सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झिका व्हायरसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. झिका विषाणूचा संसर्ग हा डासांमार्फत पसरतो. याला झिका ताप किंवा झिका विषाणूचा संसर्ग म्हणतात. हा संसर्ग मुख्यतः एडिस जातीच्या डासांच्या चावण्याने होतो . एडिस डासांमार्फत जी का विषाणू सोबतच डेंगू, चिकनगुनिया सारखे आजार असू शकतात. या लेखांमधून आपण झिका व्हायरसची लक्षणे आणि उपचारांबद्दल माहिती बघणार आहोत. त्यासोबतच झिका वायरस काय आहे आणि तो आपल्याला न व्हावा यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हेही जाणून घेणार आहोत तर मग लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
झिका व्हायरस म्हणजे काय ?
झिका विषाणू चा संसर्ग हा संक्रमित एडिस चावल्याने होतो. व्यक्तीला हा डास चावल्यानंतर ३ दिवस ते २ आठवड्यांच्या कालावधीमध्ये संक्रमित होऊ शकतो. जेव्हा दुसरा झिका विषाणू ने संक्रमित नसलेला डास संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा हा डास विषाणू वाहक बनतो आणि असे संक्रमणाचे दुष्टचक्र सुरू राहते.
झिका व्हायरस ची उत्पत्ती कुठे झाली ?
झिका विषाणूची उत्पत्ती ही १९४७ मध्ये झाली असे मानले जाते. शास्त्रज्ञांचा एक ग्रुप पिवळ्या तापासाठी युगांडा मधील झिका जंगलात पाहणी करत होता. यामध्ये त्यांनी रिसर्च माकडाचे नमुने घेतले. त्यामधून विषाणू वेगळे केले. जी का जंगलात हा विषाणू मिळाला म्हणून त्या नावावरूनच विषाणूला हे जी का नाव देण्यात आले.
मानवामध्ये या विषाणूची सुरुवात ही United State of Tanzania, Uganda येथे नोंदवली गेली. जुलै 2021 मध्ये भारतात केरळमध्ये विषाणूची पुष्टी झालेली पहिली केस नोंदवली गेली. त्यानंतर अनेक भागांमध्ये याचा प्रादुर्भाव बघायला मिळाला.
झिका व्हायरसची लक्षणे कोणती आहेत ?
झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या अंदाजे 80 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. आणि लक्षणे आढळून आल्यास ते सौम्य स्वरूपात दिसून येतात या रोगामध्ये मृत्यू होण्याची शक्यता जरी नसली तरी hospitalization ची आवश्यकता असते. चला तर मग बघूया झिका विषाणूची लक्षणे कोणती असतात ते.
→ सौम्य ताप
→ सर्दी
→ डोळे लाल होणे
→ सांधेदुखी, विशेषतः हात आणि पाय
→ डोकेदुखी
→ ओटीपोटात दुखणे
→ थकवा जाणवणे
→ डोळ्यात दुखणे
→ सांधेदुखी
→ पुरळ येणे
→ भूक कमी होणे
→ घाम जास्त येणे
संक्रमित त्यास चावल्यानंतर 3 ते 14 दिवसांच्या दरम्यान वरील लक्षणे दिसू शकतात.
झिका व्हायरसचा संसर्ग होण्याची कारणे –
झिका संसर्गाचे धोका वाढवण्यासाठी कारणीभूत असणारे कोणते आहेत ते आता आपण बघू.
1) डास चावल्यामुळे –
संक्रमित लेडीज डान्स हेच एका विषाणूचे प्राथमिक वाहक असतात. हे डान्स सासलेल्या पाण्यामध्ये घरात आणि घरा बाहेर वाढतात.
2) आईपासून बाळाला –
स्त्री जर गर्भवती असेल आणि तिला झिका विषयांचे संक्रमण झाले तर तिच्याकडून बाळाला या संसर्गाची लागण होऊ शकते. त्यांना काम करणाऱ्या आईच्या दुधातही विषाणूची उपस्थिती आढळून आले आहे.
3) शारीरिक संबंधांद्वारे –
झिका व्हायरसने संक्रमित जोडीदारासोबत असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानेही या विषाणूचा संसर्ग होत असतो.
झिका व्हायरसवर उपचार काय करावेत –
सध्या तरी झिका व्हायरसच्या संसर्गावर परिणाम करणारे आणि बरे करणारे कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही तरी योग्य ती काळजी घेऊन आपण या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकतो.
ज्यांना या व्हायरसची लक्षणे दिसून येतात त्यांनी खालील टिप्स चे पालन केले पाहिजे.
⇒ भरपूर आराम करावा.
⇒ भरपूर द्रवक म्हणजे लिक्विडचे सेवन करावे.
⇒ वेदना आणि तापापासून आराम मिळवण्यासाठी सामान्य औषधे घ्यावी.
⇒ अधिक त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
झिका व्हायरस पासून बचाव कसा करावा ?
व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे झिका संसर्गाने प्रभावित भागात प्रवास करणे टाळणे आणि प्रवास करणे जरुरी असेल तर डासांपासून संरक्षण करण्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
⇒ झोपताना मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे.
⇒ त्यासाठी ठेवण्यासाठी विशेषतः संध्याकाळी खिडक्या बंद ठेवल्या पाहिजेत.
⇒ घरात फ्लॉवर पॉट सारख्या ठिकाणी पाणी साचून देऊ नये.
समारोप –
तर आज आपण झिका व्हायरसची लक्षणे आणि उपाय याबद्दल माहिती बघितली. झिका विषाणूचा संसर्ग हा जीवघेणा नसला तरी तो होऊ नये म्हणून योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपले प्रश्न तुम्ही खाली कंमेंट मध्ये विचारू शकता .
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!