झोप ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. ती आपल्या मनाच्या आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते. पण गरजेपेक्षा जास्त झोप घेणे हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक झोप घेतल्यास थकवा जाणवतो, सुस्ती वाढणं आणि एकाग्रता कमी होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जर तुम्हालाही जास्त झोप येत असेल आणि ती कमी करण्याचे उपाय शोधत असाल तर खाली दिलेल्या पद्धती तुम्हाला मदत करू शकतात. या लेखामधून आपण जास्त झोप कमी कशी करावी यावर उपाय बघणार आहोत.
झोपेचे महत्त्व आणि तिची गरज –
झोप ही आपल्यासाठी, मेंदूच्या विश्रांतीसाठी आणि मानसिक स्वास्थ टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे. साधारणपणे प्रौढ व्यक्तींनी ७-८ तासांची झोप ही घेतलीच पाहिजे. पण प्रत्येकासाठी झोपेचा कालावधी सारखाच असतो असं नाही. काहींना ६ तास झोप पुरेशी असते तर काहींना ८-९ झोप लागते. जास्त वेळ झोप घेण्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेची झोप घेणे आपल्यासाठी फायद्याचे असते. ती पूर्ण झाल्यावर आपल्याला ताजेतवाने करते.
झोप कमी करण्याचे उपाय बघण्याआधी आपल्याला जास्त झोप कशामुळे येते हे माहीतच नाही गरजेचे आहे. आधी आपण जास्त झोप कशामुळे येते ते बघू.
जास्त झोप कशामुळे येते ?
आपल्याला झोप जास्त प्रमाणात येण्याची अनेक कारणे असू शकतात.
→ थकवा ताणतणा व ऊर्जा कमी वाटल्यास किंवा पोषण तत्त्वांची कमतरता यामुळे जास्त झोप येऊ शकते.
→ तसेच थायरॉईड मधुमेह मानसिक आरोग्याचे विकार जसे नैराश्य, एन्जॉयटी, ताण तणाव यामुळेही झोपेचे चक्र बिघडते.
→ दिवसभर निष्क्रिय राहणे जास्त वेळ तुम्ही पाहणे किंवा मोबाईलचा अतिवापर यामुळे शरीराला आळस जाणवतो. अल्कोहोलचे सेवन, झोपेच्या आणि अनियमित वेळा यामुळे देखील जास्त झोप येते.
वर आपण जास्त झोप येण्याची कारणे बघितली. आता झोप कमी कशी करावी यावर उपाय बघू.
जास्त झोप कमी करण्याचे उपाय –
१. झोपेच्या ठराविक वेळा पाळा –
झोप कमी करण्यासाठी झोपेच्या एक निश्चित वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे बायोलॉजिकल घड्याळ स्थिर राहते त्यामुळे कमी वेळेत चांगल्या दर्जाची झोप मिळते.
हे करा
⇒ रोज ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. सुरुवातीला हा बदल कठीण वाटू शकतो. पण ठरवून याची सवय लावून घेतली, तर शरीर त्याला सहज स्वीकारते.
हि आहेत झोप न येण्याची कारणे व करून बघा हे उपाय |
२. झोपेची क्वालिटी सुधारा
कमी वेळ झोपूनही शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी झोपेची क्वालिटी सुधारणे गरजेचे आहे.
हे करा
⇒ मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करा – झोपण्याच्या एक तास आधी कोणतीही स्क्रीन वापरू नये. स्क्रीन मधील लाईट ही झोपेच्या चक्रात अडथळा निर्माण करते.
⇒ अंधार आणि शांतता ठेवा – झोपण्याची जागा शांत आणि अंधारी असावी. झोपताना डोळ्यांसाठी तुम्ही आय मास्क वापरू शकता.
⇒ गादीची योग्य निवड करा – झोपेसाठी योग्य आणि आरामदायी गादीचा वापर करावा.
३. झोपेच्या आधीची दिनचर्या सुधारा
झोपण्यापूर्वी मन शांत असणे आवश्यक आहे. योग्य सवयी झोपेची गुणवत्ता सुधारतात.
चिडचिडेपणा कमी करण्यासाठी करून बघा हे उपाय |
हे करा
⇒ ध्यान आणि प्राणायाम करा – झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम केल्याने मन शांत होते आणि झोप लवकर लागते.
⇒ हलका आहार घ्या – रात्री जर जेवण करणे टाळा. हलका आहार घ्या. कोमट दूध किंवा हर्बल चहा घेतल्यास झोपेत मदत होते.
⇒ तणाव मुक्तता – झोपण्यापूर्वी चिंता आणि ताण टाळण्यासाठी हलक्या स्वरूपाची पुस्तके वाचा किंवा शांत संगीत ऐका.
४. सकाळी ताजेतवाने होण्यासाठी या सवयी पाळा
सकाळी उठल्यानंतर दिवस चांगल्या पद्धतीने सुरू करणे महत्त्वाचे असते.
हे करा
⇒ व्यायाम करा – सकाळी नियमित व्यायाम केल्याने शरीर अधिक सक्रिय होते. सूर्यप्रकाशात फिरणे हे त्याचे त्याचे फ्रेश होण्यासाठी उपयुक्त ठरते.
⇒ लवकर अंघोळ करा – सकाळी लवकर आंघोळ केल्याने झोपेमुळे आलेली सुस्ती दूर होते.
⇒ सकारात्मक विचार – सकाळी सकारात्मक विचार आणि ध्यान यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते.
५. रात्री कॅफीन आणि अल्कोहोल टाळा
केफिनचा अतिरेक झोपेच्या सवयीवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
हे करा
⇒ झोपण्याच्या ५-६ तास आधी चहा कॉफी एनर्जी ड्रिंक टाळावे.
६. दिवसा जास्त झोप घेणे टाळा
⇒ दिवसा जास्त झोप घेतली तर ती रात्रीच्या झोपेवर परिणाम करते. शक्यतो दिवसात झोप घेणे टाळा.
⇒ गरज भासल्यास १५-३० मिनिटांची झोप घ्या. यामुळे रात्री झोपण्याचा वेळ बिघडणार नाही.
७. दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवा
⇒ दिवसभर काही ना काही काम करत राहिल्याने शरीर सक्रिय राहते आणि आळस येत नाही.
⇒ कंटाळवाणे वाटणारे वातावरण टाळा आणि स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून ठेवा. नवीन छंद वाचन किंवा कुटुंबीयांसोबत वेळ घालवा.
८. योग्य प्रमाणात पाणी प्या
⇒ शरीर हायड्रेट ठेवल्याने थकवा कमी होतो आणि जास्त झोप येत नाही.
⇒ झोपण्याच्या अगोदर जास्त पाणी पिऊ नका कारण यामुळे रात्री सारखे उठावे लागू शकते.
९. डॉक्टरांचा सल्ला घ्या
⇒ जर वरील उपाय करूनही झोप कमी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
⇒ काही वेळा जास्त झोप येणे हे थायरॉईड, निद्रानाश किंवा मानसिक समस्या यासारख्या आजारांचे लक्षण असू शकते.
समारोप –
आपल्याला दिवसाच्या जास्त झोप येणे ही आपल्या दैनंदिन कामात व्यत्य आणते. यामुळे आपली कामे व्यवस्थित होऊ शकत नाहीत, आळस येतो. पण योग्य सवयी आणि उपायांनी त्यावर मात करता येते. झोप हा आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे तरी त्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे. या लेखामधून आपण झोप कमी करण्याचे उपाय बघितले. हे उपाय अवलंबून तुम्ही तुम्हाला येणारी जास्त झोप नक्कीच कमी करू शकता आणि शरीराला अधिक ऊर्जावान आणि सक्रिय बनवू शकता.
तुमच्यासाठी हा लेख उपयोगी वाटल्यास नक्की शेअर करा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करा !!!!