आज कालच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीचे माणसाच्या मनावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम बघायला मिळत आहेत. आपल्याला राग येणे हे स्वाभाविक आहे. ती आपल्या मनातील एक नकारात्मक भावना आहे. पण आजच्या पिढीसाठी ही समस्या गंभीर होत चालली आहे. जर तुम्हाला पण छोट्या छोट्या गोष्टींचा पण राग येत असेल तर ते बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमचे मन आजारी आहे. तुम्हाला माहित आहे का माणसाला राग का येतो ? राग येण्याची कारणे आपण या लेखामधून आज बघणार आहोत आणि राग न येण्यासाठी कोणते उपाय करता येतील तेही आपण बघू.
राग आपल्या मनात येणारी नकारात्मक भावना आहे. जशी एखादी चांगली गोष्ट झाल्यावर आपल्याला आनंद होतो, तसच एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यावर आपल्याला राग येत असतो. पण राग अनावर झाल्यावर कधी कधी समोरच्याला असे काही बोलले जाते, ज्यामुळे तो प्रचंड दुखावला जातो. नंतर ते शब्द त्याच्या आयुष्यभर लक्षात राहतात. आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून राग कंट्रोल करणे हे खूप जरुरी आहे. कारण राग आल्यावर व्यक्ती समोरचा दुखावेल असं बोलून जातो काही बोलतो, समोरच्यानेही त्याला प्रत्युत्तर दिले तर वाद वाढत जातात आणि त्याची परिणीती भांडणात होते.
रागावर अमेरिकेतल्या University of Wisconsin मध्ये रागावर झालेल्या एका research मध्ये राग आल्यावर व्यक्तीच्या ब्रेनचा पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये असं दिसून आलं की राग आलेल्या व्यक्तीने काही सेकंद किंवा मिनिट आपल लक्ष दुसरीकडे वळवले तर त्याचा राग शांत होतो आणि मनाला relaxation feel होते.
जर तुम्हाला कधी कधी आणि थोड्याफार प्रमाणात राग येत असेल तर ठीक आहे पण जर वारंवार राग येत असेल तर नक्कीच याकडे seriously लक्ष देण्याची गरज आहे. कारण रागीट व्यक्ती सोबत राहणे ही पण कठीण गोष्ट असते. राग हा आपल्या मनावर परिणामी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करत असतो. वारंवार राग, चिडचिड करणाऱ्या व्यक्तीला हृदयविकार, BP, चिंता, anxiety सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
माणसाला राग का येतो ?
प्रत्येकाला राग येण्याची कारणे वेगवेगळे असू शकतात. कारण प्रत्येकाचा स्वभाव आणि कोणत्याही situation मध्ये react करण्याची पद्धत वेगळी असते. जसे आपण वर बघितले राग ही एक नकारात्मक भावना आहे. जेव्हा आपल्या मनात positivity कमी असते तेव्हा राग जास्त येत असतो. चला तर मग बघूया राग येण्याची कारणे –
⇒ जेव्हा कोणी आपल्याला समजून घेत नाही, आपल्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. तेव्हा आपल्याला राग येतो.
⇒ जेव्हा काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यावेळी आपण helpless feel करतो तेव्हा खूप राग येतो.
⇒ कुणी आपल्याला दुखावलं, टोचून बोललं, हिनपणाची वागणूक दिली, तर आपले मन दुखावले जाते आणि आपण रागावतो.
⇒ जेव्हा कुणी आपलं म्हणणं नाकारतं किंवा आपल्याला नकारत. तेव्हा या नकाराच्या भावनेमुळे आपण मनातून दुखावले जातो आणि त्याची परिणीती रागात होते.
⇒ जर कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तरी आपण रागावू शकतो.
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? आजच करून बघा हे उपाय
⇒ कोणत्यातरी गोष्टीचा guilt (अपराधीपणाची भावना ) आपल्या मनामध्ये असेल तर त्यामुळे पण आपण रागावतो.
⇒ मनातल्या भावना जेव्हा आपण कोणत्याही कारणामुळे व्यक्त करु शकत नाही, तेव्हा त्या मनात साचत जाऊन त्याचे रूपांतर शेवटी रागात होते.
⇒ जेव्हा एखाद्या गोष्टीचं प्रेशर, टेन्शन असेल तर मनावर त्या गोष्टीचं ओझं होतं आणि मग छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण रागावतो.
⇒ आपल्या मनात कुणाविषयी द्वेषाची भावना असेल तर त्यामुळे ही राग येतो.
⇒ समोरच्या व्यक्तीच्या काही गोष्टी, सवयी आपल्याला आवडत नसतील तरी आपल्याला राग येऊ शकतो.
⇒ कोणत्यातरी गोष्टीमुळे जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आजूबाजूचे काही चांगले वाटत नाही आणि विनाकारण आपण रागावतो, चिडचिड करतो.
⇒ जर आपण एखाद्या आजाराने त्रस्त आहोत तर त्याच्या होणाऱ्या त्रासामुळे आपण रागावतो.
राग येण्याची कारणे कोणती असू शकतात ते आपण बघितले आता येणाऱ्या रागाला आपण कसे रोखू शकतो ते बघू.
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय –
→ जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा काहीच बोलू नका. मनात तीन वेळा दीर्घ श्वास घ्या. यावेळी डोळे बंद केले तर उत्तमच. असे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला आलेला राग गायब झाला आहे.
→ राग आल्यावर तुम्ही मनातल्या मनात दहा पासून एक पर्यंत संख्या उलट्या क्रमाने मोजा. हे करण्यामध्ये जेव्हा तुमचे मन बिझी होईल तेव्हा राग आपोआप दूर झालेला असेल.
→ जर तुम्हाला खूप जास्त राग येत असेल तुम्ही राग आल्यावर एक ग्लास पाणी पिऊ शकता. हा उपाय ऐकायला जरी विचित्र वाटत असला तरी खूप परिणामकारक आहे. कारण कारण राग आल्यावर जेव्हा तुम्ही किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जाल तेव्हा तिथे जाऊन पाणी प्याल हे सर्व करेपर्यंत मनातला राग निघून गेलेला असेल.
→ जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा शांत रहा आणि विचार करा या सिच्युएशनला अजून कोणत्या पद्धतीने मी react करू शकतो. असा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की रागावण्याशिवाय पण वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया आपण देऊ शकतो.
→ राग आल्यावर तो व्यक्त व्यक्त करणेही खूप महत्वाचे आहे कारण राग मनात ठेवणे हे आपले शरीर आणि मन दोन्हींसाठी घातक ठरू शकते
राग कमी करण्यासाठी काय करावे ?
♦ अनेक जण आपल्याला बोलताना दिसतात माझा स्वभाव खूप तापट आहे, मला लगेच राग येतो. ते खरंही आहे, काहींना लगेच राग येतो, तर काहींना येत नाही असं का होत असेल ? तर ते आपल्या मनाच्या स्थितीवर आणि प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पण येणाऱ्या रागाकडे सजगपणे लक्ष देऊन आपण ते कमी करणे याचा प्रयत्न करू शकतो.
♦ बघा, राग येणे हे कमजोर मनाचे लक्षण आहे. म्हणून मनाला स्ट्रॉंग बनवून तुम्ही अगदी सहजपणे रागावर नियंत्रण मिळवू शकता. हे आपण एका उदाहरणावरून समजण्याचा प्रयत्न करू – प्रियाला लगेच राग येतो. पण तिने आता सकारात्मक विचारांनी मनाला स्ट्रॉंग बनवले आहे. आता एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, कोणी काही बोललं तरी तीला त्याच फारसं काही वाटतं नाही कारण तीचा मूड आता चांगला असतो , सगळ्या गोष्टी ती लाइटली घ्यायला ती शिकली आहे. असंच तुम्ही पण सकारात्मक विचारांची सवय आपल्या मनाला लावून मन स्ट्रॉंग बनवू शकता
♦ सुरुवातीला तुम्हाला शोधावे लागेल की तुम्हाला राग कशामुळे येतो. जर तुम्हाला स्वतःवरच राग येत असेल जसे एखादे काम तुम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकले नसाल किंवा एखादी सवय तुम्हाला बदलायची आहे पण ते करू शकत नसाल. त्यामुळे जर राग येत असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःला motivate ठेवणारी वाक्य रोज वाचू शकता. Self confidence वाढवणारे व्हिडिओज बघू शकता. स्वतःसोबतचा संवाद self talk सकारात्मक बनवू शकता. यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यात मदत मिळेल. आणि सकारात्मक विचारांनी मन भरलेले असल्यामुळे रागासारखी नकारात्मक भावना तुमच्यापासून दूरच राहील.
♦ दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यामुळे, दुखावल्यामुळे जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. समोरच्या व्यक्तीच्या काही सवयी तुम्हाला आवडत नसतील तर त्याच्यासोबत मनमोकळेपणाने त्याबद्दल बोला. काही फरक पडला तर ठीक, नाही तर आहे त्या गोष्टींना स्वीकारायला शिका. कारण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.
हे पण वाचा 👇👇👇👇
- जाणून घ्या आत्मविश्वास वाढवण्याच्या सिम्पल टिप्स | How To Increase Self -Confidence (Marathi)
- मानसिक आजार म्हणजे काय | मानसिक आजाराची लक्षणे कशी ओळखाल
- मानसिक ताण म्हणजे काय ? जाणून घ्या हा कमी कण्याचे उपाय
समारोप –
तर आज या लेखामधून आपण माणसाला राग का येतो त्याची कारणे बघितली आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय हि बघितले. तुम्हालापण वारंवार राग येत असेल, तर हे उपाय नक्की करून बघा. आणि त्यामुळे काय फायदा झाला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक मन आणि आरोग्यही संबंधित लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला भेट द्यायला विसरू नका.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!