जाणून घ्या लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे | Lavang Khanyache Fayde

आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणारी छोटीशी वस्तू म्हणजे लवंग तिचा उपयोग आपण रोजच्या जेवणामध्ये गरम मसाला म्हणून करत असतो. तुम्हाला माहित आहे का ? लवंगचा उपयोग फक्त जेवणामध्ये मसाल्या पुरताच मर्यादित नाही, तर त्याचे भरपूर आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला होतात. आज या लेखामधून आपण लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे बघणार आहोत. त्यासोबतच आपण लवंग कधी आणि कशाप्रकारे खाल्ली पाहिजे तेही बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता बघूया लवंग खाण्याचे कोणते फायदे आपल्या शरीरावर होतात ते.

लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे

लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

१. लवंगामध्ये antioxidants भरपूर प्रमाणात असतात. हे antioxidants वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराच्या कमतरता निर्माण होतात त्यांना स्लो करण्याचं म्हणजेच anti aging च काम करतात. Free radicals मुळे damage झालेले जे cells असतात त्यांना Repair करण्याचं काम लवंग करते आणि डायबेटिस, अर्थराइटिस, कॅन्सर सारख्या आजारांपासून आपले रक्षण करते.

२. लवंगमध्ये antibacterial properties असतात. जे आपल्या शरीरातील बॅक्टेरियाला मारण्याच काम करतात. म्हणून जर तुम्ही नियमितपणे लवंगचे सेवन केले तर वारंवार होणाऱ्या छोट्या आजारांपासून जसे सर्दी, ताप, खोकला यापासून आपण सुरक्षित राहू शकतो. लवंग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला ही मदत करते.

३. लवंगचे तेल हे आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप लाभकारी आहे. तुमची दाढ दुखत असेल, किंवा दाढेमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल, दाढ सुजली असेल तर कापसाच्या गोळ्यावर लवंग च्या तेलाचे काही थेंब टाकून तो कापसाचा गोळा दुखणाऱ्या दाढेवर ठेवल्याने दुखण्यावर त्वरित आराम मिळतो.

४. लवंग हे आपली liver health चे आरोग्य सुधारण्यास मदत करते. जर तुम्हाला सिरोसिस असेल, फॅटी लिव्हर चा प्रॉब्लेम असेल तुमचे लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर अशा स्थितीमध्ये लवंग तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. रिसर्च मध्ये असे दिसून आले आहे की लवंग लिव्हर मध्ये होणारे inflammation कमी करते. लिव्हर मध्ये काही अन्य प्रॉब्लेम असेल तर ते पण दूर करण्यास मदत करते.

५. लवंग आपल्या शरीरातील शुगर लेवल कमी करण्यात मदत करते. म्हणून डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी नियमित लवंग खाणे खूप उपयुक्त आहे कारण लवंगी आपल्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तातील शुगर कमी व्हायला मदत होते.

६. लवंग तुमचे कॅन्सर पासून रक्षण करण्यातही सक्षम आहेत. काही रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की लवंगांमध्ये असणारा युजेनॉल हे आपल्या शरीरातील पेशींमधील ट्यूमर सेल्सला संपवण्याचे काम करतो. म्हणून कॅन्सर सारख्या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी तुम्ही नियमितपणे लवंगचे सेवन जरूर केले पाहिजे.

७. लवंग आपली bone density वाढवायला मदत करते. जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस चा प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमची bone density कमी झाली असेल तर लवंगाच्या नियमित सेवनाने तुम्ही ती वाढवू शकता.

लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे

८ लवंग मध्ये analgesic गुणधर्म पण असतात. म्हणजे हे दुखणे दूर करण्याचे कामही करते. म्हणून जर तुम्हाला आर्थराइटिसचा त्रास असेल तर लवंगाच्या नियमित सेवनाने तुम्हाला फायदा मिळतो. तुम्ही लवंगाचे सेवन internally करू शकता आणि लवंगचे तेल externally दुखणाऱ्या सांध्यांना लावले तरी तुम्हाला खूप आराम मिळतो आणि सूज पण कमी व्हायला मदत होते.

९. पोटामध्ये जर अल्सर वगैरे झाले असतील तर ते बरे करण्यामध्येही लवंग खूप उपयुक्त आहे. लवंग चे नियमित सेवन केल्याने पोटामध्ये म्यूकसची लेयर असते जी आपल्या स्टमकचे ऍसिड पासून रक्षण करते. ती वाढते त्यामुळे ॲसिडचा आपल्या तर मग वर होणारा परिणाम कमी होतो आणि पोटातील अल्सर पासून आपल्या बचाव होतो. आधीच जर काही अल्सर झाले असतील तर तेही दूर करण्यात लवंग मदत करते.

लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे

१०. एका रुमालावर तीन-चार थेंब लवंग तेल टाकून थोड्या थोड्या वेळाने त्याचा वास घेत राहावा. यामुळे मळमळ उलट्या थांबायला मदत होते. सर्दीमुळे बंद झालेलं नाक मोकळं व्हायला ही मदत होते.

११. तोंडाचा दुर्गंध दूर करण्यामध्ये ही लवंग उपयुक्त आहे. लवंगाचे तेल पाण्यात घालून या पाण्याने गुन्हा केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते कारण लवंग मध्ये antibacterial गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश करतात.

१२. कान दुखी होत असेल तर लवंगाचे तेल आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन मिक्स करून कापसाच्या बोळ्यावर हे तेल टाकून तो गोळा कानात ठेवावा कान दुखी थांबते.

१३. लवंगामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल ही कमी व्हायला मदत होते म्हणून हृदयविकार असणाऱ्यांनी नियमितपणे लवंग खाणे फायद्याचे ठरते.

यांच्या आपल्या शरीरावर होणारे फायदे आपण वर बघितले आता लवंगचे सेवन आपण कसे केले पाहिजे ते आपण बघू.

लवंगचे सेवन कसे करावे ?

⇒ तुम्ही लवंग आपल्या जेवणातून जरी घेतल्या तरी त्याचे फायदे तुमच्या शरीराला मिळून जातात. एका दिवसामध्ये दोन तीन ते चार लवंगा तुम्ही आपल्या जेवणामधून घेऊ शकता.

⇒ तुम्ही लवंगची पावडर करून ती आपल्या पदार्थांवर टाकून त्याचे सेवनही करू शकता. त्या शिवाय चहा मध्ये दुधामध्ये लवंग टाकून त्याचे सेवन तुम्ही करू शकता.

⇒ औषधासारखं जर तुम्हाला लावून घ्यायचं असेल तर लवंग ची पावडर करून तुम्ही घेऊ शकता एका वेळी दोन ग्राम पावडर तुम्ही पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकता. हे दिवसातून एक वेळा तुम्ही घेऊ शकता. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हे घेऊ शकता.

⇒ लवंगाच्या तेलाचेही सेवन तुम्ही करू शकता. तीन ते चार थेंब लवंगाचे तेल दूध किंवा पाण्यातून तुम्ही दिवसातून एकदा घेऊ शकता.

लवंग खाण्याचे नुकसान –

⇒ लवंग खाण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात जे आपण वर बघितले पण लवंग हे प्रमाणापेक्षा जास्त घेतले तर याचे नुकसानही आपल्याला बघायला मिळतात कारण लवंगमध्ये असणारे युजेनॉल हे कंपाउंड toxic असते. जर हे जास्त प्रमाणात घेतले तर त्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका असतो.

लवंग उष्ण असतात काय ?

⇒ बहुतेक लोकांना पडणारा एक प्रश्न म्हणजे लवंगा उष्ण असतात काय ? तर हो लवंगा उष्ण असतात. म्हणून त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. पाच वर्षाखालील मुलांसाठी लवंगाचे तेलाचा वापर करू नये.

समारोप

तर आज या लेखांमधून आपण लवंग खाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे बघितले. तसेच आपण लवंगचे कशाप्रकारे सेवन करू शकतो तेही जाणून घेतले. तर तुम्ही पण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी लवंगाचे नियमितपणे सेवन करू शकता. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top