अनेकांना रात्री एका मागून एक सतत स्वप्न पडत असतात. आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडण्याची खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. स्वप्न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली मानसिक अवस्था हे असते. म्हणजे आपल्या मनातल्या भावना दाबल्या गेल्या असतील तर त्या स्वप्नांच्या माध्यमातून बाहेर येत असतात. या पोस्टमध्ये आपण स्वप्न पडू नये म्हणून काय करावे यासाठी काही सोपे उपाय बघणार आहोत. म्हणून झोपल्यावर तुम्हाला हे जास्त स्वप्न पडणे पडण्याचा त्रास होत असेल तर पोस्ट शेवटपर्यंत जरूर वाचा. चला तर मग सुरुवातीला आपण आपल्याला स्वप्ने का पडतात याबद्दल जाणून घेऊ.
आपल्याला स्वप्न का पडतात ?
स्वप्नांबद्दल न्यूरो सायंटिस्ट सांगतात की प्रत्येक व्यक्ती झोपेमध्ये कधी ना कधी स्वप्न बघत असतो. भले ती स्वप्ने त्याच्या लक्षात राहो वा न राहो. आपल्या मनातल्या सुप्त अवस्थेत राहिलेल्या भावना, मनावर कोणत्यातरी गोष्टींचा झालेला आघात त्यामुळे स्वप्न पडतात.
दिवसभरामध्ये ज्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात करतो आणि जास्त मनापासून करतो त्याही स्वप्नामध्ये येऊ शकतात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही बघितले असेल एखाद्या वेळी तुम्ही नवीन ठिकाणी जाता त्या रात्री तुम्हाला वेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात. मला तर असा अनुभव नेहमीच येतो. तुम्हालाही आला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.
सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर आपण झोपलेला असलो तरी आपल्या मेंदू हा ऍक्टिव्ह असतो म्हणून आपल्याला स्वप्न पडत असतात.
रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात. झोपेमुळे त्यांना आराम मिळतो एक प्रकारे दुसऱ्या दिवशी व्यवस्थित काम करण्यासाठी त्यांचं चार्जिंगच होत असतं असं आपण म्हणू शकतो. पण जास्त स्वप्नांमुळे मेंदूला आणि मनाला हवा तसा आराम मिळत नाही म्हणजे झोपेमध्ये सुद्धा ते सुरूच राहतात म्हणून मग अशावेळी झोपेतून उठल्यावर थकल्यासारखे वाटते. झोप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही परिणामी दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम होतो. त्या दिवशी कामांमध्ये हवा तसा उत्साह बघायला मिळत नाही.
म्हणून दररोज सहा ते आठ तासांची गाठ झोपेत आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. जर तुम्हालाही झोपल्यावर खूप स्वप्न पडत असतील तर काळजी करू नका खाली आपण काही सोपे उपाय बघणार आहोत ज्यांना फॉलो केल्यावर तुम्हाला रात्री पडणारी स्वप्न ही नक्कीच कमी होतील आणि शांत, गाढ झोप लागायला मदत होईल.
स्वप्न पडू नये म्हणून काय करावे ?
⇒ रात्री शांत आणि लवकर झोप लागण्यासाठी तुम्ही रात्री झोपेच्या किमान एक तास आधी तरी टीव्ही, मोबाईल वापरणे बंद केले पाहिजे. झोपण्याआधी एक ते दोन तास कोणतीही स्क्रीन बघू नका. सर्व आवरून झाल्यावर झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही एखादे छान पुस्तक वाचू शकता, सायलेंट म्युझिक ऐकू शकता, तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचा मंत्र ११, २१ किंवा ५१ वेळा म्हणू शकता तसेच मेडिटेशन देखील करू शकता. त्यापैकी काहीही तुम्ही करू शकता पण तेच करा ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. म्हणून १५-२० मिनिटे तरी तुम्हाला जे आवडतं ते करा आणि मग झोपायला जा. तुम्ही जिथे झोपता त्याच ठिकाणी बसून देखील वर सांगितलेल्या गोष्टी करू शकता.
⇒ मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते की पूर्व आणि दक्षिण दिशेला डोकं करूनच आपण झोपले पाहिजे. पश्चिम तसेच उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. आपल्यापैकी बहुतेक जण त्यावर इतका विश्वास ठेवत नाही पण काही गोष्टी मागे विज्ञानही असतं. आपली पृथ्वी आणि मानवी शरीर दोघांनाही चुंबकीय ध्रुव आहेत. पृथ्वीवर उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने जाणारे चुंबकीय ध्रुव आहेत. पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणामुळे उत्तर किंवा पश्चिम दिशांना डोके करून झोपल्यामुळे दोन सकारात्मक ध्रुव एकमेकांना मागे ढकलतात. त्यामुळे आपला मेंदू पूर्णपणे शांत होऊ शकत नाही. म्हणून झोपण्याची सर्वोत्तम दिशा ही पूर्व आणि दक्षिण दिशा आहे. झोपण्याची हीच एक शास्त्रीय पद्धत आहे असे मानले जाते. म्हणून तुम्हालाही झोपे संबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर झोपण्याची दिशा बदलून बघा तुम्हाला फरक नक्की दिसेल. तुम्हाला जास्त स्वपन पडत असतील तर ती पण यामुळे कमी होतील.
⇒ ते म्हणतात ना ‘ रात्री शांत झोप येण्यासाठी दिवस इमानदारीने घालवावा लागतो ‘ . ते खरंच आहे. जर आपण दहा ते पंधरा वर्षे आधीचा विचार केला तर झोपेच्या समस्या कुणाला माहितही नव्हत्या. याचे कारण तेच आहे लोकांमध्ये प्रामाणिकपणा, आपलेपणा होता. बाकी गोष्टी विकत घेता येतात पण झोप विकत घेता येत नाही. दिवसभर तुम्ही आपली सर्व कामे प्रामाणिकपणे केली, सर्वांशी प्रेमाने वागलात तर मनाला हे खूप छान आणि रिलॅक्स वाटेल आणि झोपही शांत आणि गाढ येईल.
⇒ रात्री नकारात्मक शक्तींच्या प्रभावामुळे जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील, तर झोपताना आपल्या उषाजवळ एक बॉटल पाणी भरून ठेवावे. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी टाकून द्यावे. तुम्ही हे पाणी झाडांना देखील देऊ शकता.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण स्वप्न पडू नये म्हणून काय करावे याबद्दल जाणून घेतले.’ मनी वसे ते स्वप्नी दिसे ‘ हे मनही प्रचलित झाली असेल कारण जे आपल्या मनात ज्या भावना असतात त्याच आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून दिसत असतात. तुम्ही आपली दिनचर्या वागणूक सुधारली तर तुम्हाला पडणारी स्वप्न ही नक्कीच बदललेली दिसून येतील. तर मग वर सांगितलेले उपाय करून बघा आणि त्याचा काय परिणाम बघायला मिळाला ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!