हे आहेत मोबाईलचे फायदे आणि तोटे | Mobileche Fayade Aani Tote In Marathi

सध्याच्या काळात मोबाईल ही फक्त एक वस्तू राहिली नसून प्रत्येकाची गरज बनला आहे. आधुनिक युगातला सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक शोध जर कुठला असेल, तर तो मोबाईल आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण त्याचे फायदेही तसेच आहेत. अलार्म क्लॉक, घड्याळ, कॅलेंडर, बँकेची कामे शॉपिंग तसेच इतर महत्त्वाची कामे मोबाईलवरून करता येतात. पण मोबाईलच्या फायद्यांसोबत काही तोटे सुद्धा आहेत. आज या पोस्टमध्ये आपण मोबाईलचे फायदे आणि तोटे बघणार आहोत.

मोबाईलचे फायदे आणि तोटे

 

मोबाईलचे फायदे व तोटे –

मोबाईल फोन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. त्याला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात. तसेच सेलफोनही म्हटले (Cellular Phone)  जाते. सुरुवातीला फक्त संभाषण आणि माहितीच्या देवाणघेवाणी पुरता मर्यादित असलेला मोबाईल आज माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. जगातील सर्वात पहिला मोबाईल फोन १९७३ ला मार्टिन कुपर यांनी बनवला होता.

आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या साह्याने ऑफिसची बँकांची आणि इतर महत्त्वाची कामे चुटकी सरशी होतात. इथे आपण मोबाईलचे फायदे सुरुवातीला बघू आणि मग मोबाईल चे तोटे बघूया. चला तर मग वेळ न घालवता बघूया मोबाईल चे फायदे आणि तोटे कोणते आहेत ते.

 

मोबाईलचे फायदे | Mobile Che Fayade In Marathi

1) मोबाईल फोन असेल तर तुम्ही कुठूनही कितीही दूरवर असलेल्या व्यक्तीशी संभाषण करू शकता.

2) तुमच्याजवळ कॅमेरा नसेल तरी तुम्ही तुमचा किंवा इतर कशाचाही फोटो मोबाईलचे कॅमेऱ्याच्या सहाय्याने काढू शकता. खास क्षणांच्या आठवणी फोटोच्या स्वरूपात कायम आपल्याजवळ ठेवू शकता.

3) तुम्ही मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर करू शकता. मोबाईल वर गाणी वगैरे ऐकू शकता इतर मनोरंजनाचे व्हिडिओज वगैरे बघू शकता किंवा गेम्स खेळू शकता.

4) मोबाईलचा उपयोग करून तुम्ही कोणताही नवीन विषय अगदी सहजपणे शिकू शकता. किंवा कोणत्याही क्षेत्रातील माहिती अगदी सहजपणे मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये इंटरनेट जोडलेले पाहिजे म्हणजे मग गुगल वर कोणत्याही विषयाबद्दल सखोल माहिती तुम्ही मिळू शकतात तसेच युट्युब वर चांगल्या प्रशिक्षकांकडून अगदी मोफत शिकू शकता.

5) अनेक छोट्या छोट्या कामांमध्ये मोबाईल खूप उपयोगी पडतो. जसे मोबाईलमधल्या कॅल्क्युलेटर चा उपयोग करून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, वेळ बघण्यासाठी तारीख बघण्यासाठी मोबाईल उपयोगात येतो, वेळप्रसंगी मोबाईलचा टॉर्च लाईटही कामात येतो अशा दैनंदिन जीवनातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल उपयोगी पडतो.

6) मोबाईलची साईज आणि वजनही कमी असल्यामुळे कुठे घेऊन जाणे आणि वापरणे खूप सोयीस्कर असते.

7) आजकाल तर मोबाईल वरून भाजीपाला फळे किराणा कपडे ते घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या सर्व वस्तू ऑनलाईन खरेदी करता येतात. त्यासोबतच तुम्ही तुमच्या बिजनेस ची जाहिरातही मोबाईलचा उपयोग करून करू शकता. तसेच आजकाल मोबाईलचा उपयोग करून तुम्ही पैसेही कमवू शकता.

8) इलेक्ट्रिकचे पाण्याचे तसेच वेगवेगळे बिले मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या भरता येतात. मोबाईल नव्हता तेव्हा त्या त्या ऑफिसमध्ये जाऊन लाईन लावून बिलं भरावी लागत असत.

9) मोबाईल मुळे माणसाचे आजचे जीवन हे खूप सोपे झाले आहे. कुठे जायचे म्हटले आणि काही साधन नसेल तर दोन मिनिटात टॅक्सी बुक करून इच्छित स्थळी जाता येते. रस्ता माहीत नसेल तरी जीपीएस च्या मदतीने खूपच आरामशीरपणे आपण रस्ता शोधू शकतो.

मोबाईलचे अजूनही खूप फायदे आहेत पण पोस्ट खूप मोठी होईल म्हणून आपण आता मोबाईल चे तोटे कोणते आहेत ते बघूया.

 

मोबाईलचे तोटे | Mobile Che Tote In Marathi

1) मोबाईलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आज माणूस आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ हा मोबाईल वर विनाकारण वाया घालवत आहे त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींकडे कामाकडे त्याची लक्ष राहत नाही. म्हणून हे टाळण्यासाठी मोबाईल काही काम असेल तरच हातात घेतला पाहिजे.

2) मोबाईल मुळे जे लोक दूर आहेत त्यांच्याशी तर व्यक्ती कनेक्ट आहेत. पण जे आपल्या घरात आहेत त्यांच्यापासून मात्र दूर होत चालला आहे. आज आपण बघितलं तर घरातल्या सर्वांकडे आपापल्या मोबाईल असतो आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंग असतो. एकमेकांसोबत बोलायलाही कुणाकडेच वेळ नाही.

3) मोबाईल मधून रेडिएशन म्हणजे एक प्रकारची कितने बाहेर पडत असतात जी प्रेग्नेंट महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात म्हणून लहान मुलांजवळ जास्त वेळ मोबाईल देऊ नये.

4) मोबाईलचा प्रकाश सतत आणि खूप वेळ डोळ्यांवर पडल्यामुळे दृष्टी कमजोर होणे तसेच डोकेदुखी मान दुखी सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. मोबाईल मुळे लहान मुलांना देखील लवकर चष्मा लागत आहे.

5) जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे रात्री शांत झोप न येणे तसेच अभ्यासामध्ये कामांमध्ये व्यवस्थित मन एकाग्र न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो ‌‌.

6) वर जसे आपण बघितले की मोबाईलच्या आपल्या दैनंदिन जीवनात खूप फायदे आहेत अशा मध्ये मोबाईलची आपल्याला खूप जास्त सवय होऊन जाते त्यामुळे मग गरज असो किंवा नसो आपण मोबाईल घेऊनच बसतो मोबाईल शिवाय आपल्याला करमतच नाही. एक प्रकारे मोबाईलचे व्यसनच होऊन जाते. त्यामुळे वेळेचा अपव्य तर होतोच पण मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि शरीरावर होत असतात म्हणून जरुरी असेल तेव्हाच मोबाईलचा उपयोग केला पाहिजे.

7) मोबाईल मुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर खूप जास्त वाढला आहे. सोशल मीडियावर दुसऱ्यांची चांगली परिस्थिती बघून स्वतः हिन असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे जेवढे होईल तेवढे या आभासी जगापासून दूर राहणे चांगले आहे.

8) आपण बघतो की एक-दोन वर्षांची मुले ही मोबाईल हाताळायला लागतात, इतक्या लहान वयापासून त्यांना मोबाईलची सवय लागली तर त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास व्यवस्थित होत नाही.

9) मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना जर त्याचा उपयोग केला तर बॅटरी गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणून चार्जिंगला लावलेला असताना मोबाईलवर फोनवर बोलू नये तसेच गेम्स खेळू नये.

 

समारोप –

आज या पोस्टमध्ये आपण मोबाईलचे फायदे आणि तोटे कोणते आहेत ते बघितले. त्यावरून आपल्याला समजते की मोबाईल ही आजच्या काळातील अत्यंत उपयुक्त जिल्हा आवश्यक अशी वस्तू आहे पण तिचा अतिरेक झाला तर मात्र ती आपल्याला नुकसानदायक ठरू शकते म्हणून मोबाईलच्या वापरावर मर्यादा या असायलाच हव्यात. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top