लिव्हर हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग असून, तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे, पचनास मदत करणे, आणि अनेक महत्त्वाचे पोषणतत्त्व शोषून घेण्याचे काम करतो. अनेक कारणांमुळे लिव्हरवर सूज येऊ शकते, याला सायंटिफिक भाषेत ‘लिव्हर इनफ्लेमेशन’ किंवा ‘हेपेटायटीस’ असे म्हणतात. लिव्हरवर सूज आल्यास शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे याकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करणे आवश्यक असते. या लेखात, आपण लिव्हरवर सूज येण्याची कारणे, त्यांची लक्षणे, आणि त्यावर करता येतील असे उपाय याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.
लिव्हर सूज येण्याची कारणे –
लिव्हर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. ती अनुवंशिक कारणामुळे, जीवनशैलीशी संबंधित किंवा आजारांमुळे होऊ शकतात. खाली याची सविस्तर कारणे आपण बघू.
1. व्हायरल इन्फेक्शन (Virus Infection)
- हेपेटायटीस व्हायरस (Hepatitis A, B, C, D, आणि E) मुळे लिव्हरवर सूज येऊ शकते.
- हेपेटायटीस A: दूषित अन्न व पाणी सेवन यांचे केल्यामुळे होतो.
- हेपेटायटीस B आणि C: संक्रमित रक्त, सुईचा वापर, किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो.
- हेपेटायटीस E: अस्वच्छतेमुळे होतो.
2. अतिरिक्त मद्यपान (Alcohol Consumption)
- अत्यधिक प्रमाणात मद्यपान केल्यामुळे लिव्हरवर दीर्घकालीन परिणाम होतो. यामुळे अल्कोहोलिक हेपेटायटीस होऊ शकतो.
- दीर्घकालीन मद्यपान लिव्हरला कमजोर करून त्यात सूज निर्माण करतो आणि यामुळे लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता वाढते.
3. फॅटी लिव्हर (Fatty Liver Disease)
- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर: जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने होतो.
- नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर: अतिरिक्त वजन/ वाढलेले वजन, चुकीची जीवनशैली, आणि मधुमेह यामुळे फॅटी लिव्हर हा आजार होतो.
- फॅटी लिव्हर असल्यास लिव्हरमध्ये चरबी साठते, ज्यामुळे सूज येऊ शकते.
4. औषधांचे दुष्परिणाम (Drug-Induced Hepatitis)
- काही प्रकारची औषधे, जसे की पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, आणि ऍनाल्जेसिक्स, यांचा अतिवापर किंवा चुकीचा वापर केल्याने लिव्हरवर सूज येऊ शकते.
ताप येण्याची कारणे कोणकोणती असू शकतात ?
5. अतिसार किंवा विषबाधा (Toxins and Poisons)
- शरीरात विषारी पदार्थ, जसे की दूषित अन्न, कीटकनाशक, किंवा हानिकारक केमिकल्स संपर्क, यामुळे लिव्हरवर सूज येऊ शकते.
6. आनुवंशिक विकार (Genetic Disorders)
- काही वेळा लिव्हरवर सूज आनुवंशिक आजारांमुळे होते, जसे की:
- विल्सन रोग (Wilson’s Disease): शरीरात तांब्याचे प्रमाण वाढल्यामुळे लिव्हरवर ताण येतो.
- हॅमोक्रोमॅटोसिस (Hemochromatosis): शरीरात लोहाचे प्रमाण जास्त होऊन लिव्हरवर सूज येते.
7. वाढते वय व रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
वाढते वय, शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती, आणि काही वेळा इतर आजारांमुळे देखील लिव्हरला सूज येऊ शकते.
लिव्हर सूजेची लक्षणे –
लिव्हरवर सूज आल्यास काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे लक्षात घेऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
1. पचनाचा त्रास होणे, अपचन किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स.
2. भूक न लागणे आणि सतत थकवा जाणवणे.
3. त्वचेचा किंवा डोळ्यांचा पिवळसरपणा (कावीळ).
4. पोटाच्या उजव्या भागात दुखणे.
5. वजन कमी होणे किंवा सुजेची वाढ होणे.
6. काळसर लघवी आणि पांढरसर विष्ठा.
7. उलटी होणे किंवा मळमळणे.
लिव्हर सूज येऊ नये म्हणून करा हे उपाय –
1. संतुलित आहार घ्यावा
- आपल्या रोजच्या आहारात ताज्या फळे, भाज्या, प्रथिने, आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- जास्त तेलकट, तळलेले, आणि प्रक्रियायुक्त पदार्थ खाणे टाळावे.
2. दारूचे सेवन कमी करा किंवा पूर्णपणे टाळा
- दारूच्या अतिरेकामुळे लिव्हरवर ताण येतो, त्यामुळे दारूचे सेवन टाळणे चांगले.
3. योग्य वजन ठेवा
- लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. नियमित व्यायाम करावा आणि संतुलित आहार घ्यावा.
4. स्वच्छतेची काळजी घ्या
- दूषित अन्न व पाणी हे आपण टाळले पाहिजे.
- सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळली पाहिजे.
5. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी
- औषधांचा अतिवापर किंवा स्वतःच उपचार करण्याचा प्रयत्न टाळायला हवा.
6. लसीकरण करावे
- हेपेटायटीस A आणि B च्या लसी घेणे गरजेचे आहे.
- हे लसीकरण लिव्हरला व्हायरल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते.
7. नियमित आरोग्य तपासणी करा
- वारंवार ब्लड टेस्ट व लिव्हर तपासणी करून संभाव्य त्रास ओळखले पाहिजेत.
- लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लिव्हरचे आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदामध्ये लिव्हर आरोग्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत.
- आवळा: लिव्हरला डिटॉक्स करण्यात उपयुक्त आहे. म्हणून आवळ्याचे सेवन करणे लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
- हळद: जंतूसंसर्ग रोखते आणि लिव्हरला बळकटी देते. हळद आपण दुधासोबत किंवा काढ्यातून घेऊ शकतो.
- एलोवेरा जूस: लिव्हर साफ करण्यासाठी प्रभावी मानले जाते. लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण एलोवेरा ज्यूस चे सेवन केले पाहिजे.
समारोप –
लिव्हरवर सूज येणे ही गंभीर समस्या आहे, पण ती योग्य जीवनशैली आणि वेळीच उपचारांद्वारे टाळता येऊ शकते. या लेखामधून आपण लिव्हरवर सूज येण्याची कारणे, लक्षणे बघितली. लिव्हरच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि स्वच्छतेचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण वर बघितलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि लिव्हरच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहील.