जाणून घ्या आहेत लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि तोटे कोणते आहेत ते

आपल्या रोजच्या आहारात  नियमितपणे वापरला जाणारा लसूण हा कोणत्याही पदार्थामध्ये टाकल्यावर त्याची टेस्ट वेगळ्याच लेव्हल वर घेऊन जातो. हा लसूण फक्त चव वाढवण्यापुरताच मर्यादित नाही तर यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म असतात. आपल्या पुराणामध्ये लसणाला ‘ महाऔषध ‘ असं सांगितलं आहे. लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयोडीन, व्हिटॅमिन ए, सी आणि आयर्न असते. त्यामुळे छोट्या आजारापासून ते मोठ्या आजारापर्यंत सर्व आजारांना नष्ट करण्याची ताकद लसणामध्ये आहे.

या लेखामध्ये तुम्हाला लसूण खाण्याचे आरोग्यावर होणारे आरोग्यदायी फायदे वाचायला मिळतील. त्यासोबतच लसूण कोणी खावा आणि कोणी खाऊ नये हे पण तुम्हाला वाचायला मिळेल. तर लसूण खाण्यासंदर्भात सम्पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. चला तर मग सुरवातीला बघूया लसूण कधी आणि आणि कसा खाल्ला पाहिजे म्हणजे त्याचे पूर्ण बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतील.

लसूण खाण्याचे फायदे

लसूण कशा प्रकारे खायला हवा ?

बहुतेकदा लसणाच्या पाकळ्या कच्च्या खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल किंवा शरीरामध्ये जास्त उष्णता असेल तर कच्चा लसूण खाल्ल्याने तुम्हाला त्रास जाणवू शकतात. लसणामध्ये सल्फर हा घटक असतो. म्हणून ज्यांना ‘ सल्फर ‘ या घटकाची ऍलर्जी असेल त्यांनी लसूण जास्त प्रमाणात खाल्ला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तसेच स्किन वर रॅशेस होऊ शकतात. म्हणून कच्चा लसूण खाण्याआधी फिजिशियन, डॉक्टरला जरूर भेटले पाहिजे.

आपल्यापैकी अनेकांना लसूण खायचा तर असतो पण तो कसा खावा ते समजत नाही. म्हणून आपण इथे बघू कि लसूण कधी खाणे चांगला आहे.

अधिक परिणामांसाठी यावेळी खा लसूण –

लसूण हा गरम असल्यामुळे हिवाळ्यामध्ये खाणेच जास्त चांगले आहे. पण हा दररोज खाणेही आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. तज्ञांच्या मते चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन दिवस तुम्ही लसूण खाल्ला पाहिजे. बाकी दिवस स्किप केले पाहिजे next week परत तीन दिवस लसूण खा. असे हिवाळ्यामध्ये ३ महिने तुमच्या आरोग्यसंबंधित कुठल्याही तक्रारी असतील त्या दूर होतात. याचा प्रत्यक्ष फरक बघण्यासाठी तुम्ही आधी ब्लड रिपोर्ट काढू शकता आणि लसूण खाल्ल्यावर तीन महिन्यांनी परत काढून बघा तुम्हाला तुमच्या रिपोर्ट्स मध्ये सुधार नक्की दिसून येईल.

तसेच लसणामुळे पचनासंबंधित सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होईल, पोट साफ होत नसेल तर ते व्यवस्थित व्हायला लागेल, जास्त वेळ टॉयलेटला जावे लागत असेल तर तरी तुमच्या आतड्यांना बळकटी मिळून हि तक्रार पण दूर होईल. भूकही चांगली लागेल. म्हणजे पूर्ण हेल्थ व्यवस्थित होण्यास मदत होईल.

लसूण खाण्याचे फायदे व तोटे

लसूण कशा प्रकारे खायला हवा ?

लसूण कच्चा खाणे तुम्हाला हि कठीण वाटतं असेल आणि तोंडाचा वास येतो म्हणून सकाळी लसूण खाऊन ऑफिस वगैरे ला जण तशी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. सोबतच लसणाचा वर्षी खूप उग्र असतो आणि तो तिखट पण लागतो म्हणून लसूण खाण्याची सोपी पद्धत आपण बघू.

तुम्ही लसूण जेवणाच्या वेळी घेऊ शकता. आणि तो कच्चा न खाता फोर्क ला लावून लसणाच्या २- ३ पाकळ्या भाजून घ्या जेवणासोबत खा. याची टेस्ट पण तुम्हाला चांगली लागेल. आणि त्याचे फायदेही तुमच्या शरीराला मिळतील. आणि तुम्ही अशाप्रकारे लसूण घरातील सर्वांना देऊ शकता. अगदी लहान मुलेही अशाप्रकारे खातील. 

लसूण कोणी खाल्ला पाहिजे ?

  • आपल्याला खोकला, सर्दी झाली असेल किंवा हार्ट चा काही problem असेल, डायबेटीस, लठ्ठपणा असेल तर सहजपणे लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसूण खाणे चांगले आहे आरोग्यदायी आहे पण मी जसे वर सांगितल्याप्रमाणे आपली प्रकृती, आपल्याला असलेले आजार बघूनच आपण लसूण खाल्ला पाहिजे. चला तर मग बघूया लसूण कोणी खाल्ला पाहजे –
  • सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी लसूण लाभदायक आहे. लसूण आपला कफ विरघळण्यात मदत करतो.
  • मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी रोज आपल्या जेवणात लसणाचा अवश्य वापर केला पाहिजे. लसणात एलिसीन हा घटक अँटी इन्फ्लमेटरी, अँटी ऑक्सिडंट, अँटी व्हायरल, अँटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनच सिक्रीशन वाढत. आणि डायबेटीस कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.
  • पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पण लसूण उपयुक्त आहे. २-३ लसणाच्या पाकळ्या, आवळ्याचा रस, भलेल हिंग एकत्र करून दररोज घेतल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
  • संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी २-३ लसणाच्या पाकळ्या तुपात तळून रोज जेवणाआधी खाल्ल्या पाहिजे याने कंबरदुखीचा त्रासही बारा होतो.
  • पचनसंस्था सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर आहे.
  • पॅरालिसिस चा त्रास झाला असेल लसूण तिळाच्या तेलामध्ये तळून खाल्ला पाहिजे.
  • डिप्रेशनचा त्रास असणाऱ्यांनी आपल्या आहारात लसणाचा समावेश केला पाहिजे. कारण लसणाच्या सेवनाने स्ट्रेस आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
  • ज्यांना फ्रॅक्चर झालं आहे त्यांनी रोजच्या आहारामध्ये लसूण घ्यायला हवा. यामुळे फ्रॅक्चर लवकर बरे होण्यास मदत होते.
  • कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल तरी तो बारा होण्यासाठी तुम्ही लसूण खाल्ला पाहिजे. कारण लसूण रक्त शुद्ध करतो त्यामुळे एक्झिमा, पिंपल्स, गळवे असे अनेक त्वचा विकार लसणाच्या सेवनाने आणि लसणाचा रस त्वचेवर चोळल्याने दूर होतात.

 

कोणी लसूण खाणे टाळावे ?

  • कमजोर पचनशक्ती असणाऱ्यांनी कच्चा लसूण खाणे टाळावे. कारण लसणामध्ये फ्रुक्टोज असते ज्यामुळे अन्ननलिकेच्या भागामध्ये जळजळ होऊ शकते.
  • रक्त पातळ करणारी औषधे जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही लसूण खाऊ नये. कारण लसूणही आपले रक्त पातळ करण्याचे काम करत असतो. अशामध्ये आपले रक्त जास्त पातळ होण्याचा संभव असतो. आणि अशावेळी नाकामधून रक्त देखील येऊ शकते.
  • ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी लसूण खाणे टाळले पाहिजे. काही केसेस मध्ये पित्ताचा त्रास असणारे लसूण खाऊ शकतात. ज्यांना लसूण खान सूट करत असेल कारण त्यांचं शरीर लसणामुळे उत्पन्न झालेलं अतिरिक्त पित्त ससटेन करण्यात सक्षम असेल ते पित्ताचा त्रास असणारे लोकही लसूण खाऊ शकतात.
  • गरम वातावरण असल्यावर लसूण खाणे टाळले पाहिजे. कारण लसूण हा पण गरम प्रकृतीचे असते. 
  • मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी पण लसूण खाणे टाळले पाहिजे.
  • शस्त्रक्रिया होणार असेल त्यापूर्वीदेखील लसूण खाणे टाळले पाहिजे.
  • लसणामध्ये सल्फर असते म्हणून ज्यांना सल्फर ची ऍलर्जी आहे त्यांनी देखील लसूण खाणे टाळले पाहिजे.

 

समारोप –

तर मित्रांनो आज या लेखामधून आपण जाणून घेतले कि लसूण खाण्याचे फायदे कोणते आहेत, लसूण कोणी खाणे फायद्याचे आहे कुणी लसूण खाणे टाळले पाहिजे. तर मला आशा लसूण खाण्याबद्दल पुरेशी माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल. तुमचे काही सजेशन, प्रतिक्रिया असतील त्या खाली कमेंट मध्ये सांगू शकता. अधिक आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी Aarogya Mantra 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!

 

FAQs

१. लसूण कधी खावे?

Ans  – तज्ञाच्या मते लसूण हा लसूण हा हिवाळ्यामध्ये खाणे जास्त फायद्याचे ठरते. कारण लसूण हा गरम प्रकृतीचा असल्यामुळे त्याचे कोणतेच दुष्परिणाम थंड वातावरणामध्ये आपल्या शरीरावर होत नाहीत.

२. माझे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मी लसूण कधी खावे?

Ans  – लसणामध्ये एलिसीन नावाचा घटक असतो जो रक्त पातळ करण्याचे काम करतो.म्हणून कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक ठरते. डॉक्टरांच्या मते तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण सकाळी खाल्ले पाहिजे.

३. रोज लसूण खाल्ल्यास काय होते?

रोज लसूण खाणे चांगले आहे पण  सर्वांसाठीच नाही. मधुमेह आणि उच्च रक्दाब असणाऱ्यांनी रोज लसूण खाल्ल्याने मधुमेह आणि रक्दाब कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.

४. आपण रिकाम्या पोटी लसूण खाऊ शकतो का?

 Ans  – हा. तुम्ही रिकाम्या पोटी लसूण खाऊ शकता. म्हणून लसणाचा पूर्ण बेनिफिट शरीराला मिळण्यासाठी डॉक्टर सकाळी लसूण खाण्याचा सल्ला देतात.

५ .लसूण रक्तदाब कसा कमी करतो?

 Ans  – एलिसीन हे लसणात एक प्रमुख कंपाऊंड असते. जे एंजियोटेनसिन या हार्मोनच्या तयार होण्याला रोखू शकते, जे रक्तवाहिन्यांच्या आकुंचन करून रक्तदाब वाढवण्यास जबाबदार असतात. म्हणून रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top