हिवाळ्यामध्ये होणारी सर्दी हि एक सामान्य बिमारी आहे. पण सर्दीमुळे येणाऱ्या शिंका, वाहणारे नाक, डोके जाड होणे, यासारखी लक्षणे आपल्याला हैराण करून सोडतात. सामान्यतः सर्दी हि virusमुळे होत असते. आणि आपल्याला माहित आहेच कि हा संसर्गजन्य आजार आहे. सर्दी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर ती आपल्याला पण होऊ शकते. काहीजणांना एलर्जी मुळे पण सतत सर्दी होत असते. पण सर्दी झाल्यावर लगेच आपण डॉक्टरकडे तर जात नाही. कारण ती ५ – ६ दिवसांमध्ये आपोआप बारी होते. पण सर्दीमध्ये होणार त्रास कमी करण्यासाठी आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेल्या घरगुती उपचारांची मदत आपण नक्कीच घेऊ शकतो.
हे घरगुती उपाय आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा उपयोग करून सहजपणे करू शकतो. शिवाय यांचा कोणताच side effect पण नसतो. या लेखामध्ये मी नाकातून पाणी येणे यावर घरगुती उपाय सांगणार आहे. यामध्ये खूप सोपे आणि असरदार उपाय तुम्हाला वाचायला मिळणार आहेत म्हणून जर तुम्ही सर्दी वर घरगुती उपाय शोधात असाल तर हा लेख पूर्ण वाचा.
सर्दी का होते ?
आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा काही विषारी घटक नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यापासून बचावासाठी शरीर एक प्रकारचा चिकट पदार्थ तयार करते. हा द्रव नेहमीच कमी जास्त प्रमाणात आपल्या शरीरात तयार होत असतो. त्याला आपण कफ असं म्हणतो.
हा पदार्थ शरीराच्या मालिकांना अपाय होण्यापासून वाचवत असतो. विषारी घटक, virus वगैरे ह्या द्रव्याला चिटकून बसतात आणि त्यांना फुफुसापर्यंत पोहोचू देत नाहीत. पण हे द्रव्य जास्त प्रमाणात झाल्यावर हवेला सुद्धा आत प्रवेश करू देत नाही मग त्याला आपण नाक बंद होणे किंवा सर्दी पिकली असं म्हणतो. नाकातून पाणी वाहने हि सर्दीची सुरवातीची स्थिती असते. सर्दीलाच आपण नाकातून पाणी येणे असं म्हणत असतो.
नाकातून पाणी येण्याची लक्षणे (सर्दीची )-
- डोळे जळजळणे
- डोकं जाड होणे
- गळ्यामध्ये खवखवणे
- श्वास घ्यायला त्रास होणे
- ताप येणे
- खोकला येणे
- सतत शिंका येणे
- नाकामध्ये खाज येणे
सर्दीची लक्षणे आपण बघितली. आता बघूया ह्या सर्दीवर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो ते.
नाकातून पाणी येणे यावर घरगुती उपाय –
नाक वाहने बंद होण्यासाठी तसेच सर्दीच्या इतर लक्षणांमध्ये आराम मिळावा म्हणून तुम्ही खालील घरगुती उपाय नक्की करून पहा.
१. सर्दीवर असरदार काढा –
सर्दी होण्याच्या सुरवातीला हा उपाय जर तुम्ही केला खूप फायदा होतो. जास्त प्रमाणात सर्दी होतच नाही पण जर तुम्हाला सर्दी अगोदरच झाली असेल तरीसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता.चला तर मग बघूया या उपायासाठी आपल्याला कोणते साहित्य लागेल.
साहित्य –
- १ खाण्याची पाने १ ते २ (ज्याचा विडा बनवतात ती पाने )
- 2 तुळशीची पाने १० ते १२
- ३ सुंठ चिमूटभर
- ४ काळीमिरी २ ते ३
हा काढा बनवण्यासाठी लागणारी पाने तुमच्या घरी उपलब्ध नसली तरीही ती तुम्हाला आरामात बाजारामध्ये मिळून जातील. बाकी साहित्य आपल्या घरात असतंच.
कृती –
- एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या.
- त्यामध्ये वरील सर्व साहित्य टाका. खायची पाने तसेच तुळशीची पानेही बारीक तोडून टाका, सुंठ क्रश करून टाका म्हणजे त्याचा पूर्ण अर्क पाण्यात येईल.
- काढा मंद ते स्लो आचेवर चांगले उकळू द्या.
- याची quantity जेव्हा हाफ बाकी राहील (म्हणजे आपण १ ग्लास पाणी टाकलं होत ते अर्धा ग्लास होईल ) तेव्हा खाली उतरून घ्या.
- यामध्ये एक गुळाचा खडा टाका आणि काढा कोमट झाल्यावर सिप सिप करून पिऊन घ्या. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं दिवसातून दोन वेळा तुम्ही हा काढा घेऊ शकता.
- हा घेतल्यानंतर अर्धा तास काही खाऊ नका आणि उपाशीपोटी घेतला तर अति उत्तम.
हा उपाय तुम्ही २- ३ दिवस करून बघा. यामध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग आपण केला आहे त्यामुळे तुमची immunity पण वाढेल. आणि वाहत्या नाकापासून पण आराम मिळेल.
फायदे –
- यामध्ये आपण खायची पाने आणि तुळशीच्या पानांचा उपयोग केला आहे. जी शरीराची immunity boost करण्यात मदत करतात सोबत antibodies पण वाढवतात.
- त्याचबरोबर आपण सुंठ आणि काळीमिरीचा वापर केला आहे. ज्यामध्ये anti inflametory प्रॉपर्टीज असतात. जे सर्दीमध्ये आराम देण्यात मदत करतात.
२. सर्दीमध्ये उपयुक्त Accupressure Point Therepy –
हा खूप सोपा पण तितकाच असरदार उपाय आहे. याने आपल्याला सर्दीच्या सर्व त्रासांपासून त्वरित आराम मिळतो. या accupressure point चा नाव आहे – LI -20 म्हणजेच Large Intestine चा 20 Number चा point .दोन्ही नाकपुड्यांचा कोपऱ्याचा जो भाग आहे तिथे आपल्याला दाब द्यायचा आहे.
कृती –
- तस तर आपण एका वेळी दोन्ही बाजूला दाब देऊ शकतो पण सर्दीमुळे नाक बंद असेल तर एका वेळी एक साईड असं करा.
- हाताच्या पहिल्या बोटाचा उपयोग करून तुम्हाला हे pressure द्यायचं आहे. वर चित्रामध्ये दाखवलं आहे तो आपल्या चेहऱ्यावरचा पॉईंट शोधा. मग त्यावर दबाव द्या.
- दबाव देताना तुम्हाला तिथे pain होत नाही तोपर्यंत द्या. मग त्याच स्थतीमध्ये constant दबाव देत राहा. हे करताना breath in , breath out वर लक्ष केंदित करा.
- यासोबतच तुम्हाला visualaise पण करायचं आहे कि श्वास सोडताना आपल्या नाकाच्या आसपास जमा झालेले toxins , negative energy नाकावाटे बाहेर जाते आहे. आणि श्वास आत घेताना positive energy शरीराला मिळत आहे, ब्लड फ्लो वाढत आहे, मुबलक ऑक्सिजन शरीराला मिळत आहे. हे तुम्ही ५ मिनिटे करू शकता.
- थोड्या वेळेच्या अंतरानेअजून काही वेळ काही शकता.
- visualisation मुळे accupressure जास्त effective होते आणि लवकर आराम मिळण्यास मदत होते.
- अशा प्रकारे एका बाजूने करून झाल्यावर दुसऱ्या बाजूने करा.
- हा उपाय केल्यावर तुम्हाला लगेच दिसून येईल कि तुमचं नाक मोकळं झालं आहे आणि नाक गळणे पण बंद झालं आहे.
फायदा –
- हा Accupressure Point प्रेस केल्यामुळे LI – 20 पॉईंट हा एनर्जी मध्ये आलेल्या ब्लॉकेज ला क्लिअर करतो.
- ज्यामुळे नाकाच्या आसपासच्या भागाजवळचा एनजि फ्लो नॉर्मल होतो. आणि सर्दीचा सर्व त्रास थांबतो.
३ . तोंडात पाणी ठेवण्याचा उपाय –
ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांनी हा उपाय करून बघा नक्की फायदा होईल.
कृती –
- आंघोळ करतांनी म्हणजे आंघोळीला जाण्यापूर्वीच तोंडामध्ये पाणी ठेवावे.
- पूर्ण आंघोळ होईपर्यंत ते पाणी तोंडातच राहू द्या.
- आंघोळ झाल्यावर तोंडातले पाणी बाहेर थुंकून टाका.
- तुम्हाला असं लक्षात येईल कि पिताना थोडं थंड पाणी तुम्ही प्यायले होते ते आता गरम झालं होत. पाण्याचे तापमान वाढले. शरीरातील उष्णता हे सर्दी होण्याचे एक कारण आहे.
- ती उष्णता तोंडातील पाण्यावाटे बाहेर निघून गेल्यामुळे सर्दी होणे बंद होते.
- हा उपाय तुम्ही १ – २ महिने सलग नियमितपणे करून बघा.
छोटासा असला तरी खूप परिणामकारक असा हा उपाय आहे. वारंवार होणारी सर्दी यामुळे खूप प्रमाणात कमी होते. याचा फायदा अनेकांना झालेला आहे तुम्हाला पण नेहमी सर्दीचा त्रास असेल तर उद्यापासूनच हा उपाय सुरु करा.
४. लसूण –
लसूण हे सर्दीवरील परिणामकारक उपायांपैकी एक आहे. हे लसूण तुम्ही सूप वगैरेंच्या माध्यमातून घेऊ शकता. तसेच कच्च्या लासनापासून पण पेय बनवू शकता किंवा नुसताच कच्य्या लसणाचे देखील सेवन करू शकता.
५. भरपूर पाणी प्या –
सर्दीमध्ये तुम्ही आपल्या शरीराला hydrate ठेवले पाहिजे. म्हणून अशावेळी भरपूर कोमट पाणी प्या. द्रव पदार्थ आपल्याला सर्दी मध्ये आराम देण्यात मदत करतात. म्हणून जास्त द्रव पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काढा , चहा, सूप, फळांचा रस घेऊ शकता.
६. गरम पाण्याची वाफ –
रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याची वाफ जरूर घ्या. पाण्यामध्ये काही थेंब(५ – ७) निलगिरीचे तेल किंवा १ चमचा vicks vaporub टाकू शकता. यमुअळे नाक मोकळे होऊन आराम मिळतो.
काही इतर उपाय –
- जोपर्यंत सर्दी बसत नाही तोपर्यंत गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
- ज्यांना नेहमी सर्दी होते त्यांनी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर दोन्ही नाकपुड्यांना तूप लावू लावावे.
- या सर्व उपायांनी आराम मिळत नसेल आणि जास्त त्रास जाणवत असेल तर डॉक्टरकडे जा.
सर्दी झाली असेल तर या गोष्टी टाळा –
- नेहमी आंघोळ करणे टाळा.
- थंड पदार्थ जसे ice cream थंड पाणी पिणे पूर्णपणे बंद करा.
- सर्दी झाली असेल तर या गोष्टी टाळा –
- वारंवार आंघोळ करणे टाळा.
- थंड पदार्थ जसे ice cream थंड पाणी पिणे पूर्णपणे बंद करा.
- केळी, टरबूज, पेरू यांसारखी थंड प्रकृतीची फळे खाणे शक्यतोवर टाळावे.
- प्रवास करत असाल तर खिडकी जवळ बसू नका. बाहेरच्या हवेमुळे त्रास वाढेल म्हणून स्कार्फ बांधूनच प्रवास करावा.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण नाकातून पाणी येणे यावर काही घरगुती उपाय बघितले. सर्दी का होते ? हे पण जाणून घेतले. सर्दी झाल्यावर होणार ताप, खोकला, बंद नाक, गळणारे नाक यावर आज औषधे उपलब्ध आहेत. पण घरगुती उपाय हे सोपे पण असतात आणि त्यांचा कोणताच अनिष्ट परिणाम पण आपल्या शरीरावर होत नाही. तर तुम्हाला पण सर्दी असेल तर हे उपाय नक्की करून बघा आणि आरोग्यविषयक अन्य लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
FAQs
Q1. माझे नाक सतत का टपकते?
Ans – नाकाच्या आतील भागाला झालेल्या संसर्गामुळे हे होऊ शकते. सर्दी सारखे संसर्ग किंवा ऍलर्जी मुळे देखील नाकातून पाणी वाहू शकते.
Q2.रात्रभर खोकल्यापासून मुक्त कसे व्हावे?
Ans – खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही झोण्यापूर्वी गरम दूध, काढा यांसारखी गरम पेये पिऊ शकता. दिवसातून दोन वेळा आल्याचा रस आणि मध प्रत्येकी १ -१ चमचा मिक्स करून घेतल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो.