जाणून घ्या शरीरात वात वाढण्याची लक्षणे कोणती असतात

नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे, आपलं शरीर वात, पित्त आणि कफ हे दोष आणि सात धातूंपासून बनलेले आहे. वात पित्त आणि कफ यांना दोष म्हणून जरी ओळखले जात असले तरी त्यांचे योग्य संतुलन आपल्या शरीरासाठी चांगलेच असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहायला मदत होते. आपल चुकीचे खानपान आणि चुकीची जीवनशैली यामुळे शरीरातील या दोषांचे प्रमाण बिघडते आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला बघायला मिळतात. या लेखामधून आपण शरीरात वात वाढल्याची लक्षणे कोणती असतात ती आपण बघणार आहोत. म्हणून तुम्हालापण वात वाढल्यावर दिसणारी लक्षणे जाणून घ्यायचे असतील, तर लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

शरीरात वात वाढण्याची लक्षणे –

आपल्या आयुर्वेदामध्ये शरीरातील वात पित्त कफ वाढल्यावर आणि कमी झाल्यावर कोणती लक्षणे दिसून येतात यांचं अचूक वर्णन केलेलं आहे. वात वाढल्यावर दिसून येणारी लक्षणे आपण इथे बघणार आहोत चला तर मग बघुयात कोणती आहेत ती लक्षणे –

⇒ वाताची वाढ ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये झाली असेल किंवा जो हाताचा रुग्ण असेल, तो व्यक्ती शरीराने बारीक होतो किंवा त्याचं वजन कमी होते.

⇒ वात हा थंड प्रकृतीचा असल्यामुळे जेव्हा एखाद्याच्या शरीरात वात वाढतो तेव्हा त्याच्या शरीरात थंडपणा वाढलेला असतो म्हणून त्याला उष्ण गरम पदार्थ खाण्याची किंवा पेय पिण्याची इच्छा होईल किंवा अंगावर पांघरून घेऊन बसावसं वाटेल. असं जर कोणाला होत असेल तर त्याच्या शरीरात वाताचे प्रमाण वाढले असण्याची शक्यता असते. त्यासोबतच थंड पदार्थ सहन होत नाही किंवा थंड वातावरणातही जास्त त्रास होतो.

⇒ शरीरात वात वाढल्यावर दिसणाऱ्या महत्त्वाचे लक्षण म्हणजे शरीरात कुठल्याही भागामध्ये होणारे दुखणे. कारण आता शिवाय वेदना नाही अस आयुर्वेद सांगतं. म्हणून शरीरात वात वाढल्यावर मान दुखी पाठ दुखी, गुडघेदुखी, मुख्यतः सांधेदुखी सुरू होते.

⇒ पोट फुगल्यासारखे वाटणे. पोट गॅस मुळे भरल्यासारखे पुढल्यासारखे वाटणे, कधी कधी पोट फुगून ते दुखवी लागते तर हे वाढलेल्या वाताचे लक्षण आहे.

⇒ पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता ) जर कोणाचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तेही वात वाढल्याचे लक्षण असू शकते.

⇒ जेव्हा शरीरामध्ये वाताची वाढ झालेली असेल तर तो माणूस वर्णाने सावळा निस्तेज दिसायला लागतो. शरीरातील वातामुळे व्यक्तीचे केस आणि त्वचा रूक्ष बनते. आणि तो व्यक्ती आधी वर्णाने एवढा सावळा नसला तरी त्याची त्वचा निस्तेज रूक्ष आणि काळपट दिसायला लागते. हे वात वाढल्याचे लक्षण असू शकते.

⇒ आपली वेगवेगळी इंद्रिये (sense organ ) आपापली कामे व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यामुळे डोळे – नजर कमी होणे, जीभ – चव घेण्याची क्षमता कमी होणे, कान – ऐकण्याची क्षमता कमी होणे. शरीरात वात वाढल्यावर यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

⇒ थकल्यासारखे गळल्यासारखे वाटणे, अंगात ताकद नाही असे वाटणे, कोणतेही काम करताना लवकर थकणे अशी लक्षणे हे वात वाढल्यावर दिसू शकतात.

⇒ वाताची वाढ झालेल्या व्यक्तीमध्ये झोप कमी असलेली बघायला मिळते. वृद्धावस्था हा वाताचा काळ सांगितला असल्यामुळे वय झाल्यावर पण झोप कमी झाल्याचं आपण बघतो. त्यामुळे झोपेचे प्रमाण कमी होणे तसेच झोपल्यावर स्वप्न खूप पडणे किंवा थोड्या आवाजाने लगेच जाग येणे हे सुद्धा वात वाढल्याचे लक्षण आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे.

⇒ मन एका कामामध्ये एकाग्र न होणे, मन सतत भटकणे हे सुद्धा वात वाढण्याचे लक्षण असू शकते.

⇒ जास्त बडबड करणे किंवा विनाकारण बडबड करणे हे सुद्धा वात वाढल्यावर बघायला मिळू शकत. याबाबतीत तुम्ही बघितलं असेल की वातामुळे होणाऱ्या तापामध्ये पेशंट जागेपणी किंवा झोपेमध्ये खूप बडबड करतो हे अशा प्रकारचे वात वाढण्याचे लक्षण आहे.

⇒ चक्कर येणे, नगरला सारखे वाटणे हा त्रासही शरीरात वाढलेल्या वातामुळे असू शकतो.

 

तर वर आपण शरीरात वाढल्यावर दिसून येणारी लक्षणे बघितली. सर यातली काही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही पण आपल्या जीवनशैलीत बदल नक्की करायला पाहिजे आणि आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार करून घ्या आणि स्वतःला निरोगी बनवा.

समारोप –

मित्रांनो वात वाढल्यावर शरीरात वात वाढण्याची लक्षणे आपण या लेखांमधून बघितली तुमचे काही प्रश्न असतील तर खाली विचारू शकता आणि अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र  २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!

1 thought on “जाणून घ्या शरीरात वात वाढण्याची लक्षणे कोणती असतात”

  1. Pingback: ही आहेत शरीरात वात वाढण्याची कारणे | वात कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top