‘स्वाभिमान’हा शब्द आपण अगदी लहानपणापासून ऐकला असतो, पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. स्वाभिमान हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा गुण आहे, जो व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला आकार देतो. आज या लेखामधून आपण स्वाभिमान म्हणजे काय तो आपल्या जीवनात का महत्त्वाचा आहे आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूया लेखाकडे –
स्वाभिमान म्हणजे काय याचे सोप्या भाषेत बघू –
स्वाभिमान हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे.
१ – स्व – म्हणजे स्वतः .
२ – अभिमान – म्हणजे गर्व सन्मान किंवा आत्मविश्वास.
त्यामुळे स्वाभिमान म्हणजे स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणे आणि स्वतःच्या कर्तुत्वाचा सन्मान करणे. स्वाभिमान ही आत्मविश्वासाची पायरी आहे. यात स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची क्षमता असते.
स्वाभिमान का महत्वाचा आहे ?
- स्वाभिमान ही केवळ एक भावना नाही तर व्यक्तीच्या जीवनातील मानसिक आणि सामाजिक स्थिरतेचा कणा आहे.
- ज्या व्यक्तींमध्ये स्वाभिमान असतो ती कोणत्याही अडचणींना खंबीरपणे सामोरे जाऊ शकते.
- स्वाभिमानामुळेच आपण योग्य ते ठरवतो आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करतो तसेच आपल्या हक्कांसाठी ही लढतो.
उदाहरणार्थ – जर कोणी आपल्या सोबत चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपला स्वाभिमान आपल्याला सांगतो की हे आपण सहन करू नये. अशावेळी आपण योग्य शब्दात आपली भूमिका स्पष्ट करू शकतो.
स्वाभिमान आणि गर्व यामध्ये काय फरक आहे ?
⇒ स्वाभिमान आणि गर्भामध्ये महत्त्वाचा फरक हा आहे की स्वाभिमान सकारात्मक असतो तर गर्व अनेकदा नकारात्मक रूप धारण करतो.
⇒ स्वाभिमान आपल्या गुणांची जाणीव करून देतो आणि नम्र राहण्यास शिकवतो. तर गर्व इतरांपेक्षा आपणच श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण करतो.
उदाहरणार्थ – एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगले गुण मिळाले तर त्याचा स्वाभिमान त्याला अधिक कष्ट करण्याची प्रेरणा देतो. पण जर त्याने गर्व केलं तर तो इतरांना तुच्छ मानू लागतो. आणि त्यामुळे त्याचे नातेसंबंध बिघडू शकतात.
स्वाभिमानाचा अभाव कसा जाणवतो ?
स्वाभिमानाचा अभाव म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव. अशा व्यक्तींच्या स्वतःबद्दल नकारात्मक भावना असतात. त्या नेहमी इतरांच्या मतावर अवलंबून असतात. स्वाभिमानाच्या अभावामुळे पुढील समस्या निर्माण होऊ शकतात.
⇒ व्यक्तीला वाटते की ती कोणत्याच गोष्टीसाठी पात्र नाही.
⇒ अशा व्यक्तीला सतत भीती वाटते की इतर लोक काय विचार करतील.
⇒ आत्मविश्वास नसल्याने अशा व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
उदाहरणार्थ – एखाद्या व्यक्तीच्या लहानपणापासूनच त्याच्या कर्तृत्वावर नेहमी टीका झाली असेल तर त्याचा स्वाभिमान नेहमी कमकुवत राहतो आपण काही मोठे करू शकत नाही असा समज त्याचा होतो.
आत्मविश्वास सिम्पल वाढवण्याच्या टिप्स
स्वाभिमान वाढवण्याचे उपाय –
आपल्यामध्ये स्वाभिमानाची कमी आहे असे वाटणारे व्यक्तींनी खालील गोष्टी केल्यास स्वाभिमान वाढवता येतो.
1) स्वतःचा स्वीकार करा – आपल्या गुण आणि दोष ओळखा आपले दोष कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण स्वतःचा स्वीकारही करणे गरजेचे आहे.
2) सकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्या – प्रत्येक दिवशी एक तरी चांगली गोष्ट घडते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.
3) स्वतःकडे लक्ष द्या – आपले आरोग्य मनाची शांती आणि विचारांची स्वच्छता याकडे लक्ष दिल्यास आत्मविश्वास वाढतो.
4) नकारात्मक विचारांपासून दूर राहा – सतत नकारात्मक विचार केल्याने स्वाभिमानाला तडा जातो.
5) आपल्या कर्तुत्वाचा अभिमान ठेवा – छोट्या छोट्या गोष्टी का असेना ज्या आपण यशस्वीपणे पूर्ण केल्या त्यांची नोंद ठेवा आणि त्याचा अभिमान बाळगा.
स्वाभिमान असलेल्या काही व्यक्तींची उदाहरणे –
इतिहासातील अनेक महापुरुषांनी स्वाभिमानाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
महात्मा गांधी – त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढा दिला. त्यांचा अहिंसेचा मार्ग स्वाभिमानाची साक्ष देतो.
छत्रपती शिवाजी महाराज – आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी लढा दिला त्याच्यासाठी स्वाभिमानाने म्हणजे स्वतःच्या लोकांसाठी आणि मातृभूमीसाठी लढणे हा होता.
स्वाभिमान आणि आपले दैनंदिन आयुष्य –
आपल्या दैनंदिन जीवनात स्वाभिमानाचे खूप महत्त्व आहे ते आपण खालील उदाहरणां वरून समजून घेऊ.
⇒ एखाद्या कामात अपयश आल्यास स्वाभिमान आपल्याला पून्हा प्रयत्न करण्याची ताकद देतो.
⇒ नातेसंबंधांमध्ये स्वाभिमानाने आपण स्वतःला कमी न समजता इतरांशी प्रेमाने आणि आदराने वागू शकतो.
⇒ व्यवसायिक जीवनात स्वाभिमानाने योग्य निर्णय घेऊन आपण अधिक यश मिळवू शकतो.
समारोप –
स्वाभिमान हा आपला आत्मा आहे असे आपण म्हणू शकतो. तो माणसाला मजबूत बनवतो आणि आत्मविश्वास देतो. समाजात आपली ओळख निर्माण करण्यास मदत करतो. स्वाभिमान म्हणजे काय तर स्वतःचा सन्मान राखणे आणि इतरांना आदराने वागवणे. प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वाभिमान जपला पाहिजे कारण त्याशिवाय जीवनात खरे समाधान मिळणे कठीण आहे.
“स्वाभिमान जपा. तोच तुम्हाला यशस्वी आणि आनंदी आयुष्याचा मार्ग दाखवतो.”