दिवसभर काम करून थकल्यानंतर आपल्याला रात्री शांत आणि पुरेशी झोप घेणे हे गरजेचे असते. रात्रीच्या शांत विश्रांती नंतरच आपला दुसरा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरपूर असा जात असतो. पण रात्री झोपताना कोणत्या दिशेला पाय करून झोपावे आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. पण प्रत्येक दिशेचे आपले एक महत्व आहे. आपले शास्त्र आणि विज्ञान याबद्दल काय बोलते हे , या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ग्रंथांमध्ये झोपण्याच्या दिशांबद्दल सांगितलेले आहे. रात्री शांत, पुरेशी झोप न झाल्याचा परिणाम हा आपल्या दुसऱ्या दिवसांच्या कामांवर होत असतो. चला तर मग चांगल्या आणि शांत झोपेसाठी काय आवश्यक आहे आणि काय नाही ते आपण बघू.
# कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये ?
झोपण्याच्या दिशेबाबत विज्ञान आणि शास्त्र यांचे मत सारखे आहे. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यामुळे डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो. आणि पायात प्रवेश करतो. शरीरातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होते. दक्षिणेकडे पाय करुन झोपल्याने शरिरातील सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होत राहते. अन्न पचन व्हायला अडथळा निर्माण होतो. सूक्ष्म तंतूची उलट दिशेने क्रिया सुरू झाल्याने मेंदूला थकवा जाणवतो. योग्य तो आराम मिळत नाही. तसेच वाईट स्वप्न पडू लागतात. मधून मधून नेहमी जाग येते म्हणून दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये असे विज्ञान सांगते.
धर्मशास्त्राच्या दृष्टीने बघितल्यास दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. कारण ती यमाची दिशा आहे. आणि यम म्हटलं की सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण होते. म्हणूनच थोडक्यात बघितले तर विज्ञान आणि धर्म यांचा दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याबाबत एक मत आहे.
# कोणत्या पद्धतीने (पोझिशन मध्ये) झोपावे ?
चांगली झोप ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. आपल्यापैकी बहुतेकांना चुकीच्या दिशेने झोपल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाम बद्दल माहिती नसते. आपल्या आपल्या झोपण्याच्या पोझिशनमध्ये बदल केले तर खूप चांगले परिणाम आपल्याला दिसू शकतात.
म्हणून योग्य पोजिशन मध्ये झोपणे हे खूप महत्त्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे पचनात गडबड होणे, व्यवस्थित झोप न येणे, थकवा जाणवणे तसेच आपले स्किन, केस यावरही आपल्या झोपण्याची पद्धतीचा परिणाम होत असतो.
- पोटावर म्हणजे उलटे झोपणेही हानिकारक मानले जाते. जास्त वेळ असं झोपल्यामुळे आपल्या खूप फूफुसांवर दबाव येतो. अस्थमा सारखा आजार असणाऱ्यांसाठी असे झोपणे धोकादायक ठरू शकते.
- त्यासोबतच उजव्या बाजूला/कुशीवर झोपणे हे चांगले मानले जात नाही. कारण आपले हृदय हे डाव्या बाजूला असतं. त्यामुळे उजव्या बाजूला झोपल्यामुळे विरुद्ध दिशेला दबाव पडू लागतो आणि पचनाचे हि अनेक आजार संभवू शकतात.
- म्हणून आपण डाव्या बाजूला तोंड करून झोपण्याला योग्य झोपण्याची पद्धत मानली गेली आहे. आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही मध्ये डाव्या बाजूला झोपणे उत्तम मानले आहे.
# चांगली झोप येण्यासाठी-
⇒ रोज रात्री सहा ते आठ तासांची झोप ही प्रत्येकाने घेतलीच पाहिजे त्यामुळे आपल्या मेंदूला शरीराला आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशी शरीरामध्ये ऊर्जा आणि ताजेपणा टिकून राहतो.
⇒ वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे उत्तम मानले जाते.
⇒ पूर्व दिशाही झोपण्यासाठी चांगली मानली गेली आहे. पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपल्याने चांगल्या झोपेचा अनुभव येऊ शकतो. पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा असल्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे गरजेचे मानले गेले आहे.
⇒ विवाहित लोकांसाठी दक्षिण तसेच दक्षिण पूर्व नैऋत्य दिशेला डोक्यात ठेवून झोपणे सर्वोत्तम मानले जाते.
धर्मशास्त्रानुसार पूर्वेकडे डोकं करून झोपल्याने विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते.
⇒ चांगल्या झोपेसाठी आपलं डोकं हे पूर्व किंवा दक्षिण दिशेला असले पाहिजे असे वास्तुशास्त्र सांगते कारण झोपेवरच आपल्या संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. झोप चांगली होत असेल तर आपल्या आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
⇒ वास्तुशास्त्रानुसार आपले बेडरूम ईशान्य दिशेला नसावे. तसेच आपणही ईशान्य दिशेला झोपणे टाळलं पाहिजे. यामुळे मोठे आजार होऊ शकतात.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये आणि कोणत्या दिशेने झोपणे योग्य आहे याबद्दल माहिती बघितली. तुम्ही कोणत्या दिशेला झोपता ते खाली कमेंट मध्ये सांगा आणि अन्य आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
FAQs-
Q1. कुठे डोके करून झोपावे?
Ans – वास्तुशास्त्रानुसार आपण दक्षिणेकडे डोके करून झोपणे उत्तम मानले जाते. हे शक्य नसल्यास तुम्ही पूर्वेला डोकं करून झोपलं पाहिजे.
Q2. पूर्वेकडे पाय करून झोपावे का?
Ans – नाही. वास्तुशास्त्रामध्ये पूर्वेकडे झोपण्याला शुभ मानले गेले आहे. पूर्व हि उगवत्या सूर्याची दिशा असल्यामुळे पूजाअर्चा, ध्यान तसेच चांगल्या कार्य हे पूर्व दिशेला केले जातात.
Q3. उत्तर-पश्चिम दिशा झोपण्यासाठी चांगली आहे का?
Ans – नाही. उत्तर-पश्चिम दिशा हि झोपण्यासाठी योग्य नाही. कारण तुमच्या ब्लड सरक्यूलेशन वर परिणाम करते. दक्षिण आणि पूर्व या दोन दिशा झोपण्यासाठी चांगल्या आहेत.