण जेवायला खाली बसतो आणि जेव्हा उठावे लागते तेव्हा पाय टाचा खूप दुखतात. इतक्या की आपल्याला चालणे कठीण होतं तसेच एका ठिकाणी खूप वेळ बसलेला असतो त्यानंतर जेव्हा चालायला लागतो तेव्हा पुन्हा टाचा दुखायला लागतात. जर तुमच्या सोबत आहे असं होत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे यामध्ये मी तुम्हाला आपल्या त्याचा का दुखतात त्याची कारणे सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता पुढे वळूया –
टाचा दुखण्याची कारणे –
⇒ आयुर्वेदामध्ये टाचा दुखण्याची दोन मुख्य कारणे सांगितलेले आहेत. पहिले कारण म्हणजे रक्तदृष्टी. आणि दुसरं म्हणजे वातामुळे टाचा दुखतात. एखाद्या व्यक्तीला या दोन्ही कारणांमुळे टाच दुखीचा त्रास होत असेल तेव्हा त्या दुखण्याची तीव्रता खूप जास्त असते आणि ते बरे व्हायला ही उशीर लागतो.
⇒ सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपलं पोट साफ होणे गरजेचे असतं. आदल्या दिवशी चे आपण खाल्लेलं असतं ते पचून गेलेलं असतं आणि मोठ्या आतड्यांमध्ये त्याची विष्ठा जमा होते. त्यानंतर ते बाहेर येते. जर ही प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा (कॉन्स्टिपेशनचा) त्रास बघायला मिळतो. त्यामुळे देखील त्याचा दुखू शकतात. म्हणून तुमच्या टाचा दुखत असतील तर तुम्ही तपासून बघा की तुम्हाला पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे का ते.
⇒ जेव्हा आपल्याला लघवी आलेली असते किंवा शौच आलेली असते, तरी खूप वेळ आपण कामात व्यस्त असतो किंवा कोणत्याही कारणामुळे लघवी, शौच रोखून धरली जाते तेव्हा आपल्या शरीरात वाताची विकृती होते. या वाताच्या विकृतीमुळे ही टाचा दुखू शकतात.
⇒ टाचा दुखण्याचा आणखी एक कारण म्हणजे आपल्या हाडांचा ठिसूळपणा. मित्रांनो आपला हाडांचा ठिसूळपणा हा सहजासजी भरून येत नाही. म्हणून तुम्हाला डॉक्टर कडे जाऊन टेस्ट वगैरे करून उपचार करून घेणे गरजेचे असते.
⇒ अति लठ्ठ असणाऱ्या, वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये म्हणजेच उंचीच्या मानाने ज्यांचे वजन जास्त आहे असे व्यक्ती, ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये टाच दुखी चे प्रमाण अधिक दिसून येते.
⇒ दिवसातल्या खूप वेळ एकाच जागेवर बसल्यामुळे पायांच्या टाचेचे स्नायू आखडून जातात त्यांच्यातील लवचिकता कमी होते. परिणामी त्यांचे दुखणे सुरू होते त्यामुळे काही वेळानंतर शरीराची नियमित हालचाल असणे गरजेचे आहे.
⇒ जास्त वेळ थंड फरशीवर, टाइल्स वर चालणे, रूक्ष असलेल्या पृष्ठभागावर जास्त चालणे आणि महत्त्वाचं म्हणजे चालत असताना पायामध्ये व्यवस्थित पायासाठी आरामदायक असे शूज किंवा चप्पल न वापरणे यामुळेही पायाच्या स्नायूंवर ताण पडून ते दुखतात.
⇒ चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्याने तसेच व्यायाम करताना योग्य शूज न वापरल्यामुळे ही टाच दुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून व्यायाम करताना स्त्री असो वा पुरुष सर्वांनी योग्य आणि कम्फर्टेबल असे स्पोर्ट्स शूज वापरले पाहिजे.
⇒ वयोमानानुसार पण टाच दुखी ची समस्या होऊ शकते. वयाच्या चाळीशी नंतर टाच दुखीचा धोका जास्त वाढतो. कारण वयानुसार आपल्या हाडांमध्ये झीज होते त्यामुळे टाच दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
⇒ तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम जर तुम्ही करत असाल तर त्यामुळेदेखील तुम्हाला टाच दुखी होऊ शकते. तसेच खेळाडू , ऍथलिटना खूप वेळ शारीरिक मेहनत, प्रॅक्टिस करावी लागते. पायांच्या स्नानयुंवर अतिरिक्त ताण आल्यामुळे देखील टाचदुखीची समस्या होऊ शकते.
⇒ चुकीच्या पद्धतीची पायाला त्रास होणारी चप्पल, किंवा शूज वापरल्यामुळे ही टाच दुखीचा त्रास होऊ शकतो याचा अर्थ आपण खूप जास्त महागडी चप्पल सॅंडल वापरले पाहिजे असा नाही. तर तुमच्या पायाला आरामदायक कम्फर्टेबल अशी चप्पल वापरणे पायांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. आज-काल फॅशन म्हणून स्त्रिया उंच हिल वापरतात. त्यामुळे ही टाच दुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
⇒ चालताना पायांवर जास्त जोर देऊन चालल्यामुळेही पुढे जाऊन टाचदुखीची समस्या बघायला मिळू शकते.
⇒ एसी, कुलर यांच्या प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे शरीरातील वाताचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे अशा कृत्रिम हवेचा कमीत कमी उपयोग केला पाहिजे आणि नैसर्गिक हवेत आणि वातावरणात आपण जास्त राहिले पाहिजे.
⇒ जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरात वात वाढतो. तसेच यूरिक ॲसिड वाढण्याचा ही धोका असतो जे सांध्यांमध्ये जमा होऊन टाच दुखी होऊ शकते त्यासोबत पाणी जास्त प्रमाणात पिल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त पाणी पिल्यामुळे ही टाचा दुखण्याचा त्रास वाढू शकतो.
⇒ पायाच्या खालच्या बाजूला मार वगैरे लागल्यामुळे तसेच इतर काही आजारांमुळे देखील टाचदुखी होऊ शकते.
समारोप –
मित्रांनो आज या लेखांमधून आपण टाचा दुखण्याची कारणे कोणती असू शकतात त्याबद्दल जाणून घेतले. तुम्हालाही टाच दुखीचा त्रास होत असेल तर वर सांगितलेली कारणे तपासून पहा आणि जीवनशैलीत काही चुका करत असतात तर त्या बंद करा म्हणजे तुमची टाच दुखी ही थांबण्यास मदत होईल. टाच दुखी साठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. ते इथे बघितले तर लेख खूप मोठा झाला असता म्हणून आपण ते दुसऱ्या लेखामध्ये बघू. मग अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
FAQs (Frequently Asked Questions)
Q1. टाचांच्या हाडात वेदना का होते?
Ans – टाचदुखी खूप कारणांमुळे होऊ शकते त्यामधील काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत –
- चुकीचे शूज, चप्पल वापरणे,
- लठ्ठपणा
- हाडांचा ठिसूळपणा
- जास्त वेळ थंड फरशीवर तसेच रुक्ष पृष्ठभागावर चालल्यामुळे.
Q2. टाचांच्या दुखण्याबद्दल मला कधी काळजी करावी?
Ans – घरगुती उपाय करूनही जर 2 ते 3 आठवड्यांपर्यंत टाचदुखी कमी होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवने गरजेचे आहे.