बाळंतपण नॉर्मल झालं पाहिजे असा आपल्याकडे आग्रह असतो. पण काही कारणास्तव सिजेरियन झालं, तर अशा वेळी काही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या प्रसूतीनंतर शरीराला पूर्वस्थितीत यायला जास्त वेळ लागतो. अशावेळी योग्य आहार विश्रांती मानसिक स्वास्थ्य यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. या लेखात आपण सिझेरियन बाळंतपणानंतर आईने स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
सिझेरियन बालपणानंतर कोणती काळजी घ्यावी ?
1) शारीरिक विश्रांती महत्त्वाची –
सिझेरियन बाळंतपणानंतर शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेमुळे पोटाच्या स्नायूवर ताण येतो. ज्यामुळे जखम भरून यायला वेळ लागतो.
काय करावे ?
⇒ झोपताना पाठ टेकून किंवा बाजूला वळून झोपण्याचा प्रयत्न करावा.
⇒ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही शारीरिक हालचालींसाठी घाई करू नये.
⇒ जड सामान उचलणे किंवा पोटावर ताण पडेल असे कोणतेही काम टाळावे.
⇒ नवजात बाळ संभाळण्यासाठी घरच्या लोकांची मदत घ्यावी.
पुरेशा विश्रांतीमुळे शरीरातील ऊर्जेची पातळी सुधारते आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
2) जखमी ची काळजी आणि स्वच्छता घ्यावी –
सिझेरियन शस्त्रक्रियेची जखम व्यवस्थित भरून येण्यासाठी स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची असते. जखमेवर संसर्ग होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
काय करावे ?
⇒ डॉक्टरांनी दिलेले मलम आणि औषधे वेळच्या वेळी वापरावीत.
⇒ जखमेच्या आजूबाजूचा भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवावा.
⇒ जखम लालसर सुचलेली किंवा वेदनादायक वाटत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
⇒ दररोज जखम तपासावी कोणतेही बदल जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये.
3) संतुलित आहार महत्वाचा –
सिझेरियन नंतर शरीराला पोषक घटकांची गरज असते. योग्य आहारामुळे शरीरातील ताकद वाढते, रक्तस्राव कमी होतो आणि दूध निर्मितीसाठी देखील मदत होते.
काय खाल्लं पाहिजे ?
⇒ प्रोटीन्स – डाळी, अंडी, मासे आणि कडधान्य यांचा आहारात समावेश करावा.
⇒ फळे आणि भाज्या – विटामिन आणि मिनरल्स ने भरपूर आहार घ्यावा. उदाहरणार्थ गाजर पालक सफरचंद आणि संत्री रोजच्या आहारात सामील करावेत.
⇒ फायबर युक्त पदार्थ – पचन सुधारण्यासाठी फायबर युक्त आहार घेतला पाहिजे. जसे ओट्स गहू किंवा ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करायला हवा.
⇒ दुग्धजन्य पदार्थ – दूध तूप आणि लोणी मुळे शरीराला ताकद आणि कॅल्शियम मिळते. म्हणून हे देखील आहारातून घेतले पाहिजे.
⇒ पाणी – शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी हे आपण पिलं पाहिजे.
जड तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे पचायला त्रास होऊ शकतो.
4) शारीरिक हालचाल आणि व्यायाम –
सिझेरियन नंतर लगेच व्यायाम सुरू करणे धोकादायक असते पण शरीर सावरण्यासाठी हलक्या हालचालींचा सराव सुरू करणे फायद्याचे ठरते.
पहिल्या काही आठवड्यांमध्ये हे करा –
⇒ चालणे हा एक सोपा आणि उपयुक्त व्यायाम आहे.
⇒ श्वासनाचे व्यायाम करूनही ऊर्जेची पातळी वाढवता येते.
जड व्यायामांसाठी –
⇒ किमान सहा ते आठ आठवड्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.
⇒ वजन उचलण्यास किंवा तीव्र व्यायामाला सुरुवात करण्याआधी शरीर पूर्णपणे बरे होणे गरजेचे आहे.
5) मानसिक आरोग्याची काळजी –
आई होणे हा सर्वात सुंदर अनुभव असतो पण सिझेरियन नंतर काही महिलांना नैराश्याने झोपेची कमतरता यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. यावेळी कुटुंबाच्या सहकार्याची खूप आवश्यकता असते. रात्री बाळ न झोपल्यामुळे आईची झोप होत नसेल तर बाळाची घ्यायला काळजी घरातल्या व्यक्तींनी मदत केली तर आईला शारीरिक आणि मानसिक आधार मिळून आरोग्य लवकर सुधारण्यास मदत होते.
काय करावे ?
⇒ कुटुंबीयांशी आणि मित्र मंडळींशी बोलून मन मोकळे केले पाहिजे.
⇒ स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे जसे वाचन संगीत ऐकणे किंवा ध्यानधारणा करणे.
⇒ नवजात बाळासोबत वेळ झाला पाहिजे हळूहळू तुमची मनस्थिती सुधारेल आणि मूड चांगला होईल.
⇒ जर ताण जास्त वाटत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.
6) स्तनपानाची काळजी घ्यावी –
झालेल्या आईंसाठी स्तनपान सुरू करण्यासाठी वाटू शकते. पण योग्य काळजी घेतल्यास ते सोपे होऊ शकते.
काय करावे ?
⇒ बाळाला स्तनपान करताना आरामदायक पोझिशन निवडा. एका बाजूला वळून तुम्ही स्तनपान करू शकता.
⇒ पोषक आहार आणि योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे म्हणजे भरपूर दूध बनण्यास मदत होईल.
⇒ जर पुरेशी दूध नसेल किंवा बाळ दूध पीत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
⇒ मला व्यवस्थितपणे दूध पिण्याची सवय लागली की स्तनपान सहजतेने व्हायला मदत होईल.
7) संक्रमण (infection) टाळण्यासाठी स्वच्छता ठेवावी –
सिझेरियन नंतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.
काय करावे?
⇒ बाळाला हाताळण्याआधी हात स्वच्छ धुवावेत.
⇒ दररोज स्वतःचे कपडे आणि जखमीचा पट्टा (dressing) बदलत रहा.
⇒ ओलसर किंवा घाम असलेले कपडे वापरणे टाळा.
8) इतर महत्त्वाच्या टिप्स –
⇒ सिझेरियन नंतर 6 आठवड्यांनी नियमित तपासणीसाठी डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे.
⇒ ताप जखम सुजणे किंवा किंवा इतर कोणताही त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
⇒ जास्त वेळ उभे राहणे किंवा वाकणे टाळावे.
⇒ स्वतःच्या शरीराला पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ द्या. जास्त शारीरिक श्रम करण्याची काही करू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
समारोप –
सिझेरियन बाळंतपणानंतर योग्य काळजी घेतली तर आई आणि बाळ दोघांचे आरोग्य चांगले राहते. शारीरिक आणि मानसिक किती पूर्ववत होण्यासाठी वेळ द्या योग्य आहार घ्या आणि आणि कुटुंबाचा आधार घ्यावा. आईचे चांगले असते हे बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःची योग्य काळजी घेतली पाहिजे. आई होण्याचा पूर्ण आनंद उपभोगा आणि सिझेरियन नंतर घेतलेल्या योग्य काळजी मुळे तुमचे पूर्ण आयुष्य समृद्ध आणि आरोग्यपूर्ण बनण्यास मदत होईल.