मासिक पाळी (Periods) हे प्रत्येक महिलेच्या जीवनातील न चुकणारे चक्र असते. मासिक पाळियेण्यापूर्वी आपलं शरीर काही संकेत देते. त्या लक्षणांवरून आपण येत्या काही काळात पाळी येईल असा अंदाज आपल्याला येतो. हि लक्षणे म्हणजे शरीराकडून मिळणारे नैसर्गिक संकेत असतात. मासिक पाळी येण्यापूर्वी दिसून येणारी लक्षणे हि प्रत्येक महिलेच्याबाबतीत वेगवेगळी असू शकतात. या लेखामध्ये मासिक पाळी येण्याची सर्वसामान्य लक्षणे आणि हि लक्षणे का दिसतात ? ती कमी करण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दलही माहिती बघणार आहोत म्हणून लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
मासिक पाळीची लक्षणे साधारणपणे 5 ते 10 दिवस आधी दिसू लागतात. काही महिलांना ही लक्षणे मासिक पाळी येण्याच्या अगदी 2-3 दिवस आधी जाणवू शकतात, तर काहींना 10-14 दिवस आधीही जाणवतात. याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असे म्हणतात.प्रत्येक महिलेमध्ये ही लक्षणे वेगवेगळी असतात.
मासिक पाळी येण्यापूर्वीची लक्षणे –
1) पोटदुखी (Cramps) →
मासिक पाळी येण्यापूर्वी महिलांना पोटात खालच्या भागात किंवा कंबरेच्या भागात वेदना जाणवतात. ही वेदना गर्भाशयाच्या स्नायूंमुळे होते, जे पाळी दरम्यान गर्भाशयातील अस्तर काढून टाकण्यासाठी आकुंचन पावतात. काहींना पोटदुखीचा जास्त त्रास होत नाही तर काहींना तीव्र वेदनेचा सामना करावा लागतो. पोटासोबत पाय आणि गुडघेदुखी हि होऊ शकते.
2) छातीत दुखणे किंवा सूज येणे →
काही महिलांना मासिक पाळीच्या अगोदर छातीत दुखणे किंवा सूज जाणवते. हार्मोन्समधील बदलांमुळे ही संवेदनशीलता वाढते.
3) मूड स्विंग्स आणि भावनिक अस्थिरता →
मासिक पाळीच्या आधी महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हार्मोन्समध्ये बदल होतो, ज्याचा परिणाम मानसिक स्थितीवर होतो. काही महिलांना चिडचिड, रडू येणे, किंवा अस्वस्थ वाटणे यासारख्या भावना उत्पन्न होऊ शकतात.
4) थकवा →
मासिक पाळी येण्याच्या काळात ऊर्जा कमी वाटते. हार्मोन्समधील बदलांमुळे शरीरात थकवा जाणवतो आणि महिलांना विश्रांतीची अधिक गरज भासते.
5) त्वचेवर परिणाम →
मासिक पाळी येण्यापूर्वी काही महिलांच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागावर पुरळ किंवा मुरूम येऊ शकतात. हार्मोन्समधील बदलांमुळे तेल ग्रंथी जास्त सक्रिय होतात, ज्यामुळे त्वचेवर हा परिणाम दिसतो.
6) भूक किंवा जेवणाच्या सवयींमध्ये बदल →
मासिक पाळीच्या आधी काही महिलांना चॉकलेट, गोड पदार्थ, किंवा खारट पदार्थ खाण्याची इच्छा होते. यालाच क्रेव्हिंग म्हणतात. tर काही महिलांना भूक मंदावल्यासारखे वाटते.
7) पचनसंस्थेत बदल →
मासिक पाळीपूर्वी काही महिलांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की गॅस होणे, मळमळ किंवा हलकी जुलाब होणे.
8) डोकेदुखी किंवा मायग्रेन →
हार्मोनल बदलांमुळे काही महिलांना डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
9) झोपेच्या सवयींमध्ये बदल →
मासिक पाळीच्या आधी झोप येण्यात अडथळा जाणवणे किंवा जास्त झोप येणे हे सामान्य आहे.
10) शरीरात सूज किंवा वजन वाढल्यासारखे वाटणे →
मासिक पाळीच्या आधी काही महिलांना पाय, हात किंवा चेहऱ्यावर सूज जाणवते. शरीरात पाणी धरून ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे हा बदल होतो.
लक्षणे सौम्य करण्यासाठी करा हे उपाय
• योगा आणि व्यायाम ⇒ नियमित योगा आणि हलका व्यायाम केल्याने वेदना कमी होतात आणि मूड सुधारतो.
• ताणतणाव कमी करा ⇒ ध्यान, डीप ब्रीदिंग किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्याने ताण कमी होतो.
• आहारात सुधारणा ⇒ ताज्या फळे, पालेभाज्या, पूर्ण धान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. गोड, खारट पदार्थ आणि कॅफिन कमी करणे फायदेशीर ठरते.
• पाणी प्या ⇒ शरीर हायड्रेटेड ठेवल्याने पचनसंस्था सुधारते आणि सूज कमी होण्यास मदत होते.
• गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करा ⇒ पोटदुखी असल्यास पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने आराम मिळतो.
• डॉक्टरांचा सल्ला घ्या ⇒ जर लक्षणे तीव्र आणि असह्य असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य
मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरात होणाऱ्या या बदलांना समजून घेतल्याने महिलांना स्वतःची अधिक चांगली काळजी घेता येते. मासिक पाळी येण्याची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे स्वतःच्या शरीराच्या संकेतांना ओळखणे आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना प्रभावीपणे करता येतो आणि महिलांचे संपूर्ण आरोग्य सुधारते.
समारोप –
तर आज या लेखामधून आपण मासिक पाळी येणाची लक्षणे कोणती असतात त्याबद्दल जाणून घेतलं आणि ही लक्षणे कमी करण्यासाठी घरच्या घरी करत येतील असे उपाय हि बघितले. मला खात्री आहे कि तुम्ही ज्या माहितीच्या शोधात असाल ती तुम्हाला मिळाली. अधिक आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला भेट द्यायला विसरू नका.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!