ही आहेत लिव्हर खराब होण्याची लक्षणे | Liver Kharab Honyachi Lakshane

आपल्या लिव्हरला हेल्दी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शरीरातल्या खूप महत्त्वाचे कामे लिव्हर करत असते. त्यामुळे लिव्हर खराब झाले तर आपल्याला अनेक आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपले लिव्हर अचानक किंवा एका रात्रीत खराब होत नाही. ते जेव्हा खराब व्हायला लागते, तेव्हा काही स्टेप्स असतात आणि त्यासोबत काही लक्षणं हि आपल्याला बघायला मिळतात. या लेखामधून आपण लिव्हर खराब होण्याची लक्षणे आणि कोणत्या सवयीमुळे लिव्हर खराब होते त्याबद्दल माहिती बघणार आहोत.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

सुरुवातीला आपण बघूया लिव्हर खराब होण्याच्या स्टेप्स कोणत्या असतात ते.

लिव्हर खराब होण्याच्या स्टेप्स –

आपले लिव्हर एका रात्रीतून खराब होत नाही ते पूर्ण खराब होण्याआधी काही स्टेप्स मधून जाते. याबद्दल आपल्याला माहिती असेल तर ते अधिक खराब होण्यापासून आपण थांबवू शकतो.

  • हेल्दी लिव्हर ( Healthy Liver)  ——> फॅटी लिव्हर ( Fatty Liver) ——> हिपॅटेटीस  (Hipetatis) ——>

——> फायब्रोसिस (Fibrosis)  ——> सिरोटीक लिव्हर (Cirrotic Liver) ——> कॅन्सर / एन्ड स्टेज लिव्हर( End Stage Liver) 

सुरुवातीला आपले लिव्हर हेल्दी असते. काही सवयीमुळे किंवा प्रॉब्लेम्स मुळे मग फॅटी लिव्हर होते. मग हिपॅटेटीस होते. त्यानंतर फायब्रोसिस आणि मग सिरोटीक लिव्हर बघायला मिळते. त्यानंतर काही केसेस मध्ये जवळपास ८-१०% केसेस मध्ये कॅन्सरमध्ये convert होतो आणि काही केसेस मध्ये लिव्हर एकदम लहान होऊन जाते. लिव्हरची जी फंक्शन्स असतात ते बंद होतात आणि मग लिव्हर पूर्णपणे खराब झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

वर आपण लिव्हर खराब होण्याच्या steps बघितल्या. जेव्हा लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. तेव्हा काही लक्षणे आपल्याला दिसतात. ती ओळखून टेस्ट वगैरे करून, आपल्या लाईफस्टाईल मध्ये योग्य बदल करून आपण आपले लिव्हर पुन्हा हेल्दी बनवू शकतो. चला तर मग बघूया लिव्हर खराब होण्याची लक्षणे कोणती असतात ते.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे –

⇒ कावीळ होणे – लिव्हर खराब होण्याचं पहिलं लक्षण आहे कावीळ. तुमच्या रक्तातील बिली रुबीन जेव्हा वाढते त्यामुळे डोळ्यांमध्ये स्किनवर पिवळसर पणा येतो.

⇒ भूक कमी होणे / अशक्तपणा जाणवणे -लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आल्यावर तुमची भूक कमी होते. अशक्तपणा जाणवतो कारण प्रोटीन बनणे बंद होते. अन्नावरची वासना उडते आणि काही खावेसे वाटत नाही.

⇒ उलटी / जुलाब लागणे -उलट्या होणे तसेच जुलाब लागणे हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकते.

⇒ ताप येणे – तुम्हालाही हिपॅटेटीस असेल तर ताप येतो वजन कमी होते अशी लक्षणे दिसू शकतात.

ताप येण्याची कारणे कोणकोणती असू शकतात ? ताप आल्यावर काय करावे ?

⇒ खाज येणे – त्वचेवर खाज येणे हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे लक्षणे असू शकते.

⇒ वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे.

तळहात प्रमाणापेक्षा जास्त लाल होणे. लिव्हर मध्ये फॅटी सेल्स वाढल्यामुळे असं होतं.

पुरेशी झोप घेतल्यानंतर देखील फ्रेश न वाटणे. तसेच शरीर थकल्यासारखे जाणवणे.

काही काम न करता ही थकवा जाणवणे. हे बिघडलेल्या लिव्हरमुळे असू शकतं.

⇒ लघवीचा रंग बदलणे. युरीनचा कलर डार्क होणे. हे सुद्धा लिव्हर खराब असल्याचं लक्षण असू शकत.

हात, तळपाय, घोटे आणि पायांना सूज येणे.

फिकट किंवा मातीच्या रंगाची शौच होणे.

थोडं फार लागलं तरी मोठी जखम होणे. रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. रक्त लवकर गोठत नाही.

पोटात उजव्या बाजूला दुखू लागते. हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकतं.

मन कोणत्या कामामध्ये एकाग्र होत नाही. मन सतत भटकत राहते. हे सुद्धा लिव्हर खराब होण्यामुळे होऊ शकते.

चेहऱ्यावर सूज येणे – डोळ्यांच्या खालच्या भागावर सूज येणे हे लिव्हर खराब होण्यामागचं लक्षण असू शकतं. असं असलं तरी हे दुसऱ्या आजारांचे लक्षण देखील असू शकतं.

लिव्हरचा आकार वाढणे आणि त्यासोबत ते दुखणे हे देखील लक्षण दिसू शकते.

पुरुषांमध्ये लिव्हर खराब झाल्यावर इस्ट्रोजन हार्मोनची लेवल वाढू शकते त्यामुळे  टेसटेसटेरॉन ची लेव्हल कमी होते. त्यामुळे इनफर्टिलिटी चा प्रॉब्लेम निर्माण होतो.

⇒ फॅटी लिव्हर म्हणजे काय ? 

सर्व लिव्हर खराब होण्याची लक्षणे आहेत. जरी असली काही लक्षणे तरी तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून योग्य ती टेस्ट करून आपल्याला काही प्रॉब्लेम तर नाही ना हे कन्फर्म करून घेतले पाहिजे.

नाकातून पाणी येणे यावर असरदार घरगुती उपाय

लिव्हर खराब कशामुळे होतं, तर आपली चुकीची लाईफ स्टाईल, चुकीच्या सवयीमुळे ते खराब होऊ शकतं. चला तर मग बघूया लिव्हर खराब होण्या मागच्या सवयी –

लिव्हर खराब होण्या मागच्या सवयी –

१) जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे –

→ सर्वात पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे अल्कोहोलचे जास्त सेवन करणे. दारूमुळे आपल लिव्हर खराब होत हे सर्वांना माहीत असतं तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ही सवय आपल्याला सोडली पाहिजे.

→ दारूमुळे लिव्हरला सूज यायला लागते. सतत येणाऱ्या सूज मुळे मग जखमा तयार व्हायला लागतात. ज्याला आपण फायब्रोसिस म्हणतो. त्यानंतर लिव्हर हार्ड व्हायला लागतं. त्यानंतर त्याचा आकार लहान होतो अशा प्रकारे दारूमुळे लिव्हर खराब होते.

→ लिव्हर खराब होण्याचं प्रमाण हे अल्कोहोल घेण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतं म्हणजे जितके जास्त अल्कोहोलचे सेवन तुम्ही कराल तितक्या लवकर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं.

२) अन्य आजारांकडे दुर्लक्ष करणे –

→  लिव्हर खराब होण्यामागचा आणखी एक कारण म्हणजे आपल्याला असलेल्या अन्य आजारांकडे दुर्लक्ष करणे. प्रामुख्याने       डायबेटिसमळे लिव्हर खराब होऊ शकतं. डायबिटीस मुळे लिव्हर वर फॅट जमा व्हायला लागतं. त्यासोबतच हाय ब्लड प्रेशर, फुफुसांशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यामुळे देखील दिवस खराब होऊ शकते.

जे आजार आपल्याला आहेत, त्यांच्यावर योग्य उपचार आपण करून घेतले तर लिव्हर खराब होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो.

३) चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी –

→ जास्त प्रमाणात तेलकट, जंक फूड अन्नपदार्थ आपण घेत असू तर ते फॅट लिव्हर मध्ये जमा होतं यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं.

→ हे एका दिवसात होत नाही नेहमी असं अन्न घेत राहिलं तर लिव्हर मध्ये फॅट जमा होत राहतं. त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. त्यामुळे मग अशी सूज कायम राहिली तर त्यामध्ये फायब्रोसिस होतं ज्यामुळे लिव्हर खराब होतं.

→ हे व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे, फॅट जास्त प्रमाणात घेणे, प्रोटिन्स कमी घेणे, भाज्या, फळे न खाणे, एकसारख्या प्रकारचे जंक फूड जास्त घेत राहणे अशा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लिव्हर खराब होत. म्हणून आपल्या संपूर्ण शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी पोषण युक्त आणि हेल्दी आहाराचं सेवन आपण केलं पाहिजे.

४) स्मोकिंग, तंबाखू सारख्या सवयी –

→ स्मोकिंग, तंबाखू सारख्या सवयीमुळे लिव्हरवर सारखा टॉक्सिनचा भडीमार होतो आणि लिव्हरला इजा होत राहते. म्हणून ते खराब होते. त्यासोबतच वेगवेगळी औषधे घेतल्यामुळे देखील लिव्हर खराब होऊ शकते.

समारोप –

आज या लेखांमध्ये आपण लिव्हर खराब होण्याची लक्षणे, तसेच लिव्हर खराब होण्यामागच्या सवयी बघितल्या. जर तुम्हाला कोणते लक्षण दिसत असेल किंवा कोणता दुसरा आजार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टर कडे जाऊन त्यावर योग्य उपचार करून घ्या आणि औषधे वेळेवर घ्या. म्हणजे तुम्हाला त्यामुळे कोणता दुसरा आजार होणार नाही. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला भेट देत रहा.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top