मित्रांनो आजकाल अयोग्य जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि physical exercise च्या अभावी अनेकजण लाठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. म्हणून weightloss वर खूप वेळा बोलले जाते. पण अनेकजण असेही असतात ज्यांच वजन प्रमाणापेक्षा कमी असते. खूप कमी वजन असणे हे देखल आरोग्यासाठी धोकादायक असते. सोबतच जास्त बारीक व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व पण उठावदार दिसत नाही. आणि शारीरिक दृष्ट्या कमजोर असाल तर अनेक health issues चा पण सामना करावा लागू शकतो.म्हणून आपल्या उंचीच्या प्रमाणात असलेले वजन gain करणे आवश्यक आहे. या लेखामध्ये वजन वाढवण्यासाठी काही उपाय बघणार आहोत. तुम्हाला पण वजन वाढवायचे असेल तर झटपट वजन तुम्ही वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा.
सुरवातीला आपण बघू वजन वाढवतो म्हणजे आपण नेमकं काय करतो ते.
वजन वाढवणे म्हणजे काय ?
जेव्हा आपण वजन बवाढवण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण शरीरावरील चरबीचे प्रमाण वाढवून त्याचे वजन न वाढवता मांसपेशींचे म्हणजे muscles च्या वजन वाढवण्याबद्दल बोलत असतो. कारण muscles च्या कामकरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, अशक्तपणा थकवा जाणवतो, शारीरिक कामे करण्यात त्रास होतो म्हणून शरीराला healthy आणि निरोगी ठेवण्यासाठी आपलं वजन योग्य प्रकारे maintain ठेवणं गरजेचं आहे.
वजनाची स्थिती कशी मोजाल ?
- तुमचे वजन प्रमाणापेक्षा कमी आहे का ? हे सुरवातीला माहित करून घेतले पाहिजे. कारण त्यानुसार तुम्हाला पुढील स्टेप्स घेणे सोपे जाईल. या साठी BMI म्हणजे Body Mass Index या पद्धतीचा उपयोग केला जातो.
- जर समजा तुमचे वजण 55 मग आहे आणि उंची 163 कमी आहे म्हणजे 1.63m आहे. तर BMI काढण्यासाठी 1.63 *1.63 /55 करा जे अनुस्वार येईल तो तुमचा BMI असेल.
- हा बीएमआय manualy न करता तुम्ही online पण काढू शकता. त्यासाठी google वर BMI calculator search करा.आणि त्यामध्ये आपले details टाकून तुमचा BMI माहित करून घ्या.
- आता तुम्हाला आपला BMI समजला असेल. जर हा 18.5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही उंदेरीवेइगत आहेत म्हणजे तुम्हाला वजन वाढवण्याची गरज आहे.
- जर 18.5 ते 24.9 असेल तर तुमचे वजन योग्य आहे. तर Congratulations तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही.
वजन वढावताना कोणती काळजी घ्याल –
- मित्रांनो जर आपण जंकफूड, तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तरी देखील आपले वजन वाढेल. पण हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे नाही कारण यामुळे आपल्या शरीरावरील चरबी म्हणजे फॅट वाढून वजन वाढलेलं असत.
- आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी हि high blood pressure, diabetes , heart attack यांना निमंत्रण देत असते.
- म्हणून वजन कधीही muscles चे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे वजन वाढीसोबतच आपले शरीर पण मजबूत बनते.
- आपल्याला सर्च गोष्टींची खूप घाई असते. वजन कमी करण्याची, वाढवण्याची …. पण हि गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे कि अगदी काही वेळेमध्ये तुमचे वजन खूप जास्त वाढणार नाहीये. म्हणून त्याला थोडा वेळ द्यायला हवा म्हणजे मनासारखे results तुम्हाला नक्की मिळतील.
- चला तर मग बघूया घरच्या घरीच कोणते उपाय करून आपण झटपट वजन वाढवू शकतो ते.
झटपट वजन वाढवण्यासाठी असरदार उपाय –
वजन वाढवण्यासाठी आपल्याला बेस्ट अशा त्रिसूत्रीचा अवलंब आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायला लागेल. तुम्ही हे सर्व seriously follow केले, तर तुमचं वजन एक महिन्यामध्येच काही किलोंनी (२ – 3) वाढलेलं तुम्हाला दिसेल.
१. जास्त प्रमाणात कॅलरीज घ्या –
वजन वाढवण्यासाठी आपल्याला रोजच्या डाएट मध्ये कॅलरीज च प्रमाण वाढवायला लागणार आहे. ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण कॅलरीज बर्न करतो. त्याचप्रकारे वजन वाढवताना आपल्याला कॅलरीज च प्रमाण वाढवायचे असते.
त्यासाठी तीन गोष्टींचा आहारात मुबलक प्रमाणात समावेश करायला हवा.
ते म्हणजे १) कार्बोहायड्रेट्स २) प्रोटीन ३) हेल्थी फॅट्स
शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारामध्ये डाळी, बटाटा, केळी, भात यांचं प्रमाण वाढावा.
प्रोटीन साठी तुम्ही चणे (हरभरा ) याची उसळ, भाजी, सलाड कसेही आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. सोबतच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, तूप, पनीर, बटर यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. तसेच शेंगदाणे पण प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. भिजवलेले शेंगदाणे तुम्ही सकाळ / संध्याकाळ घेऊ शकता. असे आवडत नसतील तर जसे आवडतात तसे उकळून, फ्राय करून तसेच शेंगदाण्याचे लाडू करून तुम्ही आपल्या डाएट मध्ये सामील करू शकता.
हेल्थी फॅट्स साठी तुम्ही आपल्या जेवणामध्ये तुपाचे प्रमाण वाढवा. म्हणजे प्रत्येक वेळी जेवणासोबत १-२ चमचे तूप तुम्ही खायला हवे. हे तुम्हाला लवकर वजन वाढवायला खूप मदत करते. तुपासोबतच ड्राय फ्रुटस, नट्स तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी घेऊ शकता किंवा संध्याकाळी स्नॅक सोबत पण घेऊ शकता.
तर मित्रांनो वर सांगितलेल्या घटकांचा आहारामध्ये समावेश करा. तुम्हाला जस suitable असेल तस थोडं फार कमी जास्त तुम्ही करू शकता. पण वजन वाढवण्यासाठी तुम्हाला खाण्याचे प्रमाण तर वाढवायला लागणार आहे हि गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.
२. व्यायामाला वेळ जरूर द्या –
तुम्ही म्हणाल, आम्हाला वजन वाढवायचे आहे कमी नाही करायचे जो आम्ही व्यायाम करू !!!! असाच विचार बहुतेक वेळा केला जातो. पण हि मान्यता चुकीची आहे. वजन वाढवण्यासाठी आपण योग्य डाएट घेतले आणि व्यायामच नाही केला तर आपले फॅट वाढू लागते आणि ते आपल्याला नकोय.
आपल्याला muscles वाढवायचे आहेत. म्हणून exercise सुद्धा योग्य आहारा इतकीच महत्वाची आहे. काही जणांची अशी तक्रार असते कि आम्ही खूप खातो तरी पण आमचे वजन वाढतच नाही. त्यांना या गोष्टीकडे(व्यायामाकडे) लक्ष देण्याची गरज आहे.
व्यायामुळे blood circulation वाढत म्हणून आपण खाल्लेलं मांसपेशींपर्यंत, हाडांपर्यंत पोहोचण्यात मदत होते. त्यामुळे आपले muscles मजबूत बनायला सुरवात होते.
३. योग्य प्रमाणात झोप जरूर घ्या –
पोषक आहार आणि व्यायामासोबत पुरेशी आणि शांत झोप हि पण तितकीच महत्वाची आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरातील पेशींची वाढ होत असते. पूर्ण शरीर ताजेतवाने होते म्हणून रोज ७ ते ८ तास झोप जरूर घ्या.
वजन वाढवण्यासाठी वरील त्रिसूत्रीचा उपयोग तुम्हाला नक्की होणार आहे. weight gain करण्याच्या process मधल्या महत्वाच्या गोष्टी आपण वर बघितल्या, आता आपण काही खास फूड्स बघूया ज्या आपल्या रोजच्या डाएटमध्ये सामील करून तुम्ही महिन्याभरातच ५ – ६ किलो वजन नक्की वाढवू शकता.
वजन वाढवण्यामध्ये सहायक फूड्स –
बटाटा –
बटाटा हे आपले वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. वजन वाढवण्यासाठी हा खूप उपयोगी आहे म्हणून तुम्ही वजन वाढेपर्यंत रोज बटाटा खाल्ला पाहिजे. हा तुम्ही उकळून, तळून, भाजी करून कसाही खाऊ शकता.
केळी –
आपल्या सर्वांचं माहित आहे केळी हि वजन वाढण्यासाठी किती फायदेशीर आहे. दररोज २ – ३ केळी सकाळ संध्याकाळ तुम्ही खायला हवीत. केळी शक्यतो सकाळी आणि दुपारी खाणे लाभदायक असते.
भात –
भात वजन वाढवण्याध्ये मदत करतो. दोन्ही वेळच्या जेवणामध्ये तुम्ही भाताचं समावेश करावा.
चपाती –
चपाती पण वजन वाढवण्यामध्ये मदत करते. म्हणून आपल्या जेवणातील चपातीचे प्रमाण वाढावा. जर आधी तुम्ही दोन चपाती खात होता तर ३ खा. ४ खात होता तर ५ चपाती खात जा.
अंडी, चिकन, मटण –
जर तुम्ही मांसाहारी असाल तर आवडीप्रमाणे अंडी, मटण, फिश यांचा आहारात समावेश करायला हवा. आठवड्यातून चार दिवस तुम्ही हे घेऊ शकता.
दूध, पनीर, –
वजन वाढवण्यासाठी तुम्हाला रोजच्या डाएट मध्ये दूध, चीज, पनीर बटर यांचे प्रमाण पण वाढवले पाहिजे. यामधले जे आवडते ते तुम्ही घेऊ शकता. नाश्त्याच्या वेळी दुधामध्ये ड्राय फ्रुट ची पावडर टाकून घेऊ शकता.
वर सांगितलेलले फूड्स हे वजन वाढवणारे आहेत. म्हणून हे तुमच्या रोजच्या आहारात नक्की घेण्याचा प्रयत्न करा.
समारोप –
तर मित्रांनो झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय बघितले. तुम्हाला पण वजन वाढवायचे असेल तर तुम्ही हे फॉलो करून बघा आणि तुम्हाला काय काय रिजल्ट्स मिळाले ते मला खाली कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुमचे काही सजेशन असतील. ते पण मला नक्की सांगा. आणि अन्य आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचाल त्यासाठी खूप खुप धन्यवाद !!!!!!!!