एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात? HIV Symptoms In Marathi

एचआयव्ही (HIV) म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, जो एक व्हायरस आहे हा शरीराच्या इम्युनिटी सिस्टीमवर हल्ला करतो. योग्य वेळी निदान व उपचार न मिळाल्यास एचआयव्ही एड्स (AIDS) हा आजार गंभीर अवस्थेत बदलतो. परंतु एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर लगेच त्याची लक्षणे दिसतात का? आणि ती लक्षणे कोणत्या कालावधीत दिसतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखामधून आपण एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात ? आणि ती दिसतात का ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात?

एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात?

एचआयव्हीची लक्षणे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये दिसून येतात –

1. प्राथमिक संसर्ग टप्पा (Acute HIV Infection) →

एचआयव्ही संसर्गानंतर पहिल्या २ ते ४ आठवड्यांत काही लोकांना सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात. हा टप्पा प्राथमिक संसर्ग टप्पा (Acute HIV Infection) म्हणून ओळखला जातो. यामध्ये सामान्यतः फ्लू सारखी लक्षणे दिसतात.

  • ताप (सतत येणारा किंवा कमी-जास्त होणारा)
  • घसा खवखवणे
  • अंगदुखी व सांधेदुखी
  • डोकेदुखी
  • त्वचेवर लालसर पुरळ येणे
  • लिम्फ नोड्स सूजणे
  • थकवा व अशक्तपणा

ही लक्षणे एखाद्या सामान्य व्हायरल इन्फेक्शनसारखी वाटू शकतात, त्यामुळे अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात.

एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात?

2. क्लिनिकल लॅटेंसी स्टेज (Clinical Latency Stage)

सुरुवातीच्या लक्षणांनंतर क्लिनिकल लॅटेंसी टप्पा येतो, जो काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत चालू राहू शकतो.

  • या टप्प्यात एचआयव्ही शरीरात सक्रिय राहतो, पण बहुतेक वेळेस लक्षणे दिसत नाहीत.
  • अनेक लोकांना यावेळी स्वतःला एचआयव्ही झाल्याची जाणीव होत नाही.
  • परंतु, शरीरातील रोगप्रतिकारक पेशींची (CD4 पेशी) संख्या हळूहळू कमी होत राहते, आणि विषाणूची संख्या (व्हायरल लोड) वाढत जाते.
  • कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे रुग्णाला आपल्याला व्हायरस ची लागण झाली आहे हे कळून येत नाही.

3. एड्स स्टेज (Aids Stage)

एचआयव्ही संसर्गाची लक्षणे खूप काळ दुर्लक्षित राहिल्यास किंवा उपचार न झाल्यास तो एड्स अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (Acquired  Immunodeficiency Syndrome) या स्थितीत पोहोचतो. या स्टेजमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमजोर होते, ज्यामुळे वेगवेगळ्या संसर्गजन्य आजार (जसे की न्यूमोनिया, त्वचेचे रोग, कर्करोग) होण्याचा धोका वाढतो. एड्सच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात

  • सतत ताप येणे
  • वजन झपाट्याने कमी होणे
  • दीर्घकालीन डायरिया
  • रात्रभर घाम येणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • त्वचेवर किंवा तोंडात व्रण
  • वारंवार संसर्ग (जसे की न्यूमोनिया, टीबी)
  • श्वास घेताना त्रास

हा टप्पा धोकादायक असून गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतो.

एचआयव्हीची टेस्ट करणे महत्त्वाचे का आहे?

एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर लगेच रक्त चाचणीत (HIV Test) व्हायरसचा संसर्ग झाला आहे हे समजून येत नाही.

  • एचआयव्ही शरीरात आल्यानंतर त्याच्या अँटीबॉडी तयार होण्यासाठी २-४ आठवडे लागतात, ज्याला विंडो पिरियड म्हणतात.
  • त्यामुळे संसर्गाचा संशय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित चाचणी करणे गरजेचे आहे.
  • लवकर निदानामुळे योग्य उपचार करून एचआयव्ही नियंत्रित ठेवता येतो आणि एड्स होण्याचा धोका कमी होतो.

एचआयव्हीची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी का असतात?

एचआयव्हीची लक्षणे व्यक्तीच्या शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर, वयावर, जीवनशैलीवर आणि इतर आरोग्य स्थितींवर अवलंबून असतात.

  • काही लोकांमध्ये लक्षणे त्वरित दिसतात, तर काहींना ती कित्येक महिने किंवा वर्षांनंतर जाणवतात.
  • महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, प्रजनन समस्या, तसेच योनीमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक दिसते.
  • मुलांमध्ये वाढ खुंटणे, सतत ताप येणे किंवा वजन कमी होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

एचआयव्हीवर होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?

एचआयव्हीवर अद्याप पूर्णतः इलाज नाही, पण एंटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) च्या मदतीने एचआयव्हीचा संसर्ग रोकता येतो.

  1. लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केला पाहिजे.
  2. ड्रग्ससाठी वापरल्या जाणाऱ्या सुई इतरांसोबत शेअर करू नका.
  3. गर्भवती महिलांनी वेळेवर टेस्ट करून आवश्यक उपचार घ्यावेत.
  4. रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहार व व्यायाम करावा.
  5. टॅटू बनवताना चांगल्या ठिकाणहून करावे. कारण एकच सुई वापरल्याने आपल्याकडे एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

समारोप

आज आपण एचआयव्हीची लक्षणे किती दिवसांत दिसतात? त्याबद्दल जाणून घेतले त्यासोबतच एचआयव्ही होण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी ते ही जाणून घेतले. तर एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसण्याची वेळ प्रत्येकासाठी वेगळी असते. काहींना प्रारंभिक लक्षणे काही आठवड्यांत जाणवतात, तर काहींना वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात फ्लूसारखी लक्षणे दिसत असल्याने याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. वेळेवर टेस्ट आणि उपचारांमुळे एचआयव्ही संसर्ग नियंत्रित ठेवणे शक्य आहे. त्यामुळे, कोणताही संशय असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे व तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top