नमस्कार, आपल्यातील बहुतेकांना पिंपलचा त्रास हा कधी ना कधी होतच असतो. आपल्या त्वचेला सुंदर बनवण्यासाठी आणि पिंपल्स तसेच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी घरगुती उपाय करणे कधीही फायद्याचे ठरते या लेखांमध्ये तुम्हाला पिंपल्सवर प्रभावी असलेले आयुर्वेदिक उपाय वाचायला मिळतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही पण आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करू शकता.
सुरुवातीला आपण पिंपल्स बद्दल थोडं जाणून घेऊ.
पिंपल्स हे मुख्यतः चेहऱ्यावर – गाल, कपाळ आणि हनुवटीवर येत असतात. कधी कधी हे मानेवर छातीवर आणि पाठीवरही बघायला मिळतात. वयाच्या 12व्या वर्षापासून ते 26 – 27 वर्षांपर्यंत पिंपल्सचा त्रास हा जास्त होत असतो. आपली त्वचा आणि केसांना कोरडे रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी निसर्गाने आपल्याला काही ग्रंथी दिल्या आहेत. ज्या आपल्या त्वचेखाली असतात. या ग्रंथी एक तेलासारखा पदार्थ बनवतात, ज्याला सीबम म्हणतात. आणि हा पदार्थ हळूहळू रोम छिद्रातून बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर आपल्या त्वचेवर एक तेलकट थर बनवतो ज्यामुळे आपली त्वचा आणि केस कोरडे होत नाहीत. त्याचबरोबर डेड स्किन सेल्सही या छिद्रांतून बाहेर येत असतात. पण जेव्हा डेड स्कीन आणि सीबम जास्त प्रमाणात येतात तेव्हा पिंपल्स होतात.
चेहऱ्यावर पिंपल्स होण्याची मुख्य कारणे –
⇒ अनेकदा harmonal imbalance मुळे ही पिंपल्स होऊ शकतात.
⇒ अनेकदा काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. मग त्यावर लक्ष ठेवून ते avoid करणे गरजेचे असते.
⇒ आपला ताण तणाव, tension हे आपल्या मानसिक स्थिती सोबत शरीरावरही परिणाम करत असते. तणावामुळे शरीरातून असे काही हार्मोन्स उत्पन्न होतात जे आपल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकतात आणि त्यामुळे पिंपल्स त्रास होतो.
⇒ जास्त संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना स्किन वर पुरळ, ब्लॅकहेड्स व्हाइट्सचा त्रास जास्त होतो.
जास्त oily आणि जास्त dry skin असेल तर एखादा विशिष्ट bacteria त्वचेवर जमा होतो जो पिंपल्सचे कारण बनतो.
⇒ काही औषधांचा side effect मुळे ही पिंपल्स येऊ शकतात.
⇒ पिंपल फोडल्यामुळे त्याच्या आतील बॅक्टेरिया बाकी स्किन वर पण पसरतात आणि पिंपल्स चे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता असते. त्यासोबतच पिंपल फोडल्यामुळे तेथील skin cells पूर्णपणे damage होऊन पिंपलचा डाग कायमचा चेहऱ्यावर राहून जातो.
⇒ खूप जास्त फक्त प्रमाणात कॉस्मेटिक आणि मेकअप चा वापर केल्यामुळे ही पिंपल्स त्रास होतो.
पिंपल्स वर प्रभावी असे आयुर्वेदिक उपाय –
१. पिंपल आलेल्या भागावर एलोवेरा जेल लावल्याने पिंपल लवकर बरा होण्यास मदत होते.
नॉर्मली पण तुम्ही जर आपल्या चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावले तर पिंपल्स येणारच नाहीत. जर तुमची स्किन ओईली असेल तर तुम्ही नुसतेच एलोवेरा जेल लावू शकता. dry skin असणारे एलोवेरा जेल मध्ये काही थेंब ग्लिसरीन मिक्स करून लावू शकता.
२. जायफळ पाण्यासोबत उगाळून त्याचा लेप फक्त पिंपल असलेल्या भागावर लावावा. यामुळे तुम्हाला थोडी जळजळ होऊ शकते. पण जायफळीमुळे पिंपल्स लवकर कमी होतात.
३.कडुलिंबाची पाने घेऊन ती मिक्सरमध्ये वाटून paste करून घ्या यामध्ये एक. चमचा एलोवेरा जेल, एक चमचा बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
→ हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावा. पिंपल्स वर मिश्रणाने हलक्या हाताने थोडं rub करून लावा.
→ पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाका.
→ चार-पाच दिवस हा उपाय केल्याने पिंपल्स पूर्ण दूर होण्यास मदत होते.
→ कडुलिंब लावण्याच्या उपाय सोबतच तुम्ही कडुलिंबाच्या पानांचे सेवन ही करू शकता. सकाळी उठल्यावर चार ते पाच कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पिंपल्स मध्ये फायदा मिळतो.
सलग सात दिवस असे केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि रक्तही शुद्ध होते.
४. चेहऱ्यावरील बॅक्टेरियाला रोखण्याचा काम तुळस करते आणि पुरळ मुरूम यांना दूर करण्यासाठी मदत करते. पिंपल्स साठी असरदार असे तुळशी पासून बनवलेले काही फेस पॅक आपण खाली बघू.
१) तुळशीचे काही पाने घेऊन ते क्रश करून त्याचा रस काढून घ्या. यामध्ये थोडा मध मिक्स करून मग हा पॅक चेहऱ्यावर लावा.
विशेषतः पिंपल्स ठिकाणी लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका.
२) तुळशीच्या पानांचा रस काढून घ्या त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावर लावा.
→ पिंपल्स दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तुम्ही वरील फेस पॅक वापरू शकता.
३) तुळशीच्या पानांच्या रसामध्ये चिमूटभर हळद टाकून पिंपल्स झालेल्या भागावर हा लेप लावा. तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरही लावू शकता. → असे चार-पाच दिवस केले तर पिंपल पूर्णपणे नाहीसा झालेला तुम्हाला दिसेल.
५. अर्धा चमचा गुलाब चूर्ण, अर्धा चमचा वाळा चूर्ण आणि दोन चमचे मुलतानी माती घ्या यामध्ये दूध घालून पेस्ट तयार करा.
चेहऱ्यावर हा पॅक लावा. दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाका.
पिंपल्स दूर ठेवण्यासाठी काही टिप्स –
⇒ हेल्दी डायट चा आपल्या आहारात समावेश करायला हवा आणि जंक फूड खाणे जेवढे होईल तेवढे टाळले पाहिजे.
⇒ पिंपल्स चा प्रॉब्लेम वारंवार होत असेल तर त्याचे नक्की कारण कोणते आहे हे शोधून काढले पाहिजे.
⇒ जास्त पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी तर चांगले असते पण आपल्या स्किन साठी पण चांगले असते. पिंपल्स चा त्रास कमी करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिलं पाहिजे.
⇒ गरम मसाल्याचे पदार्थ किंवा गरम पदार्थ जसे चहा कॉफी यांसारखे पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
समारोप –
मित्रांनो, पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला बाहेरून उपाय करण्यासोबतच शरीर आतून हेल्दी राहील याकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे. आज आपण पिंपल्स वर प्रभावी असे आयुर्वेदिक उपाय बघितले आणि पिंपल्स का होतात याची कारणेही जाणून घेतली. तुम्ही पण हे उपाय करून बघा. आणि ब्युटी आणि आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!