नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!! गेल्या काही वर्षांमध्ये झपाटाने वाढत चाललेला आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर (बीपी). त्या आधी आपल्याकडे अशा प्रकारचे आजार नव्हते, याचं कारण पाश्चात्य देशांचे अनुकरण केल्यामुळे – आपली बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्या शरीरातील बीपी वाढण्याची कारणे कोणती असू शकतात. ती आपण या लेखामधून बघणार आहोत. बीपीला जर वेळेतच कंट्रोल नाही केले तर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. चला तर मग बघूया हाय ब्लड प्रेशर ( बीपी वाढण्याची) होण्यामागची कारणे –
शरीरातील बीपी वाढण्याची कारणे-
आपला बीपी वाढण्यामागे प्रामुख्याने दोन प्रकारची कारणं असू शकतात.
1)शारीरिक कारणे 2) मानसिक कारणे
सुरुवातीला आपण शारीरिक कारण बद्दल जाणून घेऊ.
1) शारीरिक कारणे –
1. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी –
→ जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम होतो.
2. मिठाचा अति वापर –
→ नॉर्मल किंवा कमी प्रमाणात मीठ खाणाऱ्यांचा रक्तदाब नॉर्मल असलेला बघायला मिळतो. या उलट ज्या व्यक्ती आपल्या आहारातून जास्त प्रमाणात मीठ घेतात त्यांच्यामध्ये बीपी वाढतो. कारण मिठामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया अति संवेदनशील होते.
3. मद्यपान, धूम्रपान करणे –
→ खूप जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यानेही बीपी वाढतो. तसेच धुम्रपानामुळेही रक्तदाब वाढतो. कारण तंबाखूमध्ये निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड, टार यांसारखे विषारी घटक असतात त्यामुळे नॉर एड्रिलिन या स्त्रावाचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यासोबतच धुम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.
4. अनुवंशिकता –
→ आई-वडिलांना उच्च रक्तदाब असेल तर मुलांमध्ये बीपी वाढण्याचे ( हाय ब्लड प्रेशरचे) प्रमाण हे खूप जास्त असते.
म्हणून तुमच्या आई किंवा वडिलांना जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर सुरुवातीपासूनच तुम्ही आपल्या रक्तदाबाकडे लक्ष दिले पाहिजे.
5. लठ्ठपणा –
→ लठ्ठ किंवा वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये बीपी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असते.
6. अनुषंगिक अतिरक्तदाब –
→ हा रक्तदाब शरीरातील इतर दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. फक्त ५-१० % लोकांमध्ये या प्रकारचा रक्तदाब बघायला मिळतो. शरीरातील इतर दोष कोणते असतात ते आपण बघू.
• किडनीचे आजार –
→ किडनी द्वारे लघवीच्या माध्यमातून शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. जेव्हा किडनीमध्ये काही बिघाड निर्माण होतो. तेव्हा हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात. याचा दुष्परिणाम म्हणजे आपला बीपी वाढतो. याला रिनल हायपर टेन्शन (renal hypertension) असेही म्हणतात.
→ किडनीचे मुख्य रक्तवाहिनी आकुंचन पावलेली असल्यास त्यामुळे ही बीपी वाढू शकतो.
• ग्रंथींचे आजार –
→ Cushing syndrome, pituitary gland tumor यांसारख्या काही ग्रंथींच्या आजारामुळे ही बीपी वाढण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
7. गरोदरपणात वाढलेला रक्तदाब –
→ गरोदरपणामध्ये देखील काही स्त्रियांमध्ये रक्तदाब / बीपी वाढण्याचा प्रॉब्लेम होतो. याला toximia of pregnancy असे म्हणतात.
8. वाढलेल्या लाल रक्तपेशी –
→ शरीरात लाल रक्त पेशींचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढलेले असेल तर त्यामुळेही बीपी वाढू शकतो.
9. रक्तवाहिन्यांचा कठीणपणा –
→ रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (Atherosclerosis ) या आजारामध्ये रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात. तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो. त्यामुळे रक्तामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भागामध्ये दाब वाढतो. आणि मग हे बीपी वाढण्याचे कारण बनते.
नाकातून पाणी येणे यावर असरदार घरगुती उपाय
2) मानसिक कारणे –
→ आपल्या मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होत असतो. जेव्हा आपण आनंदी असतो प्रेमामध्ये असतो, तेव्हा आपल्या brain मधून डोपामाईन, सिरोटोनिन सारखे हार्मोन रिलीज होतात. ज्यांना हॅपी हार्मोन्स म्हणतात. ज्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं.
→ रात्री चांगली झोप झाल्यावर, बाहेर मोकळ्या हवेत वेळ घालवल्यावर आपल्या ब्रेन मधून सिरोटोनिन (serotonin) हार्मोन सिक्रिट होतं. त्यामुळे आपण रिलॅक्स आणि चांगलं फील करतो. यावेळी आपल्या शरीरातील सर्व कामे ही व्यवस्थितपणे सुरू असतात.
→ या उलट जेव्हा आपल्या मनात राग, तिरस्कार, भीती या भावना असतात, तेव्हा adrenaline, cortisol यासारखे हार्मोन सिक्रिट होतात. ज्यांना स्ट्रेस हार्मोन असे म्हणतात. म्हणून अशा मनस्थितीमध्ये असल्यावर आपल्याला चांगलं वाटत नाही आणि आपल्याला शरीरातील पण यंत्रणा यावेळी बिघडते. शरीरातील सर्व कामे व्यवस्थित होत नाहीत. ज्यामुळे डोकेदुखी, अनिद्रा, उच्च रक्तदाब यांसारख्या तक्रारी उद्भवतात.
→ म्हणून जास्त ताण तणाव, स्ट्रेसफुल जीवन शैली सुद्धा बीपी वाढवण्याचे कारण बनू शकते.
समारोप –
मित्रांनो, आज या लेखामधून आपण शरीरातील बीपी वाढण्याची कारणे बघितली. जर तुम्हालाही खाण्यापिण्याच्या चुकीच्या, जीवनशैलीच्या सवयी असतील, stressful life तुम्ही जगत असाल, तर वेळीच आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल केला पाहिजे. जेणेकरून तुम्ही स्वतःला उच्च रक्तदाबापासून वाचू शकता.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!