ही आहेत किडनी खराब होण्याची लक्षणे | Kidney Kharab Honyachi Lakshane

शरीरातील प्रत्येक अवयवाचे आपले विशेष महत्त्व आहे, किडनी हा त्यातील एक महत्वाचा अवयव आहे . किडनी आपले रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील विषारी घटक लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासोबतच अन्य महत्त्वाचे कामही करते. किडनीचा आजार खूपच धोकादायक असतो कारण सुरुवातीला तो समजून येत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात किडनीचे एक जोडी असते. हे मुख्य रूपामध्ये पोटाच्या मागच्या बाजूला स्थित असते. जी आपल्या मूठी एवढी असते. जेव्हा कितने आपले रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करू शकत नाही तेव्हा त्याला किडनी फेल्युअर/किडनी खराब होणे असे म्हणतात.

किडनी खराब होण्याची लक्षणे

किडनी खराब होण्याची काही सामान्य लक्षणे असतात. पण आपली एक किडनी खराब झाली तरी दुसरी किडनी स्वस्थ असेल तर शरीरातील बाकी क्रिया सुरळीत सुरू राहतात. याच कारणांमुळे जोपर्यंत दोन्ही किडन्या काम करणे बंद करत नाही तोपर्यंत पेशंटला याची कल्पना नसते. किडनी खराब होते तेव्हा काही महत्त्वपूर्ण लक्षणे दिसू लागतात ती लक्षणे या लेखांमधून आपण बघणार आहोत. वेळीच जर याकडे लक्ष दिले तर आपण होणाऱ्या घातक परिणामापासून वाचू शकतो.

किडनी खराब होण्याची लक्षणे –

१. पोट दुखणे –

पोट दुखणे हे एक सामान्य लक्षण अनेक कारणाने पोट दुखू शकते. म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हे दुखणं जर पोटाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल आणि हे खूप जास्त होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते. जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकत नाही तेव्हा किडनीच्या आजूबाजूला जमा होतात ज्यामुळे किडनीच्या आसपासच्या भागाजवळ दुखू लागते.

२. पायांना सूज येणे –

हातापायांना सूज अन्यकारणामुळे ही येऊ शकते. अनेक वेळा किडनी मधल्या खराबीमुळे पायांमध्ये अचानक सूज येते. कारण किडनीमध्ये घाण जमा झाल्यामुळे किडनी व्यवस्थित काम करू शकत नाही. आणि रक्ताचा प्रवाह अचानक स्लो आणि फास्ट होऊ लागतो. म्हणून रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे पाय सुजतात. जे किडनी खराब होण्याचे एक लक्षण असू शकते. किडनीच्या आजाराचे हे सामान्य लक्षण मानले जाते. यामुळे चेहरा हात पायांची तळवे यांना सूज येते.

३. युरीन प्रॉब्लेम होणे –

जर एखाद्या व्यक्तीला लघवी करताना त्रास होत असेल, जळजळ होत असेल आणि लघवी जास्त किंवा कमी प्रमाणात जरी येत असेल तर हे किडनी खराब होण्यामूळे मोठे आणि प्रमुख लक्षण असो शकते.

४. लघवी मधून रक्त येणे –

आपल्या लघवी मधून रक्त आले तर त्याचा अर्थ आपली किडनी खराब होत आहे असा नाही तर आपल्याला काही दुसरा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे दुसऱ्या अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकते असा होतो.

५. युरीन मधून प्रोटीन येणे –

किडनीच्या आजारांचे अजून एक लक्षण म्हणजे मूत्रामध्ये प्रोटीन ची उपस्थिती असणे हे आहे. निरोगी किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि प्रोटीन सारखे पोषक घटक शरीरात ठेवतात.

६. थकवा जाणवणे –

EPO, Erithropoietin तयार करण्याचे काम किडनीचे असते जे शरीराला लाल रक्तपेशी बनवायला सांगतात. जेव्हा किडनीवर परिणाम होतो तेव्हा ते EPO कमी बनवतात. ज्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये घट होते यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनच्या प्रमाणावरही परिणाम होतो आणि व्यक्तीला जास्त थकवा जाणवतो.

७. मळमळ होणे –

किडनी मधल्या बिघाडामुळे व्यक्तीला ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो म्हणून व्यक्तीला चक्करही येऊ शकते तसेच अशक्तपणा जाणवू शकतो.

८. युरीनचा बदललेला रंग –

किडनीच्या विधारामुळे युरीन चा  (लघवीचा ) रंग देखील डार्क होऊ शकतो. हा रंगातील बदल किडनीच्या समस्येचे एक लक्षण असू शकते.

९. भूक कमी होणे –

काहीही खाण्याचे इच्छा होत नाही भूक कमी होते वजन कमी होते हे सुद्धा किडनीच्या बिघाडामुळे होऊ शकते.

१०. त्वचा कोरडी पडणे / खाज येणे –

किडनी खराब झाल्याने विषारी पदार्थ रक्तात जमा होतात परिणामी त्वचेला खाज सुटते त्याच्या कोरडी पडते.

११. उच्च रक्तदाब मधुमेह असणे –

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल किडनी लवकर खराब करतात.

 

वरील लक्षणे तुम्हाला दिसून येत असतील तर तरी डॉक्टरांना दाखवले पाहिजे आणि त्यावर योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत.

किडनी खराब होण्याची कारणे –

किडनी ची समस्या कशामुळे निर्माण होते तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात ती आपण खाली बघू.

⇒  हृदयरोग

⇒  हृदयविकाराचा झटका

⇒  हाय ब्लड प्रेशर

⇒  काही औषधे

⇒  अनियंत्रित मधुमेह

⇒  अति प्रमाणात मद्यपान

⇒  एलर्जीक रिएक्शन

⇒   काही प्रकारचे कर्करोग

 

या कारणामुळे किडनीमध्ये खराबी होऊ शकते.

समारोप –

आज या लेखांमधून आपण किडनी खराब होण्याची लक्षणे बघितली. आपले शरीर तसेच किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिले पाहिजे, तसेच किडनीची काळजी घेतली पाहिजे. लघवीशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर त्याकडे नीट लक्ष ठेवले पाहिजे आणि आवश्यकता असल्यास डॉक्टरांना भेटले पाहिजे. काही चुकीचे होत आहे अशी शंका असल्यास त्वरित उपचार घेतले पाहिजे. अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  !!!!!!!!!!

 

FAQs –

Q1  किडनी खराब झाली आहे हे कसे कळेल?

Ans  – किडनीचा आजार जसा वाढत जातो तसे खालील लक्षणे तुम्हाला दिसू लागतात. भूक न लागणे , मळमळ होणे , हातापायांच्या तळव्यांना सूज येणे , लघवी जास्त किंवा कमी येणे , लघवी करताना त्रास जाणवणे , थकवा जाववणे.

Q2  किडनी चांगली राहण्यासाठी काय करावे?

Ans  – किडनी चांगली राहण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा –

♦ दुधाच्या पदार्थांचे सेवन कमी करा (दही, पनीर, चीज, ताक)

♦ दररोज भरपूर प्रमाणात पाणी प्या

♦ ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रित ठेवा 

♦ नियमितपणे एक्सरसाइज करा

♦ वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घ्या

Q3  स्टेज 4 किडनी रोग कशामुळे होतो?

Ans  – किडनीच्या रोगालाच क्रोनिक किडनी डिसीज असे म्हणतात. शरीराला कोणत्याही प्रकारची झालेली दुखापत, मधुमेह, उच्चरामदाब यामुळे किडन्या खराब होऊ शकतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top