आज-काल बदललेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोट साफ न होणे, पचनाशी संबंधित अनेक तक्रारी फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे बघायला मिळत आहेत. कोमट पाण्यात तूप घालून पिल्याने आपल्या शरीर आतून मजबूत बनण्यास मदत होते. कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे कोणकोणते फायदे आपले शरीराला होतात तेच आपण या लेखांमधून बघणार आहोत.
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे –
ऐकायला जरी वेगळं वाटत असेल तरी याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात. मुळात तूप हेच आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे. लोकांना असं वाटतं की तूप खाल्ल्याने वजन वाढते पण असं काही नाही. तेल जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याने आपले वजन वाढत असते. अशाप्रकारे सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात त एक चमचा तूप टाकून घेतल्याने एक प्रकारे शरीराच्या आतल्या भागाचे ग्रिसिंग होते.चला तर मग बघूया कोमट पाण्यात टाकून घेण्याचे फायदे कोणते आहेत ते.
१. तुम्हाला जर पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करून बघितला पाहिजे. हे कसे घ्यावे त्याबद्दल सविस्तरपणे आपण खाली बघू त्याप्रमाणे जर तुम्ही घेतले तर पोट साफ न होण्याची तक्रार कधीच उद्भवणार नाही.
२. ऍसिडिटी, पित्त, ढेकर यांचा त्रास होत असेल तर तोही गरम पाण्यात तूप टाकून पिल्याने बरा होतो.
३. यामुळे त्वचा चमकदार, मुलायम दिसण्यास मदत होते.
४. तुपामध्ये विटामिन A, D मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याचबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखी पोषक तत्वे असतात. म्हणून त्वचा कोरडी पडण्याची तसेच सांधेदुखीची समस्या असेल, तर तीही दूर व्हायला मदत होते.
५. मासिक पाळीच्या सर्व समस्या पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना पण यामुळे निघून जातात. म्हणून जास्त यांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होत असेल त्यांनी हा उपाय जरूर केला पाहिजे.
६. कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने आपल्या शरीरातला वात आणि कफ निघून जातो.
७. आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतील तर ते पण दूर होण्यास मदत होते कारण ब्लॉकेजेस मध्ये हे तूप lubricantच काम करतं.
८. तुप बुद्धीवर्धक असतं. म्हणून पाण्यामध्ये तूप टाकून प्यायल्याने बुद्धीची क्षमता वाढण्यातही मदत होते.
कोमट पाण्यामध्ये तूप टाकून घेण्याचे फायदे आपण वर बघितले. पण ते योग्य पद्धतीने घेणे ही तितकेच गरजेचे असते. हे घेण्याची पद्धत कोणती आहे ते आता आपण बघू.
कोमट पाण्यामध्ये तूप टाकून घेण्याची पद्धत –
⇒ तूप हे थंड प्रकृतीचे असते आपल्या शरीरासाठी तूप हे खूप फायद्याचे असते म्हणून प्रत्येकाने रोज एक ते दोन चमचे तूप हे खाल्ले पाहिजे त्याने भरपूर फायदे शरीराला होत असतात तूप कोमट पाण्यासोबत घेण्याचा हा उपाय आपल्याला सलग सात दिवस आणि रोज सकाळी उपाशीपोटी करायचा आहे.
⇒ यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून थोडं गरम असेल तेव्हाच प्या.
⇒ हे घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका त्यानंतर नाश्ता वगैरे करा.
⇒ हा उपाय तुम्हाला तीन ते चार महिन्यांमधून एक वेळा करायचा आहे असे केल्याने तुमची पोट साफ न होण्याची तक्रार पूर्णपणे बरी होईल, पचनासंबंधीच्या इतर तक्रारी ही दूर होतील आणि मासिक पाळी संबंधित समस्या ही पूर्ण बऱ्या होतील, त्वचा सुरकुत्या रहित आणि चमकदार बनेल.
( Note : जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रास दूर होण्यासाठी हा उपाय करत असाल तर पाळीच्या वेळी जेव्हा तुमचं पोट दुखत असेल तेव्हाच हा उपाय करावा. तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा ही हे तूप टाकून कोमट पाणी घेऊ शकता. यामुळे पोटदुखीची समस्या दूर होईल पण इतर वेळी हा उपाय करू नये फक्त मासिक पाळीच्या दिवसांमध्येच करावा. )
समारोप –
तर आज आपण कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे कोणते फायदे आपल्या शरीराला होतात ते बघितले. असे तूप टाकून पाणी पिल्याने आपल्या पचना संबंधित सर्व तक्रारी दूर होतात. तुम्हालाही जर कोणता त्रास असेल किंवा नसेलही तरी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि त्याचे काय फायदे तुम्हाला बघायला मिळाले ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!