ही आहेत पुरुषांचे केस गळण्याची कारणे | Purushanche Kes Galnyachi Karane

केस गळणे हा सर्वच वयोगटातील पुरुषांचा सामान्य प्रॉब्लेम आहे. डोक्यावर कमी प्रमाणात असलेले केस हे कोणत्याही वयातील स्त्री वा पुरुषांना प्रभावित करतात. बहुतेक वेळा केस गळण्याचा कोणत्याही रोगाशी संबंध नसतो. जर तुमचे केस गळत असतील, तर ते सामान्य आहे, कोणत्याही साधारण कारणाने केसगळतीची सस्य उदभवू शकते. जे बहुतेक लोक आयुष्यात ना कधी अनुभवतात. कमी वयाच्या पुरुषांचे केस गळत असतील तर ते का गळत आहेत. या बद्दल बहुतेक लोकांना फारशी माहिती नसते. या लेखामध्ये आपण पुरुषांचे केस गळण्याची कारणे कोणती असतात ते बघणार आहोत. पुरुषांमध्ये केस गळण्याला पुरुष पॅटर्न केस गळणे असे म्हणतात. पुरुषांमध्ये टक्कल होण्यामागे 80-90% जेनेटिक कारण असू शकते.

पुरुषांचे केस गळण्याची कारणे

केस हे डोक्यावरच्या लहान लहान छिद्रातून वाढतात. ज्यांना हेअर फॉलिकल्स म्हणतात. प्रत्येक केस हे कूप, वाढ, विश्रांती आणि शेडिंग अशा चक्रात जाते. हे चक्र अनुवंशिकता, वय, डायट यांसारख्या अनेक घटकांनी प्रभावित होते आणि त्यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचे दिवसभरातून सुमारे 50 ते 100 केस गळू शकतात, ते सामान्य आहे. ही संख्या जेव्हा वाढते आणि गळलेल्या केसांच्या जागी नवीन केस जेव्हा येत नाहीत, तेव्हा केस गळण्याची समस्या निर्माण झाली आहे असे आपण म्हणतो. केस गळण्याची कारणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात. ती आपण खाली बघू.

पुरुषांमध्ये केस गळण्याची कारणे –

केमिकल युक्त प्रोडक्ट चा वापर केल्याने महिला तसेच पुरुषांचे केस गळू शकतात. हेअर जेल्स, हेअर कलर, शाम्पू, कंडिशनर यांच्या केमिकल्सच्या प्रभावाने केस गळण्याची समस्या उद्धवू शकते.

अनुवंशिकता हे सुद्धा केस गळतीचे एक कारण असू शकते. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला टक्कल पडलेलं असेल, तर तुमचंही टक्कल पडू शकते.

जर पुरुषाला कमी वयात केस गळतीचा त्रास होत असेल, तर आहारातून योग्य पोषणयुक्त आहार न घेता स्वतःला असे होऊ शकते. आहारातून हेल्दी डायट न घेतल्यामुळे केसांना आवश्यक पोषण तत्वे मिळत नाहीत.

डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन तसेच केसांमध्ये कोंडा असेल तर देखील केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

मानसिक ताण तणाव वाढल्यावर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते आणि टक्कल पडू शकते.

पुरुषांमध्ये केसांची वाढ control करण्याचं काम androgen संप्रेरक करते. त्यासोबत आपल्या हाडांचा विकास, मेंदूची क्षमता विकसित करणे यासारखी महत्त्वाची कामे हे संप्रेरक करते. जेव्हा या संप्रेरकाचे प्रमाण शरीरात कमी किंवा जास्त होते तेव्हा पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.

हायपोथायरॉईडचा प्रॉब्लेम जर एखाद्या पुरुषामध्ये असेल, व्यक्तीचे केस गळणे हे सामान्य आहे. या आजारामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते.

जास्त वेळ सूर्यप्रकाशात /उन्हात राहिल्याने, उन्हाच्या डायरेक्ट प्रभावामुळे पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. सूर्यप्रकाश तसेच पोल्युशन मूळे हेअर फॉलिकल्स अफेक्ट होतात. त्यांची साईज कमी होती आणि नवीन केस येण्याची प्रक्रिया ही मंदावते किंवा थांबते.

संधिवात, हार्ड डिसीज, थायरॉईड, रक्त पातळ करणारी औषधे यांचा साईड इफेक्ट म्हणून केस गळू शकतात.

धूम्रपान करण्याची सवय जर एखाद्या व्यक्तीला असेल, तर ती केस गळतीची समस्या निर्माण करू शकते. म्हणून धूम्रपान करणारे व्यक्तीमध्ये केस गळण्याची समस्या बघायला मिळते.

ऍक्सोजेनिक एलोपिका म्हणजे शरीरात डीटीएच हार्मोनचा बॅलन्स बिघडल्यामुळे ही केस गळायला लागतात.

कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या थेरपीज जसे रेडिएशन थेरपी, केमोथेरपी यामुळे देखील केस गळतात आणि टक्कल पडते. कारण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या साईड इफेक्ट्समूळे केस गळतात.

जास्त क्षारयुक्त पाण्याने ( बोरिंगच्या पाण्याने ) केस धुतल्यामुळे ही केस गळती होऊ शकते.

समरोप –

तर आज या लेखामध्ये आपण पुरुषांचे केस गळण्याची कारणे बघितली. हे वाचून तुमचे केस गळण्याचे कारण कोणत आहे ते तुम्ही ओळखू शकता आणि जर त्यामध्ये बदल करू शकता. तर ते करून आपली केस गळती रोखू शकता. अधिक माहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट द्या.

लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top