बऱ्याच वेळेला आपलं बाळ जास्त रडत असेल तर आईला, बाकी घरच्यांना काळजी वाटते. बाळाला काय झाले ते समजत नाही. पण लहान मुलांच्या किंवा बाळाचे रडणं हे नॉर्मल आहे. बाळाला भूक लागली असेल किंवा झोप आली असेल, काहीही सांगायचं असेल तरी पण हे रडूनच सांगत असतो. म्हणून बाळ जर जास्त रडत असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. आपण बघतो की लहान मुले हे दिवसापेक्षा रात्री जास्त रडतात, कधी कधी झोपेमध्ये दचकून जागे होतात तर Lahan Mul Ratri Ka Radtat ते आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.
अनेकदा असं म्हटलं जातं की बाळाला काहीतरी दिसत असतं किंवा सटवाई दिसत असते. म्हणून बाळ रडत किंवा स्वप्न पडतात म्हणून रडतं. लहान मुलांना काही दिसत असेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही स्वप्न वगैरे दिसत असतीलही कदाचित. आपण बघू लहान मुलं रात्री रडण्याची कारणे कोणकोणती असू शकतात आणि कोणत्या उपायांनी आपण बाळाचे रडणे थांबवू शकतो ते.
Lahan Mul Ratri Ka Radtat –
लहान बाळ म्हणजे साधारणतः जन्मापासून ते तीन ते चार महिन्याचं होतं तोपर्यंत जास्त रडते. कारण आदित्य आईच्या गर्भामध्ये असते तिथे जास्त आवाज नसतो उजेड नसतो हात पाय जमा झालेल्या अवस्थेमध्ये बाळ ९ महिने तिथेच राहतो. त्याला तिथल्या वातावरणाची सवय झाली असते. पण या जगात आल्यावर इथली गर्दी, आवाज, उजेड इथले पूर्ण वातावरण वेगळं असतं म्हणून अनेक वेळा आई जवळ नसेल तर बाळ अचानक करायला लागतं. पोट वगैरे व्यवस्थित भरले असेल तरी रडतं त्याचं हेच कारण असतं. सुरुवातीचे तीन ते चार महिन्यानंतर बाळाला या सर्वांचे सवय होते.
दिवसापेक्षा रात्री बाळ जास्त का रडतं ? तर दिवसभर बाळाला आजूबाजूला लोक दिसतात, बोलतात, थोडा आवाज गडबड सुरू असते उजेड असतो तर रात्री सर्व शांत होतं सर्व जण झोपलेले असतात त्यावेळी बाळाला जर झोप येत नसेल तर ते रडते कारण त्याला अटेंशन पाहिजे असतं. दिवस आणि रात्र काय असतं हे समजायला त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. थोडं समजून घ्याव लागत. हळूहळू बाळाला या सर्वांची सवय होते मग त्याचा रात्रीच रडणे आपोआप कमी होत.
लहान मुलांना /बाळाला रात्री झोपताना या गोष्टींची काळजी घ्या –
तुमचे बाळ जर खूप लहान असेल तीन महिन्यांपेक्षा लहान असेल, तर बाळाची झोपण्याची रूम ही उपदार आणि शांत असावी. तिथे जवळ टीव्ही वगैरे चा आवाज नसावा म्हणजे बाळाला शांत झोप येईल.
लहान बाळ आईच्या पोटामध्ये एका पिशवीमध्ये बांधल्यासारखे असते. म्हणून बाहेर आल्यावर आपण जेव्हा त्याला सरळ पाय करून झोपतो ते सुरक्षित वाटत नाही. लहान मुलांना सुरुवातीचे दोन-तीन महिने तरी एखाद्या सुती कपड्यांमध्ये बांधूनच झोपवावे म्हणजे त्याला सुरक्षित वाटते.
लहान मुलांना अनेक वेळा खूप जोरात भूक लागली असते म्हणून पण ते रडतात कारण रडून सांगण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. बोलून तर ते आपल्याला सांगू शकत नाही. रात्री झोपण्या आधी बाळाला पोटभर खायला देऊन मगच झोपवले पाहिजे.
लहान मुलांच्या झोपेच्या वेळा फिक्स असणे खूप गरजेचे असते. त्यांच्या झोपेच्या वेळी जर आपण त्याला झोपले नाही, तर नंतर त्याला झोप लागत नाही म्हणून पण ते रडू लागते. यासाठी लहान मुलं दोन ते तीन वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा या पाळल्या पाहिजेत.
मुलांना काही चावलं वगैरे तरी ते रात्री रडून उठतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ सुरक्षित ठिकाणी झोपवले पाहिजे. जेणेकरून त्यांना मच्छर मुंगी वगैरे चावून झोप मोडणार नाही.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण Lahan Mul Ratri Ka Radtat याची माहिती बघितली. जर तुमचेही लहान मुलं असेल तर वर सांगितलेले उपाय करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल. अधिक विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!