ही आहेत शरीरात वात वाढण्याची कारणे | वात कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!! आज आपण शरीरातल्या वाताबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकदा पण ऐकतो की मला वाताचा त्रास आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या शरीरात वात वाढला आहे. तर हा वाद म्हणजे नेमकं काय आणि आपल्या शरीरात वात वाढण्याची कारणे कोणती असू शकतात ते आपण या लेखामधून बघणार आहोत. त्यासोबतच वात कमी करण्यासाठी करता येतील असे घरगुती उपाय आहे आपण बघणार आहोत. हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे म्हणून शेवटपर्यंत जरूर वाचा.

शरीरात वात वाढण्याची कारणे

वात म्हणजे नेमकं काय ?

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन मुख्य दोष असतात. इथे हे दोष म्हणजे बिघाड असा अर्थ होत नाही. तर दोष म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्या व्यवस्थित प्रमाणात असतील तर आपलं शरीर नॉर्मल राहते, आजारांपासून दूर राहते. आणि या कमी किंवा जास्त झाल्या तर आपल्याला आजार होतात.

तर त्या तीन गोष्टी म्हणजे – वात, पित्त आणि कफ. ज्यांना आयुर्वेदामध्ये त्रिदोष असे म्हणतात. ते सर्वांच्याच शरीरात असतात. वात हा दोष खूप महत्त्वाचा असतो. शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या क्रिया याच्या अधिपत्याखाली येतात.

वाताची लक्षणे काय आहेत ?

आपल्या शरीरात वात वाढलेला आहे हे कसे ओळखाल ? तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की “ वाताशिवाय वेदना नाही “. म्हणून जर कुठल्याही दुखापती शिवाय तुमच्या शरीरात कुठेही वेदना होत असतील म्हणजे तुम्हाला डोकेदुखी, कंबर दुखी, मान दुखी, गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर हे तुमच्या शरीरात वाढलेल्या वातामुळे होत आहे हे निश्चित आहे. असे दुखणे जर तुम्हाला वारंवार होत असेल हे वाताचेच लक्षण असते.

⇒ शरीरात वात वाढण्याची लक्षणे कोणती असतात

वाताचे प्रकार किती व कोणते ?

आयुर्वेदामध्ये वाताला परमेश्वर असे सांगितले आहे वाताचे पाच प्रकार सांगितलेले आहेत –

१) प्राण  २) उदान  ३) व्यान  ४) अपान  ५) समान

१. प्राण – प्राणवायू हा आपल्या शरीरात वरच्या भागात म्हणजे डोक्यामध्ये असतो. आपल्याला दिसणं, विचार करणं, वास घेणं, शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया प्राणवायूच्या मदतीने होत असतात.

२. उदान वायु – उदान वायु फुफुसांच्या जवळ असतो. आपल्या श्वासाची क्रिया उदान वायू मार्फत होते.

३. व्यान वायू – हवा येऊ द्या मध्ये असतो आपल्या शरीरामध्ये सर्व भागाचे रक्त जात असते त्याच्या नियंत्रणाचं काम व्यान वायू करतो.

४. समान वायु – आपल्या पचनसंस्थेचे काम व्यवस्थित ठेवण्याचे काम समान वायू करत असतो. म्हणजेच आपल्याला पित्त ऍसिडिटी पासून वाचवून आपल्या अन्नाचा व्यवस्थित पचन करण्याचे काम समान वायू करतो.

५. अपान वायू – हा आपल्या आतड्यांमध्ये असतो. हा आपल्या आतड्यांमध्ये मल किंवा शौच बनवण्याचं काम करतो.

वर आपण जे वाताचे प्रकार बघितले, ही वाताची आपल्या शरीरातील कामे आहेत ती सर्व व्यवस्थित चालायला हवीत. अन्यथा वेगवेगळे आजार उद्भवतात. शरीरात वात वाढण्याची कारणे कोणती आहेत ते आता आपण बघू.

arthritis

शरीरात वात वाढण्याची कारणे –

१) आपल्या शरीरात वात वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात असलेली रूक्षता किंवा कोरडेपणा. शरीरात अतिरिक्त वाढलेल्या कोरडेपणामुळे आपला वात वाढतो. अनेकदा पावसाळ्यात वात वाढतो कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे शरीरात कोरडेपणा वाढलेला असतो आणि मग जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सगळीकडे थंडपणा ओलावा असतो अशा मध्ये मग आपला वात वाढतो म्हणून पावसाळ्यात वात, सांधेदुखीचा त्रास जास्त होतो.

२) चणे, हरभरे, पावटा, वाटाणे यांच्या उसळी जास्त प्रमाणात म्हणजे रोजच्या रोज आहारातून घेतल्यामुळे शरीरात वात वाढतो. कारण चणे हरभऱ्या सारखे कडधान्य रूक्ष कोरड्या गुणांची असतात.

३) थंड पदार्थांमुळे पण शरीरात वात वाढतो. नियमितपणे फ्रीजमधील अन्नपदार्थ किंवा पेय पिल्याने शरीरात वात वाढतो.

४) कडू चवीचे पदार्थ जसे की कारले, मेथी यामुळे देखील वात वाढू शकतो. डायबिटीस चे पेशंट कारल्याचा ज्यूस, भिजवलेली मेथी असे कडू पदार्थ वर्षानुवर्षे रोज खात राहिले तर यामुळे त्यांच्या शरीरातला वात वाढतो.

५) तिखट चवीचे पदार्थ जसे काळे मिरी, मिरची, गरम मसाल्याचे पदार्थ यामुळे शरीरातला वात वाढतो आणि यामुळे वाताबरोबरच शरीरातील पित्त पण वाढते. कारण तिखट पदार्थ हे उष्ण प्रकृतीचे असतात. तुम्ही जर रोजच्या रोज तिखट पदार्थांचे सेवन करत असाल तर वात आणि पित्तासोबतच तुमचा रक्त पण (रक्तदोष) बिघडते.

६) कडू आणि तिखट सोबतच तुरट चवीच्या पदार्थांमुळे ही वाट वाढतो. पण आपल्याला तुरट चवीमध्ये जास्त ऑप्शन नसतात. आवळा तसेच सुपारी हे तुम्ही रोज खाणे टाळले पाहिजे.

तुमच्या शरीरातील बीपी वाढण्याची कारणे

वर आपण खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे वात वाढण्याची कारणे बघितली आता आपण आपल्या कोणत्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वात वाढतो ते बघूया.

७) रात्रीचं जागरण. अनेकांची रात्रीची नाईट ड्युटी असते. त्यामुळे रात्रीच्या जागरणामुळे शरीरात कोरडेपणा वाढतो आणि मग वात वाढतो.

८) जास्त प्रमाणात व्यायाम केल्यामुळे देखील शरीरात वात वाढू शकतो. व्यायामा सोबतच खूप जास्त म्हणजे रोज पाच ते दहा किलोमीटर तर तुम्ही चालत असाल तरी देखील तुमचा वात वाढू शकतो.

९) भरपूर शारीरिक श्रम, मेहनत जर तुम्ही करत असाल तर त्यामुळे देखील वात वाढू शकतो.

आपण जीवनशैलीतील चुकीच्या पद्धतीमुळे वात वाढण्याची कारणे बघितली आता आपण वाढण्याची नैसर्गिक कारणा बघूया.

१०)आपल्या शरीरात आपोआपच वात वाढू शकतो तो काळ म्हणजे वृद्धापकाळ. जसे लहान मुलांना पित्ताचा त्रास बघायला मिळतो त्यामुळे त्यांना सर्दी कफ यांसारखे त्रास होत असतात तसंच आपलं वय जास्त झाल्यावर आपल्या शरीरातील वात आपोआपच वाढतो. त्यामुळे मग सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.

११) चिंता राग भय शोक यांसारख्या भावनांमुळे देखील आपल्या शरीरातील वात वाढतो. ताण तणाव अनेक दुसऱ्या आजारांचे देखील कारण आजकाल बनत चालला आहे.

ही आहेत अंगाला खाज सुटण्याची कारणे

तर आपण शरीरात वात वाढण्याची कारणे बघितली. जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत म्हणजे तुमचा त्रास खूप प्रमाणात कमी होईल. वातावर करता येतील असे घरगुती उपाय आता आपण बघू.

वात कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय –

१) कोणत्याही सांधेदुखी किंवा दुखण्यावर अभ्यंग खूप प्रभावी उपाय आहे. अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. यासाठी सामान्यतः तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. हिवाळा असेल किंवा वातावरण थंड असेल तेव्हा तुम्ही तिळाच्या त्याला ऐवजी मोहरीचे तेल वापरणे फायद्याचे ठरते. सांधेदुखीवर खूप प्रभावी असे औषधी तेलही बाजारात उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती देखील घेऊ शकता.

→ हे तेल तुम्ही आंघोळी आधी अर्धा तास लावले पाहिजे. ज्यांचा एखादा सांगा दुखत असेल त्यांनी दिवसातून दोन-तीन वेळा त्या भागाला तेल लावलं पाहिजे. वात होऊ नये म्हणून जर तुम्ही करत असाल तर आंघोळी आधी एकदा लावलं तरी पुरेसे आहे.

→ वाताचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही सांध्यांना किंवा दुखणाऱ्या भागावर तेल नियमितपणे लावले पाहिजे त्यामुळे तुमचे दुखणे तर कमी होईलच वातही कमी व्हायला मदत होईल.

२) वात कमी करण्यासाठी घरातल्या घरात करता येईल असा दुसरा उपाय म्हणजे शेक घेणे. आंघोळीच्या पाण्यात खडे मीठ टाकून त्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातला वात कमी व्हायला मदत होते. मिठाचे पाणी फक्त केस धुण्यासाठी वापरू नये यामुळे केसांना इजा होऊ शकते.

→ वाळू गरम करून ती एका सुती कपड्यांमध्ये घेऊन या पुरचुंडीने देखील तुम्ही दुखणाऱ्या संध्याला शेक देऊ शकता.

३) सकाळी उपाशीपोटी कपभर दुधात दोन चमचे तूप टाकून ते पिणे खूप फायदेशीर असते. यामुळे शरीरातील स्निग्धता वाढून वात कमी होण्यास मदत होते. सोबतच याचे दुसरे भरपूर फायदे देखील आहे.

समारोप –

तर आज आपण शरीरात वात वाढण्याची कारणे बघितली. त्यात तुम्ही पण या गोष्टी टाळून आपल्या शरीरातील वात नियंत्रित ठेवू शकता. या लेखांमधून आपण आता बद्दल खूप काही जाणून घेतले तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. अधिक आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top