मानसिक आरोग्य म्हणजे काय | चांगल्या मानसिक आरोग्याकरिता काय करावे ?

मित्रांनो आजच्या आधुनिक जीवनशैली, आहार घेण्याच्या अनियियमित वेळा यांसारख्या कारणांमुळे आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. मग त्यावर योग्य तो उपचार आपण करतो आणि शरीर पुन्हा स्वस्थ बनते. त्याचप्रकारे आपल्या मनाच्या काम करण्याच्या पद्द्धतीमध्येसुद्धा बिघाड होऊन काही मानसिक आजार, मनाच्या व्याधी होताना आपल्याला बघायला मिळतात. पण शरीराप्रमाणे मनाच्या आजारांकडे आपण हवे तसे लक्ष देत नाही. हा एखादा आजार आहे असं म्हणून त्याचा स्वीकारहि करत नाही. अशामुळे हे आजार वाढतात. हे मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय असत. ते आपण सोप्या भाषेत या लेखामध्ये बघणार आहोत.  मनाकडे आणि मनाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आजच्या घडीला खूप महत्वाचे झाले आहे. कारण anxiety, चिडचिडेपणा, dipression हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. चला तर मग बघूया मानसिक आरोग्य काय असत.

मानसिक आरोग्य म्हणजे काय

मानसिक आरोग्य म्हणजे काय ?

मित्रांनो जसे आपले शरीराचे काही आजार जसे ताप, सर्दी , डोके दुखणे हे आपल्याला होत असतात. त्याचप्रकारे आपल्या मनाचेही काही आजार असतात. पण शरीराच्या आजारनसारखे हे पटकन लक्षात येत नाही आणि ती बाहेर दिसतही नाहीत. म्हणून हे मनाचे आजाराबद्दल समजायला वेळ लागतो.

आपल्या समाजामध्ये मानसिक आजारांबद्दल अनेक गैरसमज आणि अज्ञान असते. म्हणून लोक अनेकदा मानसिक आजार म्हणजे वेड लागणे असा विचार करतात. आणि काही त्रास असून पण  मनसोपचारतज्ञाकडे जाण्याचे टाळतात. आपल्याला काहीच झाले नाही असा आव आणतात. त्यामुळेच हे आजार आणखी वाढतात.

आपले मन जेव्हा संपूर्ण स्वस्थ असते, म्हणजे आपले आपले मानसिक आरोग्य चांगले असते तेव्हा आपण आयुष्यात येणाऱ्या दुःखांना, कठीण प्रसंगांना अधिक चांगल्या पद्धतीने हॅण्डल करू शकतो. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आपला असतो आणि आपले पर्सनल, प्रोफेशनल आणि मित्र असे सर्व नातेसंबंध चांगले असतात.

खाली आपण चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणे बघूया.  यावरून तुम्ही जाणून घेऊ शकता, कि तुमचे मानसिक आरोग्य कसे आहे. सर्व नाही पण जास्तीत जास्त लक्षणे तुमच्यामध्ये असतील तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे असे समजायला हरकत नाही. पण जर जीवनात सारखे सारखे तुम्ही निराश होत असाल आणि झोपेसंबंधी तक्रारी असतील तर मात्र तुम्हाला याबाबतीत seriously लक्ष देण्याची गरज आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे काय

 

चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणे –

  • त्या व्यक्तीचे मन, विचार सकारात्मक असतात. आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असतो.
  • मन शांत व स्थिर असते.
  • जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना ते खंबीरपणे करतात.
  • इतर व्यक्तींना समजून घेऊन वागतात. नीट जुळवून घेऊन नातेसंबंध मजबूत बनवतात.
  • आपल्या मनावर त्यांचे नियंत्रण असते.
  • त्यांना कोणी कमी जास्त बोलले, नाव ठेवले तर ते जास्त मनावर घेत नाहीत. थोड्या वेळात लगेच विसरतात.
  • आपल्या समस्या स्वतः सोडवतात.
  • महत्वाचे निर्णय स्वतः घेण्यात सक्षम असतात.
  • आपल्या आयुष्याबद्दल ते आशावादी असतात.
  • आपलं overall जीवन असे लोक समाधानानं जगात असतात.
  • आयुष्यात मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न हि लोक करत असतात.
  • चांगल्या मानसिक आरोग्यामुळे अशा लोकांना शारीरिक व्याधीअन तुलनेने कमी असतात.
  • त्यांची झोपही चांगली असते. म्हणजे झोपेसंबंधित तक्रारी नसतात. झोपेबरोबर भूक पण व्यवस्थित आहे म्हणजे तुमचे आरोग्य चांगले आहे.

मित्रांनो वर आपण बघितले कि आपले मानसिक आरोग्य चांगले आहे हे कसे ओळखावे वर असलेलया लक्षनांच्या विरुद्ध लक्षणे तुमच्या बाबतीत असतील तर तुमचे मानसिक दृष्ट्या healthy आहेत असं म्हणता येणार नाही. आता आपण थोडक्यात बघूया चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आपण काय करू शकतो

चांगल्या मानसिक आरोग्यकारीता काय करावे ?

  • जास्त विचार करणे टाळावे. यासाठी आपण नेहमी स्वतःला कोणत्या तरी कामात व्यस्त ठेऊ शकतो.
  • नेहमी स्वतःवर विश्वास ठेवावा. आपले मनोबल वाढवण्यासाठी सकरात्मक पुस्तके वाचू शकता किंवा मोटिवेशनल व्हिडिओज देखील बघू शकता.
  • नियमित व्ययवम करण्याची सवय लावा. व्यायामामुळे शरीर एनर्जेटिक राहते परिणामी मन पण उत्साही बनते.
  • जीवनात खूप जास्त अपेक्षा करू नका. कारण अपेक्षा पूर्ण न झाल्याने व्यक्ती दुखी होतो आणि जास्त दुःख निराशेकडे घेऊन जाते.
  • सोशल मीडियाचा अति वापर थांबवा. मोबाईलवर विनाकारण वेळ घालवणे जसे नेट सर्फिंग करणे, ओंलीने शॉपिंग व्हाट्सअप यामध्ये दिवसातला बरच वेळ निघून गेल्यामुळे महत्वाची कामे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे स्ट्रेसफुल परिसथिती निर्माण होते आणि आपण स्वतःला दोष देतो.
  • स्वतःला पण वेळ द्या. सर्व गोष्टी करण्यामध्ये आपण एवढे गुंग होऊन जातो कि स्वतःला विसरून जातो. म्हणून दिवसातला काही वेळ तरी स्वतःला दिला पाहिजे. यावेळेमध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडत ते करू शकता आपले छंद जोपासू शकता. बुक्स वाचू शकता, म्युझिक ऐकू शकता, बाहेर फिरून येऊ शकता.

समारोप –

तर मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण बघितले कि मानसिक आरोग्य म्हणजे काय हे साध्या सोप्या भाषेमध्ये जाणून घेतले. आपण इथे चांगल्या आरोग्याची लक्षणे पण बघितली. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. आणि अधिक इंटरेस्टिंग लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!

FAQs

Q1. मानसिक आरोग्याची व्याख्या काय आहे?

Ans – मानसिक आरोग्यामध्ये आपले इतरांसोबत वागणे कसे आहे, आपली समस्यांचा सामना आपण कसा करतो, आपले सामाजिक वागणे कसे आहे यावरून निर्धारित केले जाते. चांगले मानसिक आरोग्य हे वागणे, बोलणे तसेच पारिवारिक, मित्रसंबंधी तसेच ऑफिसमध्येही चांगले रिलेशन यावरून आपण ओळखू शकतो.

Q2. सामान्य मानसिक आरोग्य म्हणजे काय?

Ans – सामान्य मानसिकआरोग्य म्हणजे तुम्हाला कोणतेचमानसिक आजार नाही असा आहे. म्हणजेच तुम्ही आपल्या आयुष्याबद्दल समाधानी आहेत , खुश आहात , आशावादी आहात.

Q3. मानसिक आरोग्यावर दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो?

Ans –  तुम्ही कसे विचार विचार करता, कसे फील करता आणि कसे वागता.  याचा तुच्या मनाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जसे कि dipression  मध्ये असलेले व्यक्ती कोणत्याही गोष्टीकडेअधिक वेळ लक्ष देऊशकत नाही. त्यालानेहमी निराशाजनक विचारांनी घेरलेले असते.

Q4. मानसिक आरोग्य संकट कशामुळे होत आहे?

Ans –  बदललेली जीवनशैली म्हणजेच कामाच्या झोपण्याच्या चुकीच्या वेळा, जीवघेणी स्पर्धा, सोशल मीडिया चा अति वापर, झोपेकडे दुर्लक्ष , माणसाच्या वाढलेल्या इच्छा हि काही करणे असू शकतात, असे मला वाटते.

Q5. सकारात्मक मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य कोणते आहे?

Ans –  सकारात्मक मानसिक आरोग्य असलेले व्यक्ती आपल्या जीवनाबद्दल स्वतःबद्दल नेहमी आशावादी असतात. आपले जीवन मौल्यवानआहेअसे असे त्यांना वाटते. जीवनाचापुरेपूरआनंदहे लोक घेतात.

Q6. शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य महत्त्वाचे का आहे?

Ans –  नक्कीच.  शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य अधिक महत्वाचे आहे. कारण मजबूत मनाच्या जोरावर आपण कितीही मोठा आजार असेल त्यामधून सिखरूपबाहेर पडू शकतो. उलटपक्षीजर आपले मन कमजोर असेल तर नसलेला आजार पण आपल्या शरीरामध्ये होण्याचा संभव असतो.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top