मित्रांनो आपण असं नेहमी ऐकतो, मनात आणलं ना तर पहिला नंबर आणून दाखवेल, आज बाहेर जायचं माझं मन नाहीये, जरा काही मनासारखं नाही झालं तर लगेच आपला मूड खराब होतो पण तुम्ही विचार केला आहे का कि मन म्हणजे नक्की काय ? जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षण आपल्या सोबत असलेल्या मनाबद्दल आपल्याला जास्त माहिती नसते. या लेखामध्ये आपण मन म्हणजे काय ? आणि मन काम कस करते ? हे जाणून घेणार आहोत. आपल्या मनाच्या स्थतीचा प्रभाव डायरेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. आणि आपल्या अआजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आपल्या मनावर !!! सतत विचार करणे हे आपल्या मनाचे काम असते. आपण विचारांची गती कमी करू शकतो पण मनात येणारे विचार पूर्णपणे बंद करू शकत नाही.
मन म्हणजे नेमकं काय ??
काही जण विचारांना मन म्हणतात काही भावनांना तर काही आत्म्याला मन म्हणतात. ते चुकीचं नाहीये !! विचार, भावना, स्मृती हे मनाचे भाग (fuctions) आहेत. पण नक्की मन म्हणजे काय ? तर मन म्हणजे मानवी शरीरामधील एक चैतन्य शक्ती आहे. हि डोळ्यांनी दिसणारी गोष्ट नाहीये. पण हे मन आपल्या शरीरासोबत आणि शरीराच्या प्रत्येक भागासोबत जोडलेले असते.
आपला मेंदू शरीरातील सर्व क्रियांना नियंत्रित करत असतो. मेंदूपर्यंत हे मेसेज पोहोचवण्याचे काम मन करत असते. म्हणूनच आपण मेंदूला आपल्या शरीराचा hardware आणि आपल्या मनाला software म्हणू शकतो. कारण ते दिसत नाही पण आपले काम करत असते. आपल्या मनातले विचार brain च्या माध्यमातून action मध्ये येत असतात.
# गौतम बुद्ध मनाबद्दल म्हणतात –
♥ “मन हे सर्व मानसिक अवस्थांपेक्षा मोठे आहे”
♥ “कुणाचे मन आणि मौन खूपच कमी लोक समजू शकतात”
♥ “आपले मनच सर्वात प्रधान आहे मनच सर्व काही आहे “
♥ “आपण जसा विचार करतो तसेच आपण बनुन जातो”
♥ “शांती अंतर्मनातून येते याच्याशिवाय बाहेर काहीच शोधू नका”
# स्वामी विवेकानंद मनाबद्दल म्हणतात –
♥ मानवी मनाच्या शक्तीला सीमा नाहीत. ते जितके अधिक एकाग्र होईल तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल. हेच याबाबतीतले रहस्य आहे.
♥ मनातल्या शक्त्या इकडे तिकडे पसरलेल्या प्रकाशाच्या किरनांसारख्या आहेत जेव्हा त्यांना एकत्रित केले जाते. तेव्हा ते सर्व काही करू शकतात.
♥ विचारांपासून ते अगदी छोट्याशा शारीरिक क्रियापर्यंत सर्वत्र आढळणारी शक्ती म्हणजे त्या प्राणचीच निरनिराळी रूपे आहेत.
# श्रीमद्भगवतगीते अनुसार मन –
♥ पूर्णपणे वशमध्ये असलेले मन आपला सर्वात चांगला मित्र असते. पण जर हे अनियंत्रित झाले तर सर्वात मोठा शत्रू बनते.
♥ मन हे वायुसारखे चंचल असते आणि मनाला वश करणे हे वायूला वशमध्ये करण्यासारखे कठीण असते.
मनाचे काम काय आहे ??
नेहमी सतत विचार करत राहणे हे मनाचे काम आहे. एका दिवसात सामान्य व्यक्तीच्या मनात ६० ते ७० हजार विचार येत असतात. विचारांसोबतच भावना, आठवणी, वागणूक, तारतम्य ( चांगले वाईट ओळखणे) आठवणी , problem solving capacity तसेच क्रीटीव्हिटी, निर्णय घेण्याची क्षमता हे मनाचेच वेगवेगळे भाग आहेत. पण ते सगळे एकमेकांशी inter connected आहेत. कसे ते आपण खाली बघू.
मनाचे मुख्य पाच प्रकार असतात –
१. विचार २. भावना ३. दृष्टिकोन ४. आठवणी ५. इच्छा
विचार(Thoughts) –
मनात निरंतर सुरु असणारे विचार हे चार प्रकारचे असतात.
१. सकारात्मक विचार – ज्या विचारांमुळे मनाला शक्ती मिळते. उभारी, उत्साह मिळतो त्यांना सकारात्मक विचार म्हणतात. या विचारांमुळे मन powerful बनते. आपल्या जीवनात या विचारांची खूप गरज असते.
२) नकारात्मक विचार – या मध्ये राग, लोभ, इगो येतात. ज्यामुळे मनाला त्रास होतो, मनाची शक्ती कमी होते. अशा विचारांना नेगेटिव्ह विचार म्हणतात.
३) निरर्थक विचार – ज्या भूतकाळात होऊन गेलेल्या घटना किंवा भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा विचार करत राहणे याला निरर्थक विचार म्हणतात.
४) साधारण विचार – रोजची जी आपली दैनंदिन कामे असतात. ती करण्याचे विचार जसे जेवण बनवायचं आहे , साफसफाई करायची आहे असे विचार म्हणजे साधारण विचार.
तर मित्रांनो या विचारांचा आपल्या मनावर परिणामी शरीरावर परिणाम होत असतो. विचारांच्या आधारावरच आपल्या भावना बनतात. दिवसभरातून ज्या प्रकारचे विचार आपण जास्त करते. तसाच आपला मूड असतो. ज्या दिवशी नेगेटिव्ह विचार जास्त केले असतील त्या दिवशी आपला मूड पण खराब असेल. खुश राहणाऱ्या आणि पॉजिटीव्ह असलेल्या लोकांना स्वस्थ असलेलं तुम्ही पाहिलं असेल. म्हणून मित्रांनो तुम्हाला आपल्याला विचारांवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
भावना (Feeling) –
विचारांनंतर येतात भावना !!! आपण एखादा विचार सतत एकूण त्याबद्दल आपल्या भावना बनत असतात. हे आपण एका उदाहरणाने समजण्याचा प्रत्यन करू.
समजा, आज तुम्ही एक मुव्ही बघितली. तर तुम्हाला चांगलं फील होईल. म्हणजेच चांगल्या भावना उत्पन्न होतील किंवा जर एखाद्या दिवशी तुमचे मित्रांसोबत भांडण झाले तर तुम्हाला चांगले वाटणार नाही. करमणार नाही. कारण राग हि नेगेटिव्ह भावना आहे. सुरवातीला आपण विचारांबद्दल जाणून घेतले नंतर भावना काय असतात ते बघितल्या. आता आपण समजून घेऊ दृष्टिकोन कसा बनतो ते.
दृष्टिकोन (Attitude) –
दृष्टिकोन हा आपल्या विचार करण्याची पद्धत, आपल्या आजूबाजूचे वातावरण, आपला स्वभाव यांवर अवलंबून असतो. या मध्येच आपली निर्णय घेण्याची वृत्ती, सकारात्मक किंवा नकारात्मक वृत्ती, समस्यांचा सामना करण्याची क्षमता हि येते. दृष्टिकोन कसा काम करतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू.
मुलगी हताशपणे घरी येते. कसा गेला ग पेपर ? exam होती ना आज ? असे आई विचारते. त्यावर मुलगी उत्तर देते. मला चांगला नाही गेला. फेलच होणार मी बहुतेक …. मग आईचा पारा चढतो. तरी सांगत होते मोबाईल, फ्रेंड्स, फिरणे यांकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यास कर. नंतर थोड्या वेळाने मुलीला उदास बघून आई तिला म्हणते. जाऊ दे… जे होईल ते आपण बघून घेऊ. आता टेन्शन घेऊन काही फायदा नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत. पण यापुढे अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायचं. यामुळे मुलीला थोडं बर वाटतं . ती आईला मिठी मारते.
या उदाहरणामध्ये आई सुरवातीला रागावली. पण नंतर problem solving capacity चा use करून आणि पॉजिटीव्ह दृष्टिकोन दाखवून तिने मुलीला दिलासा दिला. म्हणजे परिस्थिला सामोरे जाण्याची क्षमता हि आपल्या सर्वांमध्ये असते. गरज असते ती फक्त आपल्या मनाचे ऐकण्याची !!!!!!!!
इच्छा –
इच्छा ह्या आपल्याला समजायला लागल्यापासून उत्पन्न होत असतात. त्या पण आपल्या मनाचाच एक भाग आहेत. लहान असल्यापासून मला हे पाहिजे, ते पाहिजे अशा आपल्या इच्छा असतात. आपल्याला आयुष्यामध्ये इच्छांना कमी करणे गरजेचे असते. कारण एक पूर्ण झाली कि दुसरी, नंतर तिसरी या इच्छा कधीच संपत. आपण संपून जातो पण या संपत नाहीत. आणि त्या पूर्ण न झाल्यास आपल्याला दुःख होते. म्हणून माणसाने आपल्या इच्छांना कमी करण्याची गरज आहे.
आठवणी –
लहानपानापासून आपण ज्या वातावरणात वाढलो, ज्या लोकांसोबत राहिलो त्याचा प्रभाव आपल्या मनावर खोलवर झालेला असतो. साधारणपणे आपण ८ ते १० वर्षांचे होईपर्यंत ज्या महत्वाच्या घटना आपल्या सोबत घडतात. त्या नेहमीसाठी आपल्या लक्षात राहतात. चांगल्या वाईट आठवणींच्या रूपाने या आपल्या सोबत असतात.
आपला आजचा स्वभाव जसा आहे. त्याला या आठवणीच कारणीभूत असतात. जसे लहानपणी एखादे दूरचे पाहुणे जे नेहमी तुमच्या घरी नेहमी येत नसतील, पण एकदाच आले होते ते तुमच्या आजही लक्षात असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा ट्रेन मध्ये , प्लेन मध्ये बसले होते ते तुम्हाला स्पष्ट आठवत असेल.
समारोप –
तर मित्रांनो या लेखामध्ये आपण मन म्हणजे काय ? हे बघितले. इथे आपण आपल्या मनामध्ये कोणकोणते भाग असतात आणि मनाचे काम काय आहे ? हे पण आपण सविस्तरपणे समजून घेतले. मनाच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कंमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही पण आपल्या मनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा म्हणेज तुमचे आयुष्य हे नक्की बदलेल. आपली आरोग्य संदर्भात अधिक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
FAQs
Q1.मन म्हणजे काय ते कुठे असते?
Ans – मन हा स्थूल भाग नसून एक चैतन्य शक्ती आहे. जी आपल्या मेंदूचा एक भाग आहे.
Q2. मन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
Ans – जसे आपण वर बघितले मन हि एक चैतन्य शक्ती असते. आणि ती आपल्या विचार , भावना आठवणी, दृष्टिकोन यांच्या साहाय्यानेकाम करत असते.
Q3. शरीरात मन कुठे असते?
Ans – मन हे मेंदूचा एक भाग आहे. म्हणून मेंदूंच्या आसपास असते.
Q4. मनाचे कार्य काय आहे?
Ans – सतत विचार करत राहणे हे मनाचे काम आहे.