मित्रांनो, जसे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार होताना आपल्याला दिसून येतात, तसे आपल्या मानला पण काही आजार होत असतात. जे आपल्याला स्पष्ट दिसून येत नाहीत. काही लक्षणाद्वारे आपण ते ओळखू शकतो. या लेखामध्ये मी तुम्हाला मानसिक आजार म्हणजे काय आणि मानसिक आजाराची लक्षणे कोणती असतात ते सोप्या भाषेतमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच मानसिक आजार झाल्यावर काय उपचार करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे पण तुम्हाला वाचायला मिळेल तर लेख शेवटपर्यंत वाचा.
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये झालेल्याबदलांवरून तुम्ही ओळखू शकता कि त्याला काही मानसिक आजार आहे कि नाही. आपण आपल्यामध्ये झालेले बदल स्वीकारून त्यावर वेळीच योग्य तो उपचार करणे खूप गरजेचे आहे. नाही तर हे आजार वाढतात. चला तर मग सुरवातीला आपण बघू कि मानसिक आजार म्हणजे काय असतात ते –
मानसिक आजार म्हणजे काय ?
मित्रांनो , ‘ मन ‘ हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण आज मानवी मनावर खूप संशोधन झाले आहे. ज्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि मनातील विचारांचा, मनाच्या स्थितीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जोपर्यंत मनातील विचार, भावना, आपली वागणूक यांचा समतोल व्यवस्थित असतो, तोपर्यंत व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो.
पण जेव्हा व्यक्तीच्या विचार, भावनांमध्ये असमतोल निर्माण होतो, त्या व्यक्तीच्या दैनंदिन वागणुकीमध्ये बदल दिसून येतो त्याला मानसिक आजार म्हणतात. मानसिक आजरा एक सामान्य आजार आहे आणि आजच्या काळात याचे प्रमाण वाढलेले आहे. तज्ञाच्या मते येत्या काळात मानसिक आजारामध्ये अजून जास्त वाढ होणार आहे. मला वाटते की याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या समाजात या आजाराबद्दल असलेले अज्ञान आहे.
मानसिक आजार असलेले बहुतेक लोक हे आपल्याला काही त्रास होत आहे हे accept करायलाच तयार नसतात. कारण आपल्याकडे असेही गैरसमज आहेत कि मानसिक आजार म्हणजे वेडा, पागल असणे होय. आपल्याला लोक पागल म्हणतील, किंवा आपल्यामध्ये काही कमी आहे अशी या आजाराबद्दल भावना असते. म्हणून लक्ष डॉक्टरकडे जाणे टाळतात. म्हणून वर मी जसे सांगितले हा आजार अजूनच वाढत जातो.
आता आपण मानसिक आजाराची लक्षणे कोणती असतात ते खाली बघूया. ज्याद्वारे तुम्ही स्वतःमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये यातली काही लक्षणे असतील तर ओळखू शकता कि त्यांचं मानसिक आरोग्य योग्य आहे कि नाही ते.
मानसिक आजाराची लक्षणे –
1. सतत उदास वाटत राहणे –
हे मानसिक आजाराचे सुरवातीचं लक्षण एक आहे. काही वेळा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर आपल्याला उदास वाटतं आणि थोड्या वेळानंतर आपण परत नॉर्मल होतो. पण जर हे उदास वाटण चोवीस तास असेल आणि दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ होत असेल, तर समजून जा तुम्हाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
2. झोप न येणे –
मानसिक आजारांमध्ये तुम्हाला झोपेचं चक्र बिघडलेलं दिसून येईल. रात्री उशिरापर्यंत झोपच येणार नाही. रात्री झोपेतून सारखी जाग येणे. आणि जाग आल्यावर परत विचार सुरु होतात आणि झोपच येत नाही. जर तुम्हाला झोप झोपेसंबंधी तक्रारी असतील तर तुम्हाला पण मानसिक आजार असू शकतो.
3. नकारामक आणि खूप विचार करत राहणे –
विचार हे आपल्या मनात येतच असतात. पण मानसिक आरोग्य ठीक नसेल तर या विचारांचं प्रमाण हे वाढलेले असते . एकामागून एक खूप विचार तर येतात आणि त्यामधील maximum विचार हे नकारात्मक असतात. हा !!!! मानसिक आजारामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये व्यक्ती नकारात्मक विचार करू लागते.
4. सतत चिंता वाटणे –
नेहमी कोणती तरी चिंता वाटत राहणे. व्यक्तीला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता वाटत राहते. छोट्या गोष्टींसाठी पण व्यक्ती खूप काळजी करू लागतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर खूप जास्त राग येतो, चीड चीड होते. असे वारंवार होते.
5. कशातच इंटरेस्ट न वाटणे –
मानसिक आजारामध्ये व्यक्तीचे कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. कशातच इंटरेस्ट राहत नाही. बहुतेकवेळा तर असे व्यक्ती कसला तरी विचार करत आहेत असे दिसतात. पूर्वी ज्या गोष्टी करायला आवडायच्या त्या करण्यामध्ये पण व्यक्तीला काहीच रस वाटतं नाही.
6. दैनंदिन कामामध्ये बिघडलेला क्रम –
दैंनदिन गोष्टी करताना पण व्यक्तीच त्यामध्ये लक्ष नसत. हे लक्षण आपण लगेच ओळखू शकतो. अशामध्ये व्यक्ती कृत्रिम हालचाली करू लागते. कोणी काही सांगत असेल त्याकडे पण त्यांचे लक्ष नसते आणि अनेकदा अशी व्यक्ती कृत्रिम हास्य करत असते.तात्यांच्यामनामध्ये काहीतरी वेगेलच सुरु असते.
मानसिक आजारामध्ये नेमकं काय होत ?
आपल्या ब्रेन मध्ये असंख्य न्यूरॉन्स असतात. या न्यूरॉन्स मधून वेगवेगळ्या केमिकल्स चे वहन होत असते. या केमिकल्स मध्ये काही इम्बॅलन्स झाला तर त्याचा परिणाम आपल्या वर्तणुकीवर होतो. त्यातून मानसिक आजार होत असतात. आणि हा केमिकल इम्बॅलन्स कशामुळे होतो तर त्याचे खूप वेवेगळी करणे असू शकतात. जसे कुणाच्या मनावर एखाद्या घटनेचा आघात किंवा खोलवर परिणाम झाल्याने, आपल्या भावना व्यक्त न करू शकल्याने, जास्त चिंता असल्याने किंवा आयुष्यामध्ये कोणतेही मोठं दुःख याला कारणीभूत असू शकते.
मानसिक आजारावर उपचार –
मानसिक आजारांमध्ये सुरवातीचं उपचार म्हणजे मित्र परिवारातील जवळचा सदस्य यांचा मानसिक सपोर्ट हा असतो. अशा वेळी व्यक्तीला मानसिक आधाराची, त्याचे मन समजून घेणाऱ्याची खूप गरज असते. कारण त्याचे मन खूप कमजोर झाले असते. म्हणून अशा व्यक्तींना मानसिक आधार द्यायला हवा म्हणजे त्यांच्या मनातील भीती दूर होईल. आणि त्यांना थोडं हलकं वाटेल.
दुसरी स्टेप म्हणजे त्या व्यक्तीला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जाणे. कारण प्रोफेशनल तज्ञ् च व्यक्तीची लक्षणे बघून आजार ओळखू शकतो.आणि त्यानुसार त्याचे समुपदेशन (कॉउंसेलिंग), औषधे, संमोहन उपचार याद्वारे आजाराला अनुसरून उपचार करतील.
आणि यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे कि जेवढ्या लवकर तुम्ही उपचार कराल तेवढाच कमी वेळेत आणि कमी मेहनतीने तुमचा आजार बरा होईल.
मानसिक आजरांमध्ये काय करणे टाळावे ?
अशा आजारामध्ये त्या व्यक्तीला दोष देणे टाळले पाहिजे. मागच्या जन्मामध्ये काही पाप केलं असेल, याच मनच कमजोर आहे, याच्या पत्रिकेतच दोष आहे, वंशपरंपरागत आहे असं होणारच होत. अशा विषयांवर घरात चर्चा करणे टाळा. त्या व्यक्तीसमोर त्याचे मन दुखेल त्रास होईल असे काही बोलू नका.
तो व्यक्ती हे मुद्दाम करत नसून त्याला पण याचा त्रास होत असतो. म्हणून त्याला समजून घेऊन पुढील उपचार केले तर लवकरात लवकर सर्व नीट होईल. तू लवकरच या सर्वातून बरा होशील, तू खूप स्ट्रॉंग आहेस अशा शब्दांमध्ये त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण मानसिक आजार म्हणजे काय ? आणि मानसिक आजाराची लक्षणे आपण कशी ओळखू शकतो हे बघितले. तर तुमच्या पण ओळखीच्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येत असतील तर योग्य ते स्टेप्स जरूर घ्या. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा सजेशन असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी Aarogya Mantra 24 ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
FAQs:
Q1. सर्वात सामान्य मानसिक आजार कोणते आहेत?
Ans – चिंता , नैराश्य हे सर्वात सामान्य मानसिक आजार आहेत.
Q2. मानसिक आजार कोणत्या वयात सुरू होतो?
Ans – ५० % मानसिक आजार हे वयाच्या १४ व्या वर्षानंतर होत असतात. आणि अजस्तीत जास्त हे वयाच्या २४ व्या वर्षानंतर होतात.
Q3. मानसिक आरोग्यावर शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
Ans – मानसिक आजारांचा आरोग्यावर परिणाम हा नक्कीचहोत असतो. चिंता, निराशा, डिप्रेशन दीर्घकाळ राहिले तर मधुमेह, हृदयरोग यांसारखे दीर्घकाळ टिकणारे आजार उदभवू शकतात.
Q4. मानसिक आजार कधी दूर होतात का?
Ans – हा मानसिक आजारातून बरे होणे शक्य आहे. वेळीच आणि योग्य उपचाराने कित्येक लोक बरे पण झालेले आहेत.