अनेकदा कोणी आजारी असेल, तेव्हा आपण अस ऐकतो की पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत किंवा कमी झाल्या आहेत. पण या पेशी म्हणजे नक्की काय ? आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी किती असल्या पाहिजेत याबद्दल आपल्यातील बहुतेकांना माहिती नसते. पांढऱ्या रक्तपेशी या आपल्या इम्यून सिस्टीम चा एक भाग असतात. जर तुमच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी असतील तर हे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर बनवते. आपल्या शरीरात जर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर या पेशींची संख्या वाढते. आपल्या शरीरात असणाऱ्या या पेशिंबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे , म्हणजे आपण कुणाचे काही एकूण घाबरून जात नाही. या लेखांमध्ये तुम्हाला पांढऱ्या पेशींबद्दल माहिती जाणून घ्यायला मिळेल. चला तर मग बघूया पेशी काय असतात ते.
# पांढऱ्या पेशी म्हणजे काय ?
आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात –
१. पांढऱ्या पेशी
२. तांबड्या पेशी
३.प्लेटलेट पेशी
पांढऱ्या पेशींना WBC ( white blood cells) किंवा ल्यूकोसाइटस असेही म्हणतात. या पेशींना ” सैनिक पेशी ” ही म्हटलं जातं कारण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे काम या पेशी करत असतात. आपल्या शरीरावर जेव्हा बाहेरच्या वायरस किंवा जंतूंचा संसर्ग/ अटॅक होतो तेव्हा त्यांच्यापासून आपल्याला वाचवण्याचे काम या पेशी करतात.
पांढऱ्या रक्त पेशींचा जीवनकाळ कमी असतो. यांचा आकार गोल, stripped किंवा अनियमित असू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की, शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित काम करते आहे असा त्याचा अर्थ होतो. हि रोग प्रतिकारक शक्ती का कामाला लागते ? तर शरीरामध्ये रोगजंतूंचा शिरकाव झालेला असतो. त्याच्या विरोधात या सैनिक पेशी कामाला लागतात. म्हणून त्यांची संख्या ही वाढते. शरीरामध्ये एखादा इन्फेक्शन झालं असेल किंवा सूज असेल तेव्हाही पांढऱ्या पेशी वाढतात.
पांढऱ्या पेशींचे पाच प्रकार असतात –
१.न्यूट्रोफिल्स
२. लिंम्फोसाईटस
३.मोनो साईट
४. बेसोफील्स
५. ईओसिनोफिल्स
वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये वेगवेगळ्या पेशींचे प्रमाण हे वाढत असते. न्यूट्रोफिल्सची संख्या रक्तामध्ये आपल्या जास्तीत जास्त आढळते. पांढऱ्या रक्तपेशी या प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन उत्तेजित करत असतात.
# शरीरामध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण किती पाहिजे ?
साधारणपणे निरोगी व्यक्तीच्या शरीरात पांढऱ्या पेशी/ ल्यूकोसाइटस ची संख्या. 4000 ते 11000 / microlitre च्या दरम्यान असते.
ही संख्या व्यक्तीच्या लिंग आणि वयानुसार कमी जास्त होत असते. पुरुषांमध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण 5000 ते 10000 / microlitre च्या दरम्यान असते. तर महिलांमध्ये हे प्रमाण 4500 ते 11000 / microlitre च्या दरम्यान असते आणि लहान मुलांमध्ये हे पुरुषांप्रमाणेच 5000 ते 10000 / microlitre यादरम्यान असते. ही संख्या नवजात बालकांमध्ये आणि प्रेग्नेंट महिलांमध्ये वेगळी असू शकते. आणि दोन वेगवेगळ्या लॅब्स मध्ये देखील यांची संख्या वेगवेगळी दिसून येऊ शकते.
समारोप –
तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण पांढऱ्या पेशंट बद्दल खूप काही जाणून घेतले आणि आपल्या शरीरात पांढऱ्या पेशींचे प्रमाण किती असले पाहिजे तेही बघितले. आता तुम्हाला समजले असेल आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी किती असल्या पाहिजे. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
FAQs
Q1. पांढऱ्या पेशी कमी झाल्यास काय खावे?
Ans – व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेली फळे खाल्ल्याने पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. जसे पेरू, पपई, संत्री, लिंबू यांसारखी फळे खाल्ल्याने या पेशी वाढण्यास मदत होते.
Q2. पांढऱ्या पेशी वाढणे म्हणजे काय?
Ans – पांढऱ्या पेशींची खूप जास्त प्रमाणात वाढ होण्याला ल्युकोसाइटोसिस म्हणतात. आणि या पेशींची संख्या खूप जास्त प्रमाणात कमी होण्याला ल्युकोपोनिया म्हणतात. खूप जास्त शारीरिक श्रम, वेदना, तीव्र भावनिक प्रतिक्रिया, इन्फेक्शन, प्रेग्नेंसी, नशा, तसेचवेगवेगळ्याआजारांमध्येपांढऱ्या पेशींची संख्या वाढू शकते.
Q3. कमी रक्त संख्या म्हणजे काय?
ANS – जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे सांगितले जाते कि त्याच्या शरीरामध्ये रक्ताची संख्या कमी झाली आहे, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये सायटोपोनिया असे म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ असा होतो कि त्याच्या शरीरात तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी किंवा प्लेटलेट्स कमी आहेत.
Q4. पांढऱ्या रक्त पेशी कमी असल्यास कोणते पदार्थ टाळावेत?
ANS – पांढऱ्या रक्तपेशी कमी असल्यास त्या व्यक्तीने कच्चे दूध, कच्च्या दुधाने बनवलेले दही किंवा चीज, पॅकेज्ड ज्यूस हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.