हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील लाल रक्त पेशींमध्ये असणारे एक प्रोटीन आहे. शरीरातील ऑक्सिजनचे कार्बनडाय-ऑक्साइड मध्ये रूपांतर होण्यासाठी हिमोग्लोबिन गरजेचं असतं. शरीरातील प्रत्येक organ आणि tissueला oxygen चा पुरवठा करण्याचं कामही हिमोग्लोबिन करते. जेवढा आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची लेव्हल योग्य प्रमाणात असेल, तेवढे तुमच्या शरीरातील पेशींना ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही अधिक उत्साही आणि energetic feel कराल. हिमोग्लोबिनची कमतरता असते. तेव्हा आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. या लेखामधून आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करता येतील असे सोपे घरगुती उपाय बघणार आहोत. 

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची सामान्य रेंज –

महिलांमध्ये – 11.5 ते 15.9 gm

पुरुषांमध्ये – 13.9 ते 16.6 gm

एवढी असते.

आपल्या शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर शरीर काही संकेत देते. त्याला आपण शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर दिसणारी लक्षणे असे म्हणतो. ती आपण खाली बघू.

हिमोग्लोबिन कमी झाल्यावर दिसणारी लक्षणे –

⇒ अशक्तपणा जाणवतो.

⇒ डोकेदुखी होते.

⇒ रोजचीच कामे करून सुद्धा थकवा जाणवतो.

⇒ श्वास कमी पडतात किंवा धाप लागते.

⇒ भूक लागत नाही.

⇒ हार्टबीट वाढतात.

⇒ डोळ्यांपुढे अंधारी येते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये वरील लक्षणे दिसतात. तेव्हा त्या व्यक्तीला ॲनिमिया झाला आहे असे आपण म्हणतो. आर्यन युक्त पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. फक्त आर्यन रीत फोड घेणे पुरेसं असतं तर आपल्याला आहारामध्ये फॉलिक ऍसिड आणि विटामिन सी चा समावेश करणे ही जरुरी आहे. या दोन गोष्टी घेतल्यावर तुम्ही जे आर्यन खाताय ते शरीराकडून संपूर्णपणे शोषले जायला मदत होते.

शरीरातील हिमोग्लोबिन कशामुळे कमी होते ?

अति मसालेदार तिखट खाद्यपदार्थ जसे लेज कुरकुरे चाट मसाला यांचा जास्त सेवन करणे. यासारख्या पदार्थामुळे रक्त कमी असल्याची यादी होऊ शकते.

त्यासोबतच अति गरम चहा, सूप पिणे, जास्त प्रमाणात शिळे अन्न खाणे, पिष्टमय पदार्थ जसे बिस्किट खारी टोस्ट चपाती हेच पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे ॲनिमिया त्रास होऊ शकतो.

दिवसभरामध्ये जास्त मेहनत केल्यामुळे तसेच जेवण केल्यावर जास्त मेहनत केल्यामुळे असे होऊ शकते.

महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी शरीरातील जास्त रक्त गेल्यामुळे रक्त कमी होऊ शकते.

काही गोष्टींची सतत चिंता केल्यामुळे हिमोग्लोबिनची लेव्हल कमी होते. भय राग चिंता शोक अति दगदग यामुळेही शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय –

⇒ जसे आपण वर बघितले की हिमोग्लोबिनच्या शोषणासाठी आपल्याला विटामिन सी ची आवश्यकता असते. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यांचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. कमीत कमी एक लिंबाची फोड तरी आपल्या आहारात असायलाच हवी.

⇒ डाळिंबामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर आणि लोह, कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात. दररोज डाळिंब खाल्ल्याने किंवा डाळिंबाचा रस पिल्याने हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहायला मदत होते.

⇒ खजुरामध्येही लोह भरपूर प्रमाणात असते, जय रक्तातील हिमोग्लोबिनची लेवल वाढवायला मदत करतात. म्हणून डायबिटीस चे लग्न सोडून बाकी सर्व व्यक्तींनी खजूर याचे नियमित सेवन केले पाहिजे.

⇒ हिमोग्लोबिनची लेवल वाढवण्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ म्हणजे बीट रूट. त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. यासोबतच विटा मध्ये पोटॅशियम फायबर आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. म्हणून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची लेव्हल योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन नियमितपणे केले पाहिजे.

⇒ हिमोग्लोबिनची लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी मध्यम ते उच्च तीव्रतेचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे. ज्या प्रकारचा व्यायाम तुमच्याकडून होत असेल तो जरूर केला पाहिजे. जेव्हा तुम्ही व्यायाम करतात तेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल वाढते म्हणून जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही व्यायाम करणे सुरू केले पाहिजे.

⇒ धान्यांमध्ये बाजरीत लोहाचे प्रमाण जास्त असते म्हणून ते आपण आहारातून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

⇒ राजमा, चवळी, मटकी यामध्येही लोहाचे प्रमाण भरपूर असते.

⇒ लोखंडी भांड्यांमधून जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा त्यामधून लोह अन्नपदार्थांमध्ये आणि त्यातून आपल्या शरीरात जात असते.

⇒ लाल माठाच्या भाजीमध्ये भरपूर असते. चवळीची पालेभाजी, कांद्याची पात यामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे सेवन केले पाहिजे.

तुमची लेव्हल वाढवायला काही आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. विशेषतः तुम्ही गर्भवती असाल किंवा कोणताही दुसरा आजार असेल तर.

समारोप –

आज आलेखामधून आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरच्या घरी करता येते असे घरगुती उपाय बघितले. तुम्ही पण आपला डॉक्टरांचा सल्लानुसार हे उपाय जरूर करून बघा. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top