झटपट वजन कमी करणे चांगले आहे कि वाईट ? वजन कमी करण्याच्या टिप्स

पूर्वी बाहेरच्या देशांमध्ये जास्त असलेली लठ्ठपणाची समस्या हि आता आपल्याकडेहि वाढत चालली आहे. बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच काही आजारांमुळे देखील व्यक्तीचे वजन वाढते. आजच्या काळात व्यक्तीला सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात. पण मी तुम्हाला सुरवातीलाच सांगू इच्छिते कि झटपट वजन कमी करणे हे maximun cases मध्ये possible नाहीये आणि ते तुमच्या आरोग्यासाठी पण चांगले नाही.

काही लोक २-३ महिने strict diet फॉलो करून, exercise करून हे achieve करतही असतील. पण काही महिन्यातच त्यांचं वजन परत पाहिल्याएवढाच होत. असं जवळपास सर्वच केसेस मध्ये होत. मग यामध्ये आपली मेहनत, त्रास सगळं वाया जात म्हणून आपण घाई करायला नको स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा. वजन कमी करण्यासाठी आपण अशी डाएट आणि लाइफस्टाईल फॉलो करायला हवी जी आपण कमीत कमी वर्षभर तरी फॉलो करू शकू. तेवढं एकदा केलं कि तुम्हाला आपलं कमी झालेलं वजन बघून कॉन्फिडन्स पण येईल कि आपण वजन कमी करू शकतो आणि दुसरं म्हणजे या डाएट ची सवय पण होऊन जाईल. 

झटपट-वजन-कमी-करणे-चांगले

या लेखामध्ये मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करत आहे ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी तर आहेतच. शिवाय यामुळे तुमचं आरोग्य पण चांगल ठेवण्यात या तुम्हाला मदत करतील.

वजन कमी करताना लोक काय करतात ? एक तर सेम डाएट रोज घेत राहतात. उदाहरणार्थ – नाश्त्यामध्ये रोज अंडीच घेतात किंवा नुसतं ऍपल च घेतात. ज्यामुळे आपल्या शरीराला लागणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता होत नाही. आणि जास्त काळ असे तेच तेच अन्नपदार्थ घेतल्यामुळे एखाद्या घटकाची कमतरता शरीरात निर्माण होऊन दुसराच आजार होण्याचे चान्सेस असतात. म्हणून असे तेच ते डाएट घेण्यापासून आपण स्वतःला वाचवले पाहिजे. चला तर मग सुरवातीला बघू वजन कमी करणे म्हणजे काय असत ते .

वजन कमी करणे म्हणजे काय ?

  • वजन कमी करणे म्हणजे आता तुमच्या शरीराचं जे वजन आहे, काही kg पर्यंत ते कमी करणे नव्हे तर तुमच्या शरीरावर जमा झालेले extra fat कमी करणे आणि शरीरातील muscles ला प्रिजर्व करणे आणि वाढवणे हे आहे.
  • पण अनेकदा आपण एक्सट्रा फॅट ऐवजी आपल्या muscles म्हणजे स्नायू च कमी करत असतो. ज्यामुळे आपण अशक्त, कमजोर फील करत असतो.
  • Scientifically शरीर एका आठवड्यात १/२ ते १ kg पर्यंतच वजन कमी करू शकते. जर तुम्हाला healthy way ने वजन कमी करायचे असेल तर स्वतःसमोर टार्गेट सेट करू नका. जसे मला एका week मध्ये एवढं वजन कमी करायचंय… एका महिन्यात एवढं करायचंय..
  • कारण तुमचं वजन हे slowly च वाढलेले आहे. ते कमी करायला थोडा वेळ द्यायला हवा. आणि कमी केलेलं वजन तुम्ही किती काळ maintain ठेवणं महत्वाचं आहे.म्हणून झटपट वजन कमी करण्यापेक्षा तुम्ही चांगल्या हेल्थसाठी , निरोगी शरीर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझी पण अशी इच्छा आहे कि तुम्ही आपलं वजन कमी करून निरोगी आयुष्य जगावं. त्यासाठी इथे मी पवरफुल अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण मला असं वाटत कि तुम्ही आपलं वजन कमी करून आपल्या आयुष्यामधेय अजून मोठे मोठे टार्गेट्स achieve केले पाहिजे.
  • वजन कमी केल्यानंतर काही काळानंतर परत वाढले तर तुम्ही घेतलेले efforts , डाएटिंग तर वाया जातेच शिवाय त्याच गोष्टीसाठी काही काळानंतर परत प्रयत्न करू लागता म्हणून मित्रांनो या सर्वातून बाहेर या आणि हेल्थी लाइफ स्टाईल फॉलो करा.

चला तर मग बघूया वजन कमी करण्याच्या टिप्स –

# वजन कमी करण्याच्या असरदार टिप्स –

१) जेवण स्किप करू नका –

वजन कमी करताना बऱ्याचदा एका वेळच जेवण घेतलं जात. पण अआयुर्वेदानुसार आणि सायन्स नुसार पण हे चुकीचं आहे. आपल्याला दैनंदिन कामे करण्यासाठी energy ची गरज असते, ती आपल्याला रोजच्या जेवणातून मिळत असते. तरी भूक लागून उपाशी राहणे म्हणजे आपल्या शरीर  आणि हेल्थ वर अन्याय करण्यासारखेच आहे. जेवढ्या प्रमाणात तुमच्या शरीराला कॅलरीज जी आवश्यकता आहे, त्या तुम्ही घेतल्याचं पाहिजे. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळच जेवण केलंच पाहिजे.

एखाद्या वेळी काही कार्यक्रम, पार्टी वगैरे मध्ये थोडं जास्त खाणं झालं तस तर आता तुम्ही ते avoid च करायला हवे पण कधी खाण्यात आलंच तर पुढचे दोन दिवस त्या extra calories बर्न करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी तुम्ही पुढील दोन दिवस light जेवण हेऊ शकता, थोडी जास्त वॉक, एक्सरसाइज करू शकता.

झटपट-वजन-कमी-करणे-चांगले

२) भरपूर पाणी प्या –

आपल्याला वजन कमी करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्याचं योग्य प्रमाण हे आपल्या मेटाबॉलिज्म ची गती सुधारते. आणि पाणी हे न्यूट्रिएंट्स ला  वेगवेगळ्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचण्यात मदत करते. तसेच पाणी आपल्या स्किन मध्ये ग्लो आणण्याचं पण काम करते. म्हणून दिवसभरातून कमीत कमी ८-१२ तास पाणी जरूर प्या. आणि हे पाणी पाण्याच्या स्वरूपातच प्या. ज्यूस, कोल्ड ड्रिंक, सोडा या फॉम मध्ये नाही.

३) आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा –

आहार प्रोटीन जास्त घेण्याचा प्रयत्न करा. प्रोटीन हे वजन कमी करण्यात मदत करतात. सोबतच प्रोटीन शरीराला एनजी देण्याचे काम करतात. ज्यामुळे खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही. हे प्रोटीन तुम्ही सकाळच्या नाश्त्यामधून घेऊ शकता. जसे पनीर, सोयाबीन , चण्याचं सलाड, मोड आलेली कडधान्ये तुम्ही थोडं बॉईल करून कांदा, टोमॅटो घालून चाट मसाला टाकून चाट प्रमाणे घेऊ शकता. आहारामध्ये प्रोटीनसोबत कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, फॅट्स व्हिटॅमिन्स घेण्याचा हि प्रयत्न करा.

४) जेवण बारीक चावून खा -‘

जेवणाला खूप चावून मगच खा. हि खूप साधी पण इम्पॉर्टन्ट टीप आहे. अन्नाला तोंडात खूप बारीक केल्यामुळे ते पचण्याचं काम सोपं होत. जेव्हा आपली लाळ अन्नामध्ये मिसळते ते सर्वात पावरफुल डायजेस्टिव्ह liquid असत. जेवढं जास्त हे liquid आपल्या अन्नामध्ये मिसळून शरीरात जात तेवढं आपल्या शरीराला जेवणातून एनर्जी एक्सट्रॅक्ट करणे सोपे होते आणि पचन पण सोपं होईल.

त्यासोबतच जास्त वेळ चावल्यामुळे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटेल. म्हणून तुम्ही over eating पासून पण वाचाल. म्हणून आपल्यासाठी थोडा वेळ काढून २०-२५ मिनिटे देऊन आरामात जेवण करा.

vajan kami karnyahcya tips

५) फळे आणि सिजनल भाज्या खा –

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये सीजन मध्ये उपलब्ध असलेल्या भाज्यांचा समावेश करायला हवा. हिरव्या पालेभाज्या आणि फळांतून तुम्हाला आवश्यक असलेली विटामिन्स, मिनरल्स मिळायला मदत होईल. भाज्या ह्या जास्त शिजवू नका आणि कमी तेलाचा वापर करून बनवा.

६) रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा –

रात्रीचे जेवण हे संध्याकाळी ७ पर्यंत घेण्याचा प्रयत्न करा. ऑफिस किंवा इतर कारणांमुळे पोससीबल असेल तर तर जास्तीत जास्त ८ पर्यंत डिनर करून घ्या. त्यासोबतच रात्रीचे जेवण हलके घेण्याचा प्रयत्न करा. वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये हे खूप महत्वाचे आहे. कारण यामुळे बॉडी फॅट कमी होण्यास मदत होते. झोपण्याच्या ३ तास तरी आधी जेवलो तर आपण झोपेपर्यंत आरामात पचून जाते. आणि अपचन संबंधी तक्रारी जसे ऍसिडिटी, गॅसेस वगैरे पण दूर होण्यात मदत होते.

७) हेल्थी फूडच आहारमधून घ्या –

वजन कमी करताना तसेच इतर वेळीही हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि सकाळचा नाश्ता हा पोटभर घेतला पाहिजे. जर सकाळी तुम्ही आपल्या बॉडीला पोषक असं डाएट दिल तर दिवसभर एनर्जेटिक वाटेल. नाश्त्यामध्ये तुम्ही इडली, चटणी पोहे, उपमा, वेगवेगेया प्रकारचे चिला यांचा समावेश करू शकता. पण इतकाही जास्त नाही खाल्लं पाहिजे कि ते आपल्या भुकेपेक्षा खूप जास्त असेल. नाही तर वजन कमी होण्यामध्ये मदत होणार नाही.

नाश्त्यानंतर २-३ तासांनी तुम्ही एक छोटा स्नॅक घेऊ शकता यामध्ये तुम्ही एखादे फ्रुट, रोआस्टड मखाने, चणे, मुरमुरे घेऊ शकता. मध्ये थोडं खाल्ल्यामुळे जेवण्याच्या वेळी खूप भूक लागत नाही म्हणून जेवणामध्ये कमी खाल्लं जात. दुपारच्या जेवणामध्ये साधा आहार घेतला पाहिजे. म्हणजे भाजी, चपाती, डाळ भात घेऊ शकता. तळलेले, मसालेदार अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. जेवणानंतर २- ३ तासांनी तुम्ही थोडं स्नॅक घेऊ शकता. पण ते पण हेल्थी असावं जसे ड्राय फ्रुटस, ज्यूस मुरमुरे …

रात्रीच जेवण हे मी आधी सांगितल्याप्रमाणे हलके घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. यावेळी तुम्ही १-२ भाकरी भाजी किंवा दालखिचडी तसेच ओट्स वगैरे घेऊ शकता.

 

# वजन कमी करण्यासाठी या गोष्टी टाळा –

१)  मीठ –

बऱ्याचदा आपल्याला वाटत कि आपलं वजन वाढलेलं आहे पण अनेकदा ते वॉटर रिटेन्शन असत. जास्त मीठ आहारातून घेतल्यामुळे आपली बॉडी पाण्याला जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये रिटेन करून ठेवते. आणि आपले वजन वाढले आहे असे वाटते. म्हणून आपल्या रोजच्या जेवणातून सोडियम क्लोराइड चे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.

गोड खाण्याबद्दल तर आपण जागरूक असतो, कि हे आपण खायला नको वजन वाढेल, पण मीठ हि वजन वाढण्यासाठी तेवढेच कारणीभूत आहे. त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही पिंक सॉल्ट किंवा सैंधव मीठ ज्याला आपण म्हणतो ते वापरू शकतो. त्या मिठामध्ये सोडियम क्लोराइड चे प्रमाण कमी असते. 

२) पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड टाळा –

लोणत्याही प्रकारचे पॅकिंग केलेलं, प्रोसेस्ड केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. कारण त्याम्हद्ये प्रिजर्वेटिव्ह वापरलेले असतात जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. जसे कि चिप्स चे पॉकेट, नमकीन, इतर पॅकिंग स्नॅक्स यामध्ये मीठ जास्त असते. तसेच गोड पदार्थ जसे केक्स, बिस्किट्स हे पण खाणे टाळा.

३) साखर –

साखरेपासून बनलेले पदार्थ जसे मिठाई, केक हे तुमच्या हेल्थसाठी खूप हानिकारक आहेत. यापासून तुमच्या शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही. पण खूप जास्त कॅलरीज वाढवण्याचं काम हे करतात. साखर खाल्लंनंतर आपल्याला ती खाण्याची सवय लागते जी सोडणे गरजेचे आहे. याला रिप्लेसमेंट म्हणून आपण गुळाचा वापर करू शकतो.

४) तळलेले, मसालेदार पदार्थ –

स्पाइसी, तळलेले पदार्थ यांच्यासापसुन दूर राहा. बाहेरचे वडापाव, सामोसा हे त्याच त्या तेलात तळलेले असल्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात टॉक्सिन्स तयार होतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात.

समारोप –

तर मित्रांनो आज आपण वजन कमी करण्याबद्दल खूप काही जाणून घेतले. लेखाच्या सुवातीला आपण बघितले कि झटपट वजन कमी करणे चांगले नाही. आपण स्वतःला थोडा वेळ हा दिला पाहिजे. नंतर आपण वजन कमी करण्यासाठी काही टिप्स बघितल्या ज्या फॉलो करून तुम्ही पण आपले वजन नक्की कमी करू शकता. तर विचार नका करू आजपासूनच सुरवात करा आणि तुम्हाला काय रिजल्ट मिळाले ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top