आपल्या शरीरात शुगर लेव्हल किती असायला पाहिजे | Blood Sugar Level In Marathi

आपण रोज जे अन्न खातो त्यातून शरीराला साखर मिळत असते. शरीरात होणाऱ्या कामांसाठी साखर खूप महत्त्वाची असते. आपले शरीर रक्तातील या साखरेपासून ऊर्जा निर्माण करत असते. आणि उर्जेवरच शरीरातील क्रिया चालत असतात. रक्तामध्ये साखर महत्त्वाची असली तरी तिचे प्रमाणे योग्य असावे लागते कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहासारखे आजार होतात. या लेखामध्ये आपण शरीरात नॉर्मल शुगर लेवल किती असायला पाहिजे आणि मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये ती किती असते हे बघणार आहोत. आज कालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कोणताही आजार होण्याचा धोका हा कित्येक पटीने वाढलेला आहे म्हणून वेळोवेळी आपली शुगर लेवल टेस्ट केली  पाहिजे.

शरीरात शुगर लेव्हल किती असायला पाहिजे

आपल्या शरीरातील sugar level test करताना आपण ती खालील पद्धतींनी करत असतो.

# शुगर लेव्हल किती असायला पाहिजे ?

१) Fasting blood sugar level –  100 mg/dL पेक्षा कमी

यामध्ये आठ तासांच्या फास्टिंग नंतर शुगरची टेस्ट केली जाते. हे सामान्यतः रात्रीच्या आठ तासांच्या उपवासानंतर सकाळी केली जाते. ही लेवल आणि मोस्ट सर्व वयोगटातील व्यक्तींना लागू होते. याला उपाशीपोटी केली जाणारी टेस्टही म्हणतात. याची लेव्हल ही 100 mg/dL पेक्षा कमी असायला हवी. हे लेवल 100 mg/dL पेक्षा जास्त असेल तर व्यक्तीला मधुमेह असू शकतो. मधुमेह आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला रिटेस्ट करावे लागते.

२) Post prandial sugar level – 140mg/dL पेक्षा कमी

जेवणानंतर करण्यात येणारी ही टेस्ट असते याची लेवल 140mg/dL पेक्षा कमी असायला पाहिजे. ही 140mg/dL पेक्षा जास्त असल्यास व्यक्तीला मधुमेह असण्याची शक्यता असते.

३) Random test (HbA1c) – 5.7 % पेक्षा कमी

ही टेस्ट कधी केली जाते. जेवणाच्या आधीही असू शकते किंवा जेवण झाल्यावर सुद्धा करू शकतो यामध्ये मागच्या दोन-तीन महिन्यातील ऍव्हरेज शुगर किती होती ते समजते. याची रेंज नॉर्मल व्यक्तीमध्ये 5.7 % पेक्षा कमी असली पाहिजे.

४) Fasting glucose tolerance test –  100 mg/dL पेक्षा कमी

ही सर्वात जास्त ऍक्युरेट टेस्ट मानली जाते यामध्ये व्यक्तीला 75g   ग्लुकोज दिले जात. आणि हे ग्लुकोज देण्याआधी ब्लड सॅम्पल घेतात याला फास्टिंग सॅम्पल म्हणतात ही व्हॅल्यू 100 पेक्षा कमी असायला हवी.

५) Post oral glucose tolerance test – 140mg/dL पेक्षा कमी

ही टेस्ट ग्लुकोज दिल्यानंतर केली जाते. याची लेव्हल 140mg/dL पेक्षा कमी असायला हवी.

वर आपण शुगर लेव्हल किती असायला हवे याबद्दल बघितले आता आपण शिकल लेव्हल किती असावी हे शॉर्ट मध्ये बघू.

# उपाशीपोटी ब्लड शुगर लेवल किती असावी ?

—>>  Normal Sugar Level – 70 – 100 mg/dL दरम्यान

—>> Pre diabetes (मधुमेह पूर्व अवस्था) – 100 – 140 mg/dL

—>> Diabetes (मधुमेह) – 140 mg /dL (पेक्षा जास्त शुगर लेवल असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते)

 

# जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल किती असावी ?

—>> Normal Sugar Level – 140 mg/dL पेक्षा कमी

—>> Pre diabetes (मधुमेह पूर्व अवस्था) – 140 – 200 mg/dL पेक्षा जास्त

—>> Diabetes (मधुमेह) – 200 mg /dL (पेक्षा जास्त शुगर लेवल असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते)

समारोप –

मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या शरीरात नॉर्मल शुगर लेवल किती असायला पाहिजे हे बघितले. त्यासोबतच मधुमेह असणाऱ्यांची शुगर लेवल किती असते ते पण जाणून घेतले. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top