हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | Winter Skin Care Tips In Marathi

हिवाळ्यात तापमान कमी होऊन गारठा वाढतो. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज बनते. तसेच सुरकुत्या, त्वचा फाटणे, खाज येणे असे अनेक त्वचा विकार आपल्याला बघायला मिळतात. या काळात बऱ्याच जणांची त्वचा काळपट पडते. कारण हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशावेळी आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. आज या लेखामधून आपण हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी काही महत्त्वाचे उपाय बघणार आहोत.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | Winter Skin Care Tips In Marathi 

१. हायड्रेशनसाठी पाणी प्या –

हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे आपल्याला तहान कमी लागते. असे असले तरी शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण तेवढेच राहते. त्यामुळे कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिलेच पाहिजे. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि त्वचेतील मॉइश्चर कायम राहते.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

२. कोमट पाण्याने अंघोळ करा –

खूप थंडी असली तरीही अति गरम पाण्याने अंघोळ करू नका. कारण खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. म्हणून आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करावा. खूप थंडीमध्ये जर गरम पाण्याने आंघोळ करावी लागली तर अंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चराइजर किंवा तेल जरूर लावावे त्यामुळे त्वचा कोरडी होणार नाही.

३. स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे –

हिवाळ्यात त्वचा आतून चमकदार बनवण्यासाठी आपल्या आहारात बदाम शेंगदाणे अक्रोड यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा. यासाठी रोज काही भिजवलेले बदाम शेंगदाणे खाल्ले पाहिजेत. यातील पोषक तत्वामुळे त्वचेचे आरोग्य सुधारायला मदत होते. आणि त्वचा मुलायम आणि मऊ बनते.

४. तेलाने मसाज करावे –

जर त्वचा खूप कोरडी झाली असेल किंवा खाज येत असेल तर रोज आंघोळीच्या पंधरा-वीस मिनिटे अगोदर आपल्या त्वचेवर बदामाचे तेल, तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा दुधाच्या मलईने मसाज केले पाहिजे आणि त्यानंतर अंघोळ केली पाहिजे. याने त्वचा मुलायम बनेल.

Winter Skin Care Tips In Marathi

५. विटामिन ई ऑइल आणि एलोवेरा जेल –

तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वापरत नसाल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी विटामिन ऑइल आणि एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा ग्लोविंग आणि उजळ बनण्यात मदत होते.

६. त्वचेला मॉइश्चरायझर लावावे –

थंडीमुळे त्वचा कोरडी, निस्तेज होण्याची शक्यता असते. आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणे फायद्याचे ठरते. नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही एलोवेरा जेल, बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल तसेच वापर करू शकता. यामुळे त्वचा दीर्घकाळ मऊ राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात चेहरा चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय

७. सूर्याच्या किरणा पासून बचाव करा –

हिवाळ्यात शरीरात उन्हाचा तीव्रपणा कमी जाणवत असला तरी त्वचेवर सूर्याच्या किरणांचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे उन्हात जाताना SPF 15 sunscreen चा उपयोग केला पाहिजे. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव होतो.

८. आहारात पोषक घटकांचा समावेश करावा –

त्वचेला असून हेल्दी आणि चमकदार बनवण्यासाठी आपल्या आहारात तूप सूर्यफुलाच्या बिया, flax seeds ताजी फळे भाज्या यांचा समावेश केला पाहिजे. फळांमध्ये विशेषतः संत्री पपई गाजर रताळे यांचा समावेश करावा त्यामुळे त्वचेचा आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात चेहरा चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय

९. नियमित त्वचा एक्सपोलिएट करा –

Exfoliation मुळे त्वचेवरील dead skin निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही स्क्रब चा वापर करून त्वचा exfoliate केली पाहिजे. यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. नॅचरल स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, मध आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण घेऊन त्याने चेहऱ्यावर हळुवारपणे मसाज करावा.

१०. ताण तणाव कमी करा –

तणावामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ध्यान, योग किंवा इतर त्यांना दूर करण्याचे उपाय करून तुम्ही stress दूर ठेवा जेणेकरून तुमचे मन शांत राहील. ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर होतो.

manachya shanti sathi dhyan

हिवाळ्यात चेहरा चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय (टिप्स) –

⇒ Dry skin असणाऱ्यांनी काही फ्रेंड ग्लिसरीन चे घेऊन त्यामध्ये थोडे गुलाब जल आणि तिथे इसेन्स करून ते चेहऱ्यावर लावल्याने      त्वचा मऊ होण्यास मदत होते.
⇒ जर तुम्हाला पिंपल्स आहे त्रास असेल तर ग्लिसरीनमध्ये एलोवेरा जेल आणि विटामिन ई कैप्सूल मिक्स करून लावल्याने पिंपल्स        प्रॉब्लेम आहे दूर व्हायला मदत होते.
⇒ त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी दही घेऊन त्यामध्ये थोडी हळद टाकून या मिश्रणाने चेहऱ्यावर तसेच हातापाया नाही हळुवारपणे मसाज केल्याने त्वचेवरील ब्लॅकहेड तसेच निघून जायला मदत होते आणि त्वचा चमकदार बनते.
⇒ त्वचेवरील dead skin करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून हळुवारपणे मसाज करावे आणि मग ते धुऊन टाकावे. यामुळे dead skin निघून जाण्यास मदत होते.
⇒ थंडीमुळे तळव्यांना भेगा पडल्या असतील, पाय dry झाले असतील तर गरम पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये पाय बुडवून बसावे.   नंतर प्यूमीस स्टोन ने पाय घासावे यामुळे dead skin निघून जाईल.
मग काय कोरडे करून त्यावर तिळाचे तेल किंवा दुसरे कोणतेही तेल लावावं. याने पाय मऊ होतात आणि भेगाही निघून जातात.  ⇒ जर हा उपाय आपण रात्री झोपण्याआधी केला तर ते लावल्यावर सॉक्स घालून आपण झोपलं पाहिजे यामुळे लवकर फायदा         मिळतो.
⇒ विटामिन सी कॅप्सूल घ्या. मी तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळेल. विटामिन सी कॅप्सूल सोबत बदामाचे तेल मिक्स       करून ते त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर फेशियल सारखा glow येईल.

समारोप –

तर आज या लेखामधून आपण हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेतले. आणि या ऋतूमध्ये चेहरा चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपायही बघितले. तर तुम्ही पण कॉस्मेटिक मध्ये पैसे घालवण्यापेक्षा या घरगुती उपायांनी आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि अधिक युती आणि आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

                          ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  

Frequently Asked Questions –

Q1.हिवाळ्यात चेहऱ्याला काय लावावे?

Ans – हिवाळ्यात चेहऱ्याला लावण्यासाठी फेशियल ऑइल सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. तुम्ही बदामाचे तेल, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल यांचा वापर करू शकता याशिवाय तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होणारे मॉइश्चराइजर हि वापरू शकता.

Q2. हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

Ans – हिवाळ्यामध्ये आंघोळीनंतर मॉइश्चराइजर लावण्याची सवयच आपण केली पाहिजे. जेणेकरून त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील आणि स्किन गलोविंग राहील.

Q3. हिवाळ्यात त्वचा काळवंडणे कसे टाळावे?

Ans –

  • घरातून बाहेर पडताना सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे.
  • आठवड्यातून किमान दोन वेळा चेहरा स्क्रब ने स्वच्छ केला पाहिजे यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल सोबतच त्वचेवरील धूळ, मातीही निघून जाईल.

Q4. हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते?

Ans –हिवाळ्यात वातावरण थंड असते आणि हवेत ओलावा कमी असतो म्हणून कोरड्या हवेमुळे त्वचाही कोरडी बनते.

Q5. हिवाळ्यातील त्वचेची काळजी का महत्त्वाची आहे?

Ans – हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण या काळात स्किन अधिक ड्राय आणि निस्तेज होते. आणि त्वचा फाटणे खाज यांसारखे अनेक त्वचाविकार बघायला मिळतात.

                          ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~  ~

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top