मित्रांनो नवरा बायकोचं नातं हे इतर नात्यांपेक्षा खूप वेगळ्या आणि स्पेशल असतं. परंतु दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या व्यक्ती जेव्हा संपूर्ण आयुष्य सोबत घालवतात तेव्हा तिथे तडजोड एकमेकांना समजून घेणे हे तर आलंच. काही वर्षांपूर्वी पर्यंत नवरा बायकोचे माध्यम मध्ये आपलेपणा, नातं टिकवण्याची भावना होती, अलीकडे मुली स्वतःच्या पायावर उभे आहेत नवऱ्याच्या बरोबरीने कमवत आहेत, तर त्या कोणतीच अड्जस्टमेंट करायला तयार नसतात म्हणून मग गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. नवऱ्याने बायको सोबत कसे वागावे म्हणजे नातं आणखी सुंदर आणि घट्ट बनत जाईल ते बघणार आहोत.
अलीकडच्या काळात मुलांपेक्षा कोणत्या गोष्टीत मागे नाहीत. जपानी घर दोन्ही संभाळत कार्य वर्षे कसरत करत असतात. आपल्याकडे पुरुषप्रधान समाज असल्याने घरातील सर्व काम फक्त बायकोनी केली पाहिजे अशी नवऱ्यासोबत घरातल्या सर्वांची इच्छा असते. अशामुळे मग भांडण, तक्रारी सुरू होतात. म्हणून बायकोला समजून घेण्याची गरज असते. शक्य असेल तिथे घराचे काम वाटून घेतलीत तर तिचे हे काम सोपे होईल आणि आपल्या जोडीदाराबद्दल तिच्या मनात आदर आणि प्रेम वाढेल.
नवऱ्याने बायको सोबत कसे वागावे ?
⇒ नवऱ्याने बायको सोबत एखाद्या नवऱ्यासारखं न वागता मित्रासारख वागलं एक असा मित्राच्या सोबत ती आपल्या मनातला सर्व काही शेअर करू शकेल. असं वागल्यामुळे कधी भांडण जरी झाली तरी ती लवकर विसरून जायला मदत होते.
⇒ कोणत्याही नात्याचा मुख्य आधार हे प्रेम असते. म्हणून नवरा बायको दोघांनीही एकमेकांसोबत प्रेमाने वागणे हे नात्यामध्ये खूप महत्त्वाचे असते. प्रेम असेल तर एकमेकांच्या चुका शोधल्या जात नाही किंवा असतीलही तरीही त्यांचा स्वीकार करणे सोपे जाते.
⇒ आपण केलेल्या चांगल्या कामांसाठी नवऱ्याने दोन कौतुकाची शब्द बोलावे असे तिला मनातून वाटत असतं. म्हणून दोष चुका सांगणे सोबतच नवऱ्याने चांगल्या कामांसाठी बायकोची प्रशांत जरूर केली पाहिजे.
⇒ जगामध्ये प्रत्येक नवरा बायकोचे कधी ना कधी भांडण होतच असते. नवऱ्याने काही बोललं तर तिला काही वाटत नाही पण मुलांसमोर आणि समाजासमोर जर त्याचा अपमान केला तर त्याचा तिला खूप त्रास होतो. म्हणून नवऱ्याने आपल्या मुलांना समोर आणि समाजासमोर बायकोचा अपमान होईल असे वागू नये.
⇒ चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये नवऱ्यासोबत खंबीरपणे उभे असलेल्या बायकोचे एक साधी अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने आपल्याला सन्मानाची वागणूक द्यावी. तिचेही काही अस्तित्व आहे याचे भान ठेवावे. प्रत्येक गोष्टीत पुरुषाचा अहंकार न आणता तिच्याही मनाचा विचार करावा. प्रत्येक नवऱ्याने बायकोला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.
⇒ असं म्हणतात पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसते तर नवऱ्याचा खरा स्वभाव पत्नीच्या आजारपणात पत्नी आजारी पडली की पूर्ण घरच थांबते अशावेळी तिला कुणाची सर्वात जास्त साथ हवी असते तो म्हणजे नवरा. आयुष्यभर आपल्या घरासाठी झटणाऱ्या पत्नीची पतीने तिच्या आजारपणात काळजी घेतली पाहिजे.
⇒ नवरा आणि बायकोचे जास्त विवाद होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बायकोच्या घरचे नवऱ्याला आवडणे. पण प्रत्येक नवऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासाठी ती आपलं घर आई वडिलांना सोडून आली असते, हे वाटते तितकं सोपं नाही. तिचे आई वडील भाऊ हे पण तिचे आपलेच आहेत. जसे नवऱ्याच्या घरातल्यांना ती आपल्या मानते तसेच त्यांनीही तिच्या घरच्यांना आपले मानले पाहिजे अशी तिची अपेक्षा असते. प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोच्या घरच्यांसोबत आदराने आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये वाद कमी होतील.
समारोप –
तर मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण नवऱ्याने बायको सोबत कसे वागावे त्यामुळे नवरा बायकोचे नाते अधिक सुंदर बनायला मदत होईल याबद्दल माहिती बघितली. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!