Hi Astat Pregnancy Chi Survatichi Lakshane | गर्भधारणेच्या सुरवातीला दिसतात ही लक्षणे

‘आई बनणे’ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप स्पेशल आणि महत्त्वाचा क्षण असतो. साधारणपणे पाळीची तारीख चुकल्यावर आपण प्रेग्नेंट आहोत का ? अशी शंका आपल्या मनात येत असते. जर तुमची पाळी नियमित असेल, कधीच चुकत नसेल आणि यावेळी चुकली तर तुम्ही प्रेग्नेंट असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि जर तुमची पाळी नेहमीच आहे अनियमित असेल. दहा पंधरा दिवस मागेपुढे होत असेल तर मात्र  खूप कन्फ्युजन होतं.

प्रेग्नेंसी च्या सुरुवातीच्या काळात दिसून येणारी लक्षणे ही तुम्हाला माहीत असली, तर त्यावरून तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही हे ओळखू शकता. तुम्हाला Pregnancy chi Lakshane वाचायला मिळतील. प्रेग्नेंसी च्या सुरुवातीच्या काळात दिसणारी लक्षणे आपण इथे बघणार आहोत.

Pregnancy chi Lakshane

# Pregnancy chi Lakshane | Symptoms Of Pregnancy In Marathi

इथे आपण जी लक्षणे बघणार आहोत जरुरी नाही तुम्हाला ती सर्व लक्षणे दिसून येतील. काहींमध्ये खूप कमी तर काहींमध्ये जास्त लक्षणेही दिसू शकतात. पण तुम्ही यातली काही लक्षणे तरी तुम्हाला नक्की दिसून येतील.

१) थकवा जाणवतो –

गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रियांना थकवा जास्त जाणवतो. जेवण वगैरे केलं, आराम केला, झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवतो आणि झोप पण खूप येते. सकाळी झोपेतून उठावेसे वाटत नाही.

२) ब्रेस्ट पेन (Breast Pain) होते –

अनेक स्त्रियांना बेस्ट मध्ये जडपणा जाणवतो. स्तनांचा आकार पण वाढलेला दिसू शकतो. तसेच Breast धक्का लागल्यावर सुद्धा pain होते. हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढल्यामुळे होतं. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. हे एक सामान्य लक्षण आहे.

३) अस्वस्थता जाणवते –

काही स्त्रियांना सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटतं. जिव मळमळतो, उलटी सारखं वाटतं, पण उलटी होत नाही. तर काही स्त्रियांना दिवसातल्या कोणत्याही वेळी असा त्रास होतो. गर्भधारणा झाल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरणाचं प्रमाण वाढतं आणि शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे असं होत असतं.

४) चवीमध्ये बदल जाणवतो –

गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रियांना काही विशिष्ट गोष्टी खाव्याच्या वाटू शकतात. ज्या गोष्टी आधी त्यांना खायला आवडायच्या, त्या आता खायची इच्छा होत नाही. चवीमध्ये बदल हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यामुळे होत असतं.

५) नाकामध्ये कफ होणे –

काहींना नाकामध्ये भरल्यासारखे वाटते किंवा नाकाला सूज आल्यासारखं वाटतं. हे वाढलेले रक्ताभिसरणामुळेच होत असत.

६) मूड स्विंग होतात –

भावनांमध्ये अचानक बदल होतात. कधी हसावसं वाटतं, तर थोड्या वेळातच रडवासही वाटतं. आणि स्त्रिया या काळात जास्त इमोशनल हि होतात. असं का होत आहे हे त्यांना कळत नाही पण हे गर्भधारणेमुळे होत असतं. यामध्ये काळजी करण्याची काही गरज नाही काही काळानंतर हे कमी होत जाते.

७) रक्तस्त्राव होऊ शकतो –

गर्भधारणा झाल्या नंतर चे fertilized egg असतं, त्याच्या रोपनाची वेळ जेव्हा होते आणि ज्यावेळी गर्भाशयाच्या स्तरावर ते जोडण्याची वेळ येते तेव्हा ब्लीडिंग होऊ शकत. हे ब्लीडिंग क्षणिक असते. यामध्ये त्रासही होत नाही. पण हे ब्लीडिंग जर खूप वेळ होत राहिले. तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे.

८) Cramps येतात –

काही स्त्रियांना ओटी पोटामध्ये दुखते. तर काहींना पोटात Cramps  (पेटके) येऊ शकतात. जर असे Cramps जास्त येऊ लागले तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

९) गरगरल्यासारखे वाटते –

काही स्त्रियांना शरीर फुगल्यासारखे वाटते. काहींना चक्कर आल्यासारखे, गरगरल्यासारखेही वाटते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे रक्तपेशी प्रसरण पावतात. त्यामुळे रक्ताचा दबाव मेंटेन राहत नाही ब्लड प्रेशर कमी होतं. म्हणून चक्कर आल्यासारखं वाटतं. गर्भधारणेमध्ये बीपी कमी होणे हे सामान्य लक्षण आहे.

१०) बद्धकोष्ठता वाढते –

गर्भधारणेनंतर पचन संस्था पण मंदावू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रास होऊ शकतो. तसेच काही वेळा गॅसेसचा त्रासही होऊ शकतो.

११) सतत लघवी येते –

स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान वारंवार लघवी येऊ शकते. वाढलेल्या ब्लड सर्क्युलेशनचा किडनीवर पण परिणाम होतो आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढल्यामुळे वारंवार लघवी येते. अशा वेळी वेळीच लघवीला गेलं पाहिजे. लघवी साठवून ठेवल्यास युरीन इन्फेक्शन होऊ शकतं.

१२) उलटी मळमळ होते  –

जास्तीत जास्त स्त्रियांना मळमळ, उलटीचा त्रास हा होत असतो. मळमळ सारखं वाटणे, अन्नाचा वास येणे, भूक न लागणे, काही खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे दिसून येतात.

मित्रांनो, वर आपण प्रेग्नेंसी च्या सुरुवातीच्या काळात दिसून येणारी लक्षणे बघितली. तुम्हाला जरी यातला कोणताही त्रास होत असला, तरी काळजी करू नका. कारण गर्भ जसा वाढत जातो, तशी शरीराला सवय होत जाते आणि होणारा त्रास हा कमी होत जातो.

समारोप –

या लेखामध्ये आपण Pregnancy chi Lakshane बघितली. या लक्षणांवरून तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही हे ओळखू शकता. तुमचे काही सजेशन किंवा प्रश्न असतील, तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अन्य आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top