नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र 24 वर !!!!!! आपल्या शरीरात सर्व घटकांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. अन्यथा आपल्याला हेल्थच्या वेगवेगळ्या तक्रारी बघायला मिळतात. आज या लेखामधून आपण आपल्या शरीरात लाल रक्त पेशी किती असायला हव्यात, शरीरात लाल रक्त पेशी कमी होण्याची कारणे, लाल रक्त पेशी वाढण्याची कारणे आणि शरीरातील लाल रक्त पेशी वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर दिसून येणारी लक्षणे ही बघणार आहोत. आपल्या शरीराबद्दल महत्त्वाची माहिती या लेखामधून आज तुम्हाला वाचायला मिळणार आहे म्हणून लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
शरीरात लाल रक्त पेशी कमी होण्याची कारणे बघण्याआधी आपण समजून घेऊ लाल रक्तपेशी नेमक्या काय असतात त्याबद्दल.
लाल रक्त पेशी म्हणजे काय ?
→ लाल रक्त पेशी ज्यांना RBC (red blood cells ) असेही म्हणतात.
→ या लाल रक्तपेशी आपल्या रक्तात असतात आणि आपल्या रक्ताला लाल रंग या RBC मुळेच मिळतो. कारण RBC मध्ये हिमोग्लोबिन नामक तत्व असते. हिमोग्लोबिन ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयव आणि मानस पेशी पर्यंत पोहोचवण्याचे काम करतो.
→ आपल्या शरीरातलं RBCचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं असतं. कारण शरीरात लाल रक्त पेशी कमी किंवा जास्त झाल्यामुळे प्रमाण कमी जास्त होते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
लाल रक्तपेशींची सामान्य रेंज किती असते ?
→ एका निरोगी पुरुषांमध्ये लाल रक्तपेशींची संख्या ही प्रति मायक्रो लिटर रक्तामध्ये RBC ची normal value 4.7 – 6.1 million cells पर्यंत असायला हवी.
→ एका निरोगी स्त्रीमध्ये जी गर्भवती नसेल, तिच्या शरीरात प्रति मायक्रो लिटर रक्तात RBC चे रेंज ही 4.2 – 5.4 million cells पर्यंत असायला हवी.
→ आणि लहान मुलांच्या बाबतीत बघितलं तर निरोगी मुलांमध्ये/मुलींमध्ये RBC ची normal value 4 – 5.5 million cells असायलाच हवी.
(Note – वर सांगितलेली रेंज ही रेफरन्स साठी आहे प्रत्येक लॅबोरेटरी, डॉक्टर प्रमाणे ही संख्या थोडी कमी जास्त होऊ शकते. )
आपण बघितले जर आपल्या शरीरात लाल रक्तपेशी कमी झाल्या तर कोणती लक्षणे दिसतात ते आता आपण बघू.
लाल रक्त पेशी कमी होण्याची लक्षणे –
» थकवा येणे
» कमजोरी येणे
» श्वास घ्यायला त्रास होणे
» चक्कर आल्यासारखे वाटणे
» डोकं भारी होणे
» डोकेदुखीची समस्या होणे
» हार्ट रेट वाढणे
» ब्लड प्रेशर कमी होणे
» त्वचा रंगहीन होणे
» डोळे पिवळे पडणे
शरीरात लाल रक्त पेशी कमी झाल्यावर वरील लक्षणे दिसून येतात. तर लाल रक्त पेशी शरीरात वाढल्यावर कोणती लक्षणे दिसतात ते आता आपण खाली बघू.
लाल रक्तपेशी वाढल्यावर दिसणारी लक्षणे –
» त्वचेला खाज येणे
» सांधेदुखी होणे
» थकवा जाणवणे
» श्वास घ्यायला त्रास होणे
» झोप लागण्यामध्ये समस्या निर्माण होणे
» ब्लड प्रेशर वाढणे
» डोळे लाल राहणे
» त्वचेवर लाल रॅशेज होणे
» पोट दुखी होणे
» डोकेदुखी होणे
काही आजारामुळे देखील शरीरात लाल रक्तपेशी कमी होऊ शकतात. ते आजार आपण खाली बघू.
रक्त पेशी कमी होण्यास कारणीभूत आजार –
» ॲनिमिया
» इरीथ्रोपोईटीन डीफिसीएनसी ( Erythropoietin deficiency )
» ल्यूकेमिया
» मल्टिपल मायलोमा ( Multiple Myeloma )
» विटामिन आणि मिनरल्सची कमी
» थायरॉईड
लाल रक्तपेशी कमी होण्याची कारणे –
→ शरीरातील लाल रक्तपेशी कमी होण्याचं पहिल कारण असू शकते ते म्हणजे तुमच्या शरीरातून खूप जास्त रक्तस्त्राव होण. जर कोणत्याही कारणाने तुमच्या शरीरातील खूप जास्त रक्त गेले असेल तर त्यामुळे शरीरात लाल रक्त पेशींची संख्या कमी होते.
→ कुपोषण हे लाल रक्तपेशी कमी असल्याचा एक सामान्य कारण आहे. हे तर सामाजिकच आहे कुपोषित व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशी कमी असतात.
→ किडनी शी संबंधित काही आजार असणे हे देखील RBC कमी होण्यामागचं कारण असू शकत. जर एखाद्या व्यक्तीला किडनीशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या शरीरात लाल रक्तपेशी कमी होऊ शकतात.
→ जर तुमच्या शरीरातील अस्थी मज्जा (bone marrow) व्यवस्थित काम करत नसेल त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी पण तुमच्या लाल रक्तपेशी कमी होऊ शकतात. कारण आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी या अस्थी मज्जा मधूनच बनत असतात. म्हणून याच व्यवस्थित काम करणे खूप गरजेचे असते.
→ त्यासोबतच प्रेग्नेंसी च्या काळात महिलांमध्ये लाल रक्त पेशींची संख्या कमी होऊ शकते. प्रेग्नेंसी मध्ये चांगला आहार घेणे खूप गरजेचे असते.
→ शरीरातील लाल रक्तपेशी कमी होण्याचं आणखी एक कारण असतं ते म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त होणे. पाण्याचे प्रमाण जास्त झालं असेल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरातील RBC कमी होऊ शकतात.
काही औषधांच्या सेवनामुळे देखील आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात.
लाल रक्त पेशी कमी होण्यास कारणीभूत औषधे –
→ केमोथेरेपी ची औषधे (chemotherapy medicines)
→ Quinidine
→ Chloramphenicol
→ काही इपिलेप्सी मेडिसिन ( epilepsy medicine )
लाल रक्त पेशी वाढण्याची कारणे –
» धूम्रपान
» डीहायड्रेशन
» हार्ट डिसीज
» पलमनरी फेब्रोसिस
» रिनल सेल कार्सिनोमा
» बोन मॅरो डिसीज
» प्रोटीन इंजेक्शन्स
समारोप –
मित्रांनो, आज या लेखामधून आपण लाल रक्तपेशीं बद्दल बरच काही जाणून घेतल. शरीरातील लाल रक्त पेशींची सामान्य संख्या, शरीरात लाल रक्त पेशी कमी होण्याची कारणे, लक्षणे तसेच लाल रक्त पेशी वाढण्याची कारणे ही आपण बघितली. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!