उद्याचा दिवस उत्साह आणि एनर्जीने भरपूर राहण्यासाठी रात्रीची झोप ही खूप महत्त्वाची ठरत असते. रात्री गाढ, शांत झोप झाली तर आपल्या शरीर आणि मन ताजेतवाने होते. चांगली झोप ही आपल्या परिपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. आज कालची लाईफस्टाईल आणि चुकीच्या झोपेच्या वेळा, ताण तणाव अशा विविध कारणांमुळे झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. झोपेची चक्र बिघडले की आपली एनर्जी आणि काम करण्याची क्षमता ही खालावते. या लेखामध्ये आपण झोप न येण्याची कारणे कोणती आहेत ते बघणार आहोत आणि त्यासोबतच झोप येण्यासाठी काही सोपे उपायही बघणार आहोत.
दिवसभराचा कामाच्या थकव्यानंतर आपल्या शरीर आणि मनाला विश्रांतीची गरज असते. ही विश्रांती आपल्याला झोपेतून मिळत असते. पण ही झोपच जर व्यवस्थित होत पूर्ण नसेल, तर शरीराला योग्य आराम न मिळून अनेक समस्या निर्माण होतात. शांत गाढ झोप न लागणे, सारखी जाग येणे, जास्त वेळ झोप नाही लागणे याला निद्रानाश असे म्हणतात. मित्रांना हा एक मानसिक आजार आहे. आपल्याला रात्री सहा ते आठ तास झोप येत नसेल तर आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम आहे असे आपण म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेली निद्रानाशाची लक्षणे कोणती आहेत ते आधी आपण बघू.
झोप न लागण्याची/निद्रानाशाची लक्षणे –
⇒ डोकं जड किंवा भारी भारी वाटणे
⇒ सतत जांभया येत राहणे
⇒ अंग जड वाटणे
⇒ गरगरल्यासारखे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे
⇒ अंग दुखणे दिवसभरामध्ये खूप वेळा अंगदुखी जाणवणे
⇒ जेवलेलं न न पचणे, रात्रीची झोप पुरेशी न झाल्यामुळे खाल्लेले अन्न पचत नाही
ही लक्षणे किंवा यातली काही लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर आणि झोपही व्यवस्थित नसेल तर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास हा असू शकतो. या निद्रानाशाची कारणे कोणती असू शकतात ते आता आपण बघू.
झोप न येण्याची/ निद्रानाशाची कारणे –
›› निद्रानाशाचे सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे ताण तणाव. मनावर कुठल्याही प्रकारचा ताण चिंता असेल तर झोप लागत नाही.
›› प्रमाणापेक्षा जास्त स्क्रीन टाईम !!!!!! सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही मोबाईल लॅपटॉप अशी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रीन समोर सतत बसल्यामुळे झोप न लागण्याची समस्या निर्माण होते.
›› जास्त राग, चिडचिड, भीती, असुरक्षितता, प्रेम यासारख्या भावनिक विचारांचा अतिरेक झाल्यामुळे ही निद्रानाशाचा त्रास होतो.
›› रात्री उशिरा जेवल्यामुळे आणि जेवल्यावर लगेच झोपायला गेल्यामुळे त्यांना पचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे पोट फुगणे, अपचन, आम्ल पित्त, यासारख्या तक्रारी उद्भवतात आणि झोपही नीट येत नाही. रात्रीच्या जेवणात तर पदार्थ चहा कॉफी तिखट पदार्थ जास्त प्रमाणात घेतले, तर शरीरातील उष्णता वाढते आणि शांत झोप लागत नाही.
›› मनात सतत कोणत्यातरी विचार सुरू असणे. आपल्या मनातले विचार जेव्हा पूर्णपणे बंद होतात तेव्हाच आपल्याला झोप लागते पण जर सतत विचारांचे चक्र सुरू असेल तर झोप लागत नाही.
›› थायरॉईड श्वसन संबंधीचे आजार आणि त्या वरची औषधे यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.
›› शरीरास थकवा न येणे. दिवसभर एका ठिकाणी बसल्यामुळे किंवा जास्त हालचाल न झाल्यामुळे शरीर थकत नाही त्यामुळे ही शांत झोप लागत नाही.
›› डोक्याला काही मार वगैरे लागल्यामुळे किंवा ब्रेन किंवा सारख्या मेंदूचे ऑपरेशन झालं असेल तरीसुद्धा झोप लागत नाही तसेच एखादा मानसिक आघात मनावर झाला तरी देखील झोपेची समस्या निर्माण होते.
निद्रानाशाची कारणे आपण वर बघितली. आता आपण त्यावर करता येतील असे काही उपाय खाली बघू.
झोप येण्यासाठी/निद्रानाशावर सोपे उपाय –
1. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करावी व नंतर डोक्याला पोटऱ्यांना कोमट तेल लावावे. यामुळे शरीर आणि मन शांत होऊन चांगली झोप लागायला मदत होते.
2. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास टीव्ही मोबाईल लॅपटॉप सर्व बंद करावे. यावेळी तुम्ही एखाद्या पुस्तक वाचू शकता किंवा मेडिटेशन, सायलेंट म्युझिक वगैरे ऐकू शकता.
3. पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल किंवा तूप लावून मसाज करावे यामुळे शरीरातील वात पित्त दूर होऊन आराम मिळतो.
4. योगासन निद्रानाशामध्ये खूप परिणामकारक ठरतात. योगामुळे श्वसनावर मज्जा संस्थेवर चांगला परिणाम होतो. तसेच ताण तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणून चांगली झोप लागते. म्हणून चांगल्या झोपेसाठी सर्वांगासन शवासन, पश्चिम त्तानासन, प्राणायाम अशी असणे नियमितपणे करायला हवीत. झोपण्याआधी भ्रमरी प्राणायाम अनुलोम विलोम ओमकार केल्याने मनातील विचार कमी होतात आणि झोप लागण्यास मदत होते.
5. आपले बिछाने हे जास्त मऊ किंवा जास्त कठीण असू नये त्यामुळे ही झोपेची समस्या निर्माण होते.
6. ध्यान/मेडिटेशन फायदेशीर ठरते. झोपण्याच्या अर्धा पाऊण तास आधी आपण मंद प्रकाश असलेल्या शांत रूममध्ये बसून ध्यान केले पाहिजे. तसेच झोपण्याआधी दीर्घ श्वास ही घेऊ शकतो यामुळे ही मन शांत होण्यास मदत होते आणि झोप लागते.
हे पण नक्की वाचा –
समारोप –
या लेखामध्ये आपण झोप न येण्याची कारणे आणि झोप येण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय बघितले. तुम्हालाही जर निद्रानाशाचा त्रास होत असेल तर हे उपाय नक्की करून बघा. अन्य आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!