केस दाट होण्यासाठी आपण काय खावे | Hair Thickening Tips In Marathi

आपले सुंदर आणि दाट केस असावेत हि प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण आजकाल unhealthy lifestyle आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्स च्या वापराने आणि अन्य कारणांनी केस गळू लागतात आणि पातळ होतात. केसांना आतून (मुळांपासून ) मजबूत  आणि दाट बनवण्यासाठी बहुतेकवेळा त्यांना आतून पोषण देण्यासाठी तुम्हाला रोजच्या खाण्याच्या सवयीमध्ये काही बदल केले, काही गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक असे बदल तुमच्या केसांवर दिसून येतील. केस दाट बनवण्यासाठी बहुतेकवेळा तेल, शाम्पू अशा गोष्टींचा वापर केला जातो पण त्याचे हवे तसे परिणाम आपल्याला दिसत नाहीत. आज या लेखामध्ये आपण बघणार आहोत कि केस दाट होण्यासाठी काय खावे ?

पोषणयुक्त आहाराच्या सेवनाने आपले केस आतून मजबूत होतात. जे बाहेर वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्टस पेक्षा जास्त बेस्ट रिजल्ट्स देतात. आणि ज्या गोष्टींचा समावेश आपण आपल्या डाएट मध्ये करणार आहोत ते केसांच्या आरोग्यासाठी तर उत्तम आहेच शिवाय आपल्या हेल्थ साठी पण बेनिफिशियल आहे.

सुरवातीला आपण बघू कि आपले के केस पातळ का होतात. जेणेकरून तुम्ही आपण या चुका करत असाल तर आता पासून त्या बंद कराल. चला तर मग पुढे वळूया.

केस दाट होण्यासाठी आपण काय खावे

केस पातळ का होतात ?

  • महिला आणि पुरुषांमध्ये केस पातळ होण्याची करणे वेगवेळी असू शकतात. काही मुख्य करणे आपण खाली बघू.
  • केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे केस गळायला लागतात. केसांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे असते.
  • केसांना जोरात खेचल्यामुळे तसेच केसांची टाइट पोनीटेल , वेगवेगळ्या हेरस्टाईल यामुळे केस पातळ होऊ शकतात.
  • शरीरामध्ये व्हिटॅमिन्स च्या कमतरतेमुळे, झटपट वजन कमी करण्याच्या चक्कर मध्ये केस गाळण्याची समस्या होऊ शकते.
  • अनेकवेळा औषधामुळे हि केस गळू लागतात. काही सर्जरी, परषां नंतरही केस पातळ होऊ शकतात.
  • चिंता, स्ट्रेस मुळेही केस गळ्याला लागतात. तसेच महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे पण केस गळू शकतात.
  • जीन्स पण केस गाळण्यावर असर करतात. तुमच्या फॅमिलीमध्ये जर केस गळण्याचे प्रॉब्लेम्स असतील तर तुमचेही केस गळू शकतात.
  • वयानुसार पण केस पातळ होऊ लागतात. बहुतेक केसेस मध्ये एका ठराविक वयानंतर केस गळतीची समस्या बघायला मिळते.

केस दाट होण्यासाठी काय खावे ?

१. बिया आणि ड्राय फ्रुटस –

बिया केसांना पोषण देण्याचे काम करतात. तुम्ही आपल्या रोजच्या डाएटमध्ये बियांचा आणि ड्राय फ्रुटस समावेश नक्की करा. सूर्यफुलाच्या (Sun flower), भोपळ्याच्या (Pumkin), सब्जाच्या (Chia Seeds) या बिया रोज सकाळी १ चमचा घेण्याची तुम्ही सवय करून घ्या. या तुम्ही भाजून घेऊन मिक्स करून घेऊ शकता. किंवा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी यांचे सेवन करू शकता. तसेच सलाड किंवा इतर पदार्थांमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकता.

बदाम आणि आक्रोड यांचा तुम्हाला आपल्या रोजच्या डाएट मध्ये समावेश करायला हवा. या बिया आणि ड्राय फ्रिट्स मध्ये natural oil सोबत omega 3 fatty acid भरपूर प्रमाणात असते. जे केसांना पोषण देऊन मजबूत बनण्यामध्ये मदत करतात. तसेच यामध्ये झिंक सुद्धा असते. जे पेशींचे पुनरुत्पादन वाढवते. आणि केसांचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, तांबे यांसारखे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असतात.

२. पालक –

पालक हि पालेभाजी केसांसाठी पोषक असणाऱ्या घटकांपैकी एक आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी , पोटॅशियम, कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये लोह सुद्धा भरपूर असते. जे शरीरातील प्रमुख खनिजांपैकी एक आहे. जे शरीरात ऑक्सिजन आणि पोषण द्रव्यांचे वाहन करते. आहारामध्ये लोहाचे प्रमाण वाढवल्यास केसांच्या आरोग्यमध्ये लक्षणीय बदल दिसून येतात. पालकाचे पराठे किंवा भाजी वगैरे तुम्ही घेऊ शकता पण जास्त शिजवल्यावर त्यातली पोषक तत्वे नष्ट होतात म्हणून पालक हि जास्त शिजणार नाही याची काळजी आपण घेतली तर त्याचे पूर्ण फायदे आपल्याला मिळू शकतील.

केस गळती थांबवण्यासाठी काय खावे?

३. गाजर –

गाजरामध्ये केसांना होणारे असंख्य फायदे बघायला मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. केसांच्या वाढीसोबतच शरीरातील पेशींच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे असते. हे केसांच्या वाढीला जलद करते. गाजर केसातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी तसेच अकाली केसांचे सफेद होणे रोखण्यासाठी देखील ओळखले जाते. म्हणून तुम्ही आपल्या आहारात गाजर हे घेतलेच पाहिजे. सलाड मध्ये तुम्ही गाजर खाऊ शकता.

४. आंबट फळे –

संत्री, द्राक्षे, लिंबू, आवळा यांसारखी फळे व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत आहेत. व्हिटॅमिन सी कॉलेजनचे उत्पादन वाढवते. आणि स्काल्प चे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत करते. हि फळे केसांना योग्य ते पोषण देतात आणि केसांची वाढ अधिक जलद गतीने होण्यास मदत करतात. आपले केस निरोगी आणि दाट बनवण्यास मदत करतात. म्हणूनच केसांचे आरोग्य उत्तम बनवण्यासाठी तुम्ही पण आपल्या दैनंदिन आहारामध्ये सीजन मध्ये जी आंबट फळे येतात, त्यांना सामील करून घ्यायला हवे.

५. सोयाबीन –

सोयाबीन मध्ये मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच सोयाबीन omega 3 fatty acid चा पण समृद्ध स्रोत आहे. त्याबरोबरच यामध्ये मँगनीज हि आढळून येते. जे कोरड्या केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही सोयाबीन पण आपल्या डाएट मध्ये इन्क्लुड केले पाहिजे.

केस गळती थांबवण्यासाठी काय खावे?

६. अंडी –

जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी तुम्ही आपल्या डाएट मध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करायला हवा. कारण अंड्यामध्ये कॉलेजन चे उत्पादन वाढवणारे विविध प्रथिने असतात. कॉलेजन हे केसांची ताकद आणि आजहि वाढवते. तसेच अंड्यामध्ये बायोटिनदेखील असते, जे केसांचा महत्वाचा भाग आहे. त्याबरोबर व्हिटॅमिन ए आणि डी, ल्युटीन सारखी पोषकद्रव्ये पण अंड्यामध्ये आढळून येतात. जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

७. रताळे –

रताळे हे मोस्टली उपवासालाच खाल्ले जाते. पण त्यामध्ये पण खूप पोषक घटक असतात. रताळ्यामध्ये बीटा- केरोटीन हा घटक जास्त प्रमाणात असतो. ज्याचे रूपांतर शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये होते. त्यामउळे आपले स्काल्प निरोगी राहण्यास मदत होते. केसांमध्ये dandruff होत नाही. तसेच व्हिटॅमिन ए केसांच्या वाढीला गती देण्याचे काम करते. ज्यामुळे केस लांब व दाट होतात. म्हणून रताळे पण आपण नियमित आहारमधून घेतले पाहिजे.

८. कडधान्ये –

कडधान्य हे परिपूर्ण अन्न मानले जाते. कारण त्यामध्ये बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन बी यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  कडधान्ये तुम्ही उसळ बनवून, किंवा वाफवून घेऊन सलाड मध्ये किंवा भाजी बनवून हि आपल्या डाएट मध्ये सामील करून घेऊ शकता.

तर मित्रांनो वर आपण काही फूड्स बघितले ज्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून महिन्याभरामध्येच तुम्ही आपल्या केसांमध्ये व्हिजिबल डिफरंस बघू शकता. तुम्ही पण केसांसाठी यांचा आपल्या आहारात समावेश नक्की करा.

आता आपण  केसांना दाट बनवण्यासाठी एक्सएपर्ट्स नि सांगितलेल्या काही खास टिप्स बघणार आहोत त्या पण तुम्ही फॉलो करून बघा. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या टिप्स –

 केस गळती थांबवण्यासाठी काय खावे?

केसांना दाट बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी –

  • जर तुमचे स्काल्प ऑईली असेल तर दर दोन तीन दिवसांमधून तुम्ही केस धुतले पाहिजे. तुमचे केस आणि स्काल्प स्वच्छ असणे खूप इम्पॉर्टन्ट असते.
  • प्रदूषणामुळे पण आपल्या केसांना हानी पोहोचते. म्हणून जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये राहत असाल तर बाहेर जाताना आपल्या केसांना कव्हर केले पाहिजे.
  • केसांना दाट बनवण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा उपयोगही करू शकता. तुम्ही जे तेल लावता त्यामध्ये एरंडेल तेल मिक्स करून तुम्ही केस धुण्याच्या १ तास आधी लावू शकता नंतर केस धुवून घ्या. या तेलाच्या काही वापरांनंतरच तुमचे केस दाट आणि मऊ होऊ लागतात.
  • एलोवेरा जेल तुम्ही आपल्या केसांना लावू शकता कारण हे पण केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. हे केसांचे वोल्युम सुधारण्यात पण मदत करते. एलोवेरा मध्ये असे ऑरगॅनिक न्यूट्रियंट्स असतात जे तुमच्या केसांच्या वाढीमध्ये मदत करतात.
  • केस गळण्याचे आणि पातळ होण्याचं एक कारण चिंता, स्ट्रेस हे पण आहे. जास्त चिंता केल्याने केस पातळ आणि सफेद पण हू शकतात म्हणून या सर्व उपायांसोबत तुम्हाला चिंतामुक्त होण्याकडे पण लक्ष दिले पाहिजे.
  • खूप पाणी प्या. त्यामुळे के शयद्रते राहण्यास मदत होते.

दाट केसांसाठी मिळवण्यासाठी या गोष्टी टाळा –

  • केस विंचरताना किंवा अन्य स्टायलिंग करताना केस जोरात खेचू नका. यामुळे केसांच्या मुळांनाहानी पोहोचते.
  • हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनर सारख्या उपकरणांचा रोज रोज वापर करणे टाळा. यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतात.
  • केमिकल युक्त प्रोडक्टस चा वापर करणे टाळा. कारण त्यामध्ये असलेले केमिकल हे केसांना नुकसान पोहोचवण्याचे काम करतात.  त्याऐवजी आयुर्वेदिक, हर्बल हेअर प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता.
  • केस धुतल्यानंतर टॉवेलने जोरजोरात घासून पुसू नका. केस ओले असतात तेव्हा ते सर्वात जास्त कमजोर असतात आणि नाजूक असतात. म्हणून आरामशीर आणि नॅचरली केसांना वाळू द्या.

 

समारोप –

तर मित्रांनो आज आपण बघितले कि केसांना दाट बनवण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. सुरवातीला आपण जाणून घेतले कि  केस दाट होण्यासाठी आपण काय खावे सोबतच आपण केस गाळण्याची करणे आणि दाट केसांसाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात ते पण आपण बघितले. तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन असतील तर मला खाली कंमेंट मध्ये विचारू शकता. आणि हआरोग्यविषयक अधिक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top