पोटाचा कॅन्सर झाल्यावर दिसणारी लक्षणे कोणती आहेत | Potachya CancerChi Lakhane

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र 24 वर !!!! आज या लेखांमधून आपण पोटाचा कॅन्सर झाल्यावर दिसणारी लक्षणे बघणार आहोत. पोटाचा कॅन्सर हा जगातल्या पाच प्रमुख कॅन्सर पैकी एक आहे. या कॅन्सरचा मृत्यू दर सर्वाधिक आहे. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये हा समजून येत नाही आणि खूप वाढल्यावर समजते. हा मुख्यतः ६०-७०वर्षे दरम्यानच्या पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतो.

पोटाचा कॅन्सर झाल्यावर दिसणारी लक्षणे

या आजाराबद्दल आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या खाण्यापिण्याच्या संबंधित आजार आहे. तिखट, मसालेदार, बाहेरचे अनहेल्दी फूड जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तसेच, तंबाखूचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. आपण जे अन्न खातो ते आपल्या पोटात (stomach) जमा होते. काही तासांसाठी ते पोटामध्ये असते. मग त्याचे पचन होते. पोटाचा कॅन्सर जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा काही लक्षणे दिसून येतात. ती वेळीच ओळखून योग्य त्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. आधी आपण पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे कोणती असतात ते बघू. 

पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे –

पोटाचा कॅन्सर होण्याचा नेमकं आणि मुख्य कारण अजूनही शास्त्रज्ञांना करू शकलेल नाही. तरी याचे काही risk factors असतात ते आपण खाली बघू.

⇒ जास्त प्रमाणात धूम्रपान करणे.

⇒ पोटाचा घेर जास्त असणे.

⇒ काही इन्फेक्शन्स पोटात नेहमी होणे.

⇒ जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे.

⇒ जास्त प्रमाणात प्रोसेस फूडचे सेवन करणे.

⇒ पोटात ऍसिड जास्त प्रमाणात बनणे. ऍसिड रिफ्लेक्स नेहमी होणे.

⇒ मिठाचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थाचे सेवन, मांसाहारी पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानेही पोटाच्या कॅन्सर होऊ शकतो.

⇒ जेनेटिक कारणामुळे जसे -फॅमिली मध्ये कुणाला जर पोटाचा कॅन्सर असेल तर तुम्हालाही तो होण्याचे चान्सेस असतात.

वर आपण पोटाचा कॅन्सर होण्याचे risk factors बघितले. ज्यामुळे आपल्याला पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. आता आपण पोटाचा कॅन्सल झाल्यावर दिसणारी लक्षणे कोणती असतात ते बघू.

पोटाचा कॅन्सर झाल्यावर दिसणारी लक्षणे कोणती आहेत –

पोटाचा कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तेव्हा खालील लक्षणे दिसतात →

1)  पोटात दुखणे, पोटात बेंबीच्या वरच्या भागांमध्ये  discomfort जाणवणे.

2) पोटामध्ये जळजळ होणे.

3) अपचन होणे, जेवण न पचणे.

पोटाचा कॅन्सर जेव्हा पुढच्या स्टेजमध्ये असतो तेव्हा ही लक्षणे दिसतात →

1)  भूक कमी लागणे किंवा जास्त जेवण न जाणे.

2) थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणे.

शेवटच्या स्टेजमध्ये पोटाच्या कॅन्सर चे दिसणारी लक्षणे खालील प्रमाणे आहेत →

1) उलट्या होणे, कधीकधी रक्ताच्या उलट्या होणे.

2) वजन खूप कमी होणे.

3) भूक न लागणे.

हि कॅन्सर झाल्यावर दिसणारी लक्षणे आहेत. दुर्दैवाने शेवटच्या स्टेजची लक्षणे दिसतात तोपर्यंत कॅन्सर हा खूप वाढलेला असतो.

पोटाच्या कॅन्सरचे निदान (diagnosis) सामान्यतः एन्डोस्कोपी(endoscopy) द्वारे केले जाते. यामध्ये तोंडाद्वारे एक दुर्बीण टाकून त्याद्वारे पोटामध्ये तपासणी करून बायोप्सीचे तुकडे घेतात. ही पोटाच्या कॅन्सरचे निदान करण्याची खूप सोपी आणि अचूक पद्धत आहे. त्यानंतर आजार ज्या स्टेजमध्ये असेल त्यानुसार डॉक्टर सिटीस्कॅन वगैरे आणि पुढील उपचार सांगतात.

समारोप –

तर आज आपण या लेखांमधून पोटाचा कॅन्सर झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात ते बघितले. त्यासोबतच पोटाचे कॅन्सर साठी कारणीभूत असणारे risk factors ही बघितले. पोटाचा कॅन्सर हा सुरुवातीचे स्टेज मध्ये असेल तर तो सर्जरीद्वारे दूर करणे सोपे आहे. म्हणून जर तुम्हाला पोटदुखी अपचन सारखी लक्षणे वारंवार दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याबद्दल डॉक्टरांना सांगून योग्य ती टेस्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे आदर्श सुरुवातीला तर माहित पडलं तर त्यातून आपण लवकर बरे होऊ शकतो.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top