ही आहेत पोट साफ न होण्याची लक्षणे | Pot Saaf Na Honyachi Lakshane

नमस्कार मित्रांनो, पोट साफ न होणे ही एक सामान्य तक्रार आहे. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. पोट साफ न होण्यामागे पचनासंबंधी कारणे असू शकतात. एखाद्या वेळी हे मोठ्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. जर तुम्हाला शौच नियमित होत नसेल तर तुम्ही लगेच मला बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रास आहे असे म्हणू शकत नाही. बद्धकोष्ठतेची काही लक्षणे आहेत जी आपण या लेखामधून बघणार आहोत. त्यासोबतच पोट साफ न होण्याची लक्षणे कोणती असतात ते पण बघणार आहोत.

पोट साफ न होण्याची लक्षणे

गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे बाहेरचे मैद्याचे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यासोबत शारीरिक हालचाल कमी झाली त्यामुळे पोट साफ न होण्याचे प्रमाणही वाढले आणि परिणामी बद्धकोष्ठताही वाढली. आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यामुळे असा त्रास होतो. एका सायंटिफिक स्टडी मध्ये असे दिसून आले आहे की दर १०० पैकी 16 जणांना आपल्या जीवन काळामध्ये कधी ना कधी  बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो.

पोट साफ न होण्याची लक्षणे –

⇒ कोणत्याही प्रौढ निरोगी व्यक्तीला दिवसातून कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त दोन वेळा शौचाला गेलं पाहिजे.

⇒ जर तुम्हाला अनियमित म्हणजे कधी कधी शोध होत असेल आणि इतर कोणत्याही प्रकारची त्रास होत नसतील.

⇒ जसे शौच करताना त्रास होणे, जास्त जोर लावायला लागणे, पोट दुखणे असे त्रास नसतील तर तुम्हाला कोणताच serious problem नाहीये. कारण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमची फंक्शनिंग वेगवेगळी असू शकते. म्हणून प्रत्येकाचा पोट साफ होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो.

बद्धकोष्ठतेला इंग्रजीमध्ये constipation असे म्हणतात. बद्धकोष्ठता म्हणजे काय ? बद्धकोष्ठतेची लक्षणे कोणती असतात ते पण बघू.

बद्धकोष्ठता म्हणजे काय ?

सकाळी उठल्यावर शौच होत नसेल किंवा शौचाला जाऊन आल्यावर पोट साफ झाल्यासारखे वाटत नसेल, खूप कोरडी किंवा कडक शौच होत असेल आणि दहा ते पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ जास्त बसावे लागत असेल, वारंवार शौचाला करण्याची इच्छा होत असेल, तर अशा व्यक्तीस बद्धकोष्ठतेचा ञास आहे असे आपण म्हणतो. वरीलपैकी दोन लक्षणे जरी तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला हा त्रास आहे असे तुम्ही म्हणू शकता.

  • बद्धकोष्ठतेचे दोन प्रकार आहेत –
  1. प्रायमरी कॉन्स्टिपेशन (Primary constipation )
  2. सेकंडरी कॉन्स्टिपेशन (secondary constipation )

पोट साफ न होण्याची लक्षणे

1. प्रायमरी कॉन्स्टिपेशन (Primary Constipation) –

हा एक सामान्य डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहे. कोणत्याही आजाराशिवाय अशा प्रकारचा त्रास होतो, त्याला प्रायमरी कॉन्स्टिपेशन म्हणतात.

याचे आणखी प्रकार खालील प्रमाणे आहेत –

1) नॉर्मल मोटीलिटी कॉन्स्टिपेशन ( Normal motility constipation ) –

– यामध्ये तुमचा आतड्यांची हालचाल व्यवस्थित असते, तरी त्यांना बद्धकोष्ठता आहे असं वाटतं.

2) स्लो ट्रांजिट कॉन्स्टिपेशन ( Slow Transit Constipation) –

– यामध्ये आतड्यांची हालचाल कमी असल्यामुळे रोज पोट साफ होत नाही. कधी कधी किंवा आणायची शौच होते.

3) आय बी एस कॉन्स्टिपेशन (  IBS constipation ) –

– यामध्ये पोट साफ न झाल्यामुळे पोट दुखतं. तसेच व्यक्तीला नेहमी discomfort फील होतं.

2. सेकंडरी कॉन्स्टिपेशन ( Secondary Constipation)

⇒ हा त्रास होण्यामागे कोणता तरी आजार कारणीभूत असतो. जसे आतड्यांमध्ये अल्सर किंवा गाठ असेल, आतड्यांचा कॅन्सर असेल, टीबी असेल तर यामुळे सेकंडरी कॉन्स्टिपेशन होते.

⇒ त्यासोबतच hypothyroid, diabetes, paralysis, पाठीचा कण्यासंबंधित काही आजार असतील, तरी या प्रकारचे कॉन्स्टिपेशन होऊ शकते.

⇒ जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशरची तसेच कॅल्शियमची औषधे घेत असाल तर त्यामुळे ही बद्धकोष्ठता होते.

पोट साफ होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ?

⇒ जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन चा त्रास खूप दिवसांपासून होत असेल आणि घरगुती उपायांनी जसे खाण्यापिण्यामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल करून सुद्धा आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे.

⇒ शौच मधून रक्त येत असेल, शौच नियमितपणे होत नसेल वारंवार जुलाब होत असतील तरीदेखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

⇒ जर पोटातून गॅस पास होताना त्रास होत असेल आणि पोट गच्च झालेल वाटत असेल, तरी डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे.

समारोप –

तर आज या लेखामध्ये आपण पोट साफ न होण्याची लक्षणे, बद्धकोष्ठता म्हणजे काय आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आपण कधी घेतला पाहिजे हे सुद्धा बघितले. मला आशा आहे की तुम्ही ज्या माहितीच्या शोधात असाल ती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळाली असेल. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top