पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये लग्न संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. पण अलीकडच्या काळामध्ये हे चित्र बदलत चालेललं आपल्याला दिसत आहे. पाश्चात्त्य देशांचे अनुसरण करून आपल्याकडेही घटस्फोटांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. घटस्फोट होण्याची खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. आज या लेखांमधून आपण घटस्फोट होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
कोणत्याही नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर या भावना महत्त्वाच्या असतात. या असतील तर ते नाते मजबूत बनत असते. लग्न म्हटलं की त्यानंतर दोघांचं आयुष्य बदलणार असतं. म्हणजे काही प्रमाणात तडजोड ऍडजस्टमेंट या आल्याच. पण आज कालचे पिढी हे बदल स्वीकारायला तयार नसते.
घटस्फोट होण्याची मुख्य कारणे –
१. बदलत चाललेली मानसिकता –
पूर्वी आपल्याकडे एकदा लग्न केलं की ते टिकलंच पाहिजे यासाठी घरातल्या सर्व आणि पती-पत्नी सुद्धा आग्रही असायचे. काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपसात सहमत करून सोडवले जायचे. घटस्फोटाचा विचारही कुणाच्या मनात येत नसे. पण हल्ली मानसिकता बदलली आहे. दोघांचे विचार पटत नसतील, एकमेकांचे स्वभाव वेगळे आहेत असे वाटले तर वेगळे व्हा !!!! अशी संकल्पना रुजत चालली आहे. एकमेकांना समजून घ्यायला कुणाकडे वेळही नाही आणि एकमेकांना चांगले वाईट गुणांसह स्वीकारण्याचे धैर्यही आजच्या पिढीमध्ये नाही. यामुळे मग घटस्फोटाचे पाऊल उचलले जाते.
२. महिलांचा आर्थिक स्वातंत्र्य –
आजकालच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने कमावत आहेत. म्हणून कुणाचं काहीच ऐकून घ्यायला त्या तयार नसतात. कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट करायला त्या तयार नसतात. म्हणून मग लहान मुल असेल तरी माझा आणि माझ्या मुलाचा सांभाळ मी व्यवस्थित करू शकते असं म्हणून त्या लगेच घटस्फोट घ्यायला तयार होतात.
३. कमी होत असलेला विश्वास आणि प्रामाणिकपणा –
कोणत्याही नात्यांमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो हल्ली एकमेकांवरचा विश्वास आणि प्रामाणिकपणा ही कमी झालेला आहे. आणि एकमेकांसोबत प्रामाणिकपणाही नसतो त्यामुळे घटस्फोट होतात.
४. स्पष्ट पणाचा अभाव –
लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर एकमेकांबद्दलच्या सर्व गोष्टी शेअर करणं गरजेचं असत. जसे शारीरिक आजार व्याधी, काही सवयी, व्यसने, लग्न पूर्वीच्या आयुष्यातील काही घटना या गोष्टीचे भविष्य समोर येतात तेव्हा त्यांचा नात्यावर वाईट परिणाम होतो. गैरसमज वाढत जातात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
५. बदलती जीवनशैली –
हल्ली सोशल मीडियाचा अतिवापर होत आहे त्यामध्ये जी आभासी दुनिया आहे ती महिलांना खरी वाटत असते. त्यामुळे मग आपला जोडीदार तसा नाही अशी भावना निर्माण होते. एकमेकांबद्दल दोघांच्याही अपेक्षा प्रचंड वाढलेल्या असतात आणि स्वतःला बदलायला कोणी तयार नसतं. आणि मग हे घटस्फोटाच कारण बनतं.
६. कमी झालेला संवाद –
सध्या टीव्ही मोबाईल व्हाट्सअप ओटीटी जास्त वापरामुळे पती-पत्नीचे एकमेकांसोबत संवाद कमी झाले आहेत. पती ऑफिस वगैरे वरून आल्यावर आपल्या मोबाईल टीव्ही मध्येच असतो तर पत्नी ही आपली कामे आवरल्यावर आपल्य मोबाईल मध्येच असते. त्यामुळे नात्याला जसा वेळ द्यायला हवा तसा दिला जात नाही. एकमेकांसोबत जरुरी असलेल्या संवादच आजकाल बंद होत चाललेला आहे. त्यामुळे मग एकमेकांच्या भावनाही समजून घेता येत नाही. आणि संवाद होण्याऐवजी वादच जास्त निर्माण होतात.
७. पालकांचा हस्तक्षेप –
आपल्या मुलीला सासरी सर्वच गोष्टी मनासारख्या मेळाव्यात म्हणून मुलीच्या संसारात तिच्या आई-वडिलांचा प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप होतो. तर इकडे लग्नानंतर मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये असं त्याच्या आई वडिलांना वाटत असतं म्हणून मुलाचे आई वडील त्याच्या संसारात सतत लक्ष घालतात त्यामुळे मग नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत ही जाऊ शकते.
८. अहंकार –
पती-पत्नी दोघेही आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे समजून घेण्यास कोणीही तयार नसते. आपणच बरोबर आहोत असे दोघांना वाटत असते. समोरच्याने आपल्यासाठी बदलावे असं दोघांचही मत असतं. कशामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत होतो.
९. एकमेकांवर संशय घेणे –
काही व्यक्तींना संशय घेण्याचा एक प्रकारे आजारच असतो. काही बायका नवऱ्यावर तर काही नवरे आपल्या बायकोवर विनाकारण संशय घेत असतात. यामुळे नाहक मानसिक त्रास जोडीदाराला सहन करावा लागतो. मग काही वेळा या गोष्टीला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो.
१०. मनाविरुद्ध झालेल्या लग्न –
लग्न जर आई-वडिलांच्या किंवा इतर कोणाच्या मर्जीने केले असेल, तर ते खूप काळ टिकत नाही. काही केसेस मध्ये टिकतही पण समोरचा जोडीदार तसा समजून घेणारा असावा लागतो. पण बऱ्याच केसेस मध्ये जबरदस्तीने लग्न करून दिल्यानंतर काहीच दिवसांमध्ये ते नात तुटताना आपण बघतो.
११. शारीरिक, मानसिक छळ करणे –
पतीकडून शारीरिक किंवा मानसिक छळ जर होत असेल तर ते घटस्फोटाचे कारण बनू शकतं. छोट्या छोट्या कारणांवरून जर पती मारहाण करत असेल तर या त्रासाला कंटाळून बायको घर सोडून जायला तयार होते.
१२. लग्न आणि लग्नानंतरच्या आर्थिक देवाणघेवाण –
लग्न करून येताना मुलीच्या आई-वडिलांनी खूप गोष्टी नाही दिल्या किंवा मुलाकडून जर सर्व गोष्टी व्यवस्थित मिळत नसतील तरीदेखील त्यामुळे घटस्फोट होऊ शकतात. अवास्तव अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे ही घटस्फोट होतात.
समारोप –
मित्रांनो, या लेखांमधून आपण घटस्फोट होण्याची मुख्य कारणे बघितली. लग्नाची टिकवन हे दोघांच्याही हातात असतं आणि ती दोघांची जबाबदारी असते. घटस्फोट होण्यामागची कोणती कोणती कारणे असू शकतात ते आपण या इथे बघितलं. एकमेकांना समजून घेण आणि नात्याला वेळ देण हे खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या लेखाच्या माध्यमातून.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!