मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!!! आपल्याला घसा दुखण्याची तक्रार हि कधी ना कधी होत असते. सामान्यतः सर्दी, खोकला यामुळे घसा दुखतो पण घसा दुखण्याची अन्य काही करणेही असू शकतात. ती आपण या लेखामध्ये बघणार आहोत. सोबतच त्यावर करता येतील असे सोपे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय पण बघणार आहोत. तुम्हालाही घसा दुखण्याचा त्रास होत असेल. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत जरूर वाचा.
घसा दुखण्यासोबत अनेकदा घसा कोरडा होणे, अन्न गिळायला त्रास होणे, घसा खवखवणे असे त्रास पण होतात. सर्दीची सुरवात पण घसा खवखवण्याने, दुखण्याने होत असते. अशा प्रकारचा त्रास कमी करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा घरच्याघरीच साधे उपाय करून आराम मिळवता येतो. चला तर मग सुरवातीला आपण बघू घसा दुखण्याची कारणे कोणती असतात ते.
# घसा दुखण्याची कारणे –
घसा दुखणं साधारणतः ७ -८ दिवसांमध्ये सहज बरे होऊन जाते. पण जास्त काळापर्यंत हे दुखणं राहील तर ते धोकादायक ठरू शकते. घसा दुखण्याची वेगवेगळी कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. विषाणू संसर्ग –
विषाणू (virus)मुळे होणारी घसादुखी हे घसा दुखण्याचे एक सामान्य कारण आहे. घसादुखी हे सामान्यतः सर्दी किंवा फ्लू चे एक लक्षण असते. चिकनपॉक्स, न्यूमोनिया आणि अन्य आजारांचे कारण बनणारे virus पण घसादुखी निर्माण करू शकतात.
विषाणूमुळे होणारी घसादुखी कमी करण्यासाठी हे उपाय करा –
- कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या टाका.
- स्वतःला हायड्रेटेड ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या.
विषाणूमुळे होणारे संक्रमण ७-८ दिवसात बरे होते आणि हे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून जे लोक आजारी आहेत त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका. खोकताना- शिंकताना रुमालाचा वापर करा.
२. टॉन्सिल्स –
या मध्ये टॉन्सिल्सला सूज येते. व्हायरल किंवा जिवाणूंचे संक्रमण सामान्यपणे टॉन्सिल्स चे कारण बनते. जे तुमच्या शरीराच्या प्रतिकारक क्षमतेची एक प्रतिक्रिया आहे. जी तुमच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या जिवाणूंची तपासणी करतात. टॉन्सिल्स मुळे पण घसा दुखू शकतो.
सोबत अन्य लक्षणेही दिसू शकतात जसे – थंडी वाजणे, कान दुखणे, ताप, डोकेदुखी अन्न गिळायला होणार त्रास, लाल सुजलेले टॉन्सिल.
३. ऍलर्जी –
ऍलर्जी तेव्हा होते जेव्हा एखाद्या बाहेरच्या घटकांप्रती शरीर खूप जास्त प्रतिक्रिया करते. जसे धूळ, एखादा विशिष्ट वास, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस अशा गोष्टींपासून ऍलर्जी होऊ शकते. त्यासोबत शिंका येणे, नाक बंद होणे हि लक्षणेही दिसू शकतात. काहींना ऍलर्जीमुळे झालेली घसादुखी viral किंवा bacterial घसादुखी वाटू शकते. पण आपण ते खालील लक्षणांवरून ओळखू शकतो.
ऍलर्जी हि खूप काळापर्यंत राहते आणि त्यामध्ये तापाची लक्षणे पण दिसून येतात. ऍलर्जीचा प्रॉब्लेम हा काही सिजनमध्येच दिसून येतो.
४. कोरडी हवा –
कोरडी हवा असलेल्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल, तर अशा कोरड्या हवेमध्ये श्वास घेतल्याने घसा कोरडा होऊ शकतो. अधिक काळ घसा कोरडा राहिल्यामुळे घशाला त्रास होऊन तो दुखायला लागतो.
५. धूर, केमिकल आणि दुसऱ्या समस्या –
गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे खासकरून शहरांमध्ये तसेच कंपनीमधून निघणाऱ्या वायूमुळे घशाला त्रास होऊ शकतो आणि अधिक काळ अशा दूषित हवेच्या संपर्कात राहिल्यामुळे घसादुखी होऊ शकते.
६.दुखापतीमूळे, जोरात बोलल्यामुळे –
घशाला झालेल्या कोणत्याही प्रकारच्या जखमेमुळे पण घास दुखणे सुरु होऊ शकते. जोरात खाल्ल्याने तसेच घशाला काही टोचल्यामुळे तसेच जोरात ओरडून बोलल्यामुळे किंवा खूप वेळ बोलल्यामुळे पण घसादुखीचा त्रास होऊ शकतो.
७. स्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GRD)-
GRD हि एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये ऍसिड पोटाच्या वरच्या दिशेमध्ये इसोफेगस मध्ये जाते. हे ऍसिड इसोफेगस आणि घशाला नुकसान पोहोचवते. यामध्ये हार्ट बर्न, ऍसिड रिफ्लेक्स आणि घसा दुखणे यासारखी लक्षणे दिसतात.
८. ट्युमर –
घसा दुखी हि जीभ, घसा आणि व्हॉइस बॉक्स च्या ट्युमरचे कारण पण असू शकते. तरी हे दुर्लभ कारणांपैकी एक आहे.
हे पण जरूर वाचा :
नाकातून पाणी येणे यावर असरदार घरगुती उपाय
# घसादुखी viral आहे कि bacterial कसे ओळखाल ?
घसादुखण्याचे कारण viral आणि bacterial दोन्ही असू शकतात. जरी दोन्हींची लक्षणे सारखी असली तरी तुम्ही काही लक्षणांवरून त्यांच्यातील फरक ओळखू शकता.
Bacterial Infection मधील लक्षणे –
- मळमळ
- उलटी
- भूक न लागणे
- पोटदुखी
- पोटामध्ये इन्फेकशन
Viral infection मधील लक्षणे –
- खोकला
- नाक वाहणे
- घशामध्ये सूज
- कर्कश आवाज (horse voice )
Bacterial Infection १-२ दिवसात बरे होते तर Viral infection बरे व्हायला १२ते १५ दिवस लागू शकतात.
घसादुखीवर सोपे घरगुती उपाय –
घसा दुखीमध्ये घास दुखण्यासोबत, घशाची आग, घसा कोरडा पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. हा त्रास दूर करण्यासाठी डॉक्टर जरी अँटिबायोटिक्स किंवा अँटीबॅक्टरीयल औषध घ्यायला सांगत असले तरी या संक्रमणाचा इलाज करण्यासाठी काही प्राकृतिक आणि घरगुती उपाय प्रभावी सिद्ध होतात. तर बघूया घसादुखीवर काही सोपे घरगुती उपाय –
- खूप पूर्वीपासून आपल्याकडे करत आलेले मिठाच्या पाण्याच्या गुळण्या घसादुखीमध्ये खूपच उपयोगी ठरतात. १ ग्लास पाण्यामध्ये १ चमचा आणि १ चमचा हळद आणि मीठ टाकून ते थोडे गरम करून त्याच्या गुळण्या करा. असे दिवसातून ३ ते ४ वेळा करा.
- मधाचे सेवनही फायद्याचे ठरते. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. जे घसादुखी, सर्दी खोकला यामध्ये आराम देतात कोमट पाण्यामध्ये तसेच काळ्या चहामध्ये तुम्ही मध टाकून त्याचे सेवन करू शकता.
- ऍपल साईडर व्हिनेगर पण घसादुखीमध्ये फायद्याचे ठरते. कारण यामध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्मअसतात यामुळे घसादुखीमध्ये आराम मिळण्यास मदत होते. पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळून ते पिऊ शकता करा.
- कोमट पाण्यात मध आणि थोडा लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करा. यामध्येही अँटीबॅक्टरीयल गुण असतात.
- एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि १ चमचा मीठ टाकून त्याचे सेवन करा.
- या उपायांसोबतच तुम्ही घसा दुखत असल्यावर कोमट पाणीच पिलं पाहिजे. तसेच बाहेरचे तेलकट, मसालेदार पदार्थ, तसेच मिठाई, आईसक्रिम, थंड पदार्थ खाणंही टाळलं पाहिजे.
घसा दुखण्यावर काही आयुर्वेदिक उपाय –
- घसादुखीवर तुळसहि लाभदायक ठरते. तुळशीचा रसाचे ३-४ थेम्ब पाण्यामध्ये टाकून हे घेतले. तर घसादुखीवर अराम मिळतो.
- लवंग पण घसादुखीवर प्रभावी उपाय आहे. एखादी लवंग दाताखाली धरून ती चघळत राहिल्यास घसा मोकळा होतो आणि घसादुखीमध्ये आराम होतो. आणि घशाची सूज पण उतरते.
- लसणाची पाकळी दाताखाली धरल्याने देखील लवकर आराम मिळतो.
- रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये हळद सुंठ उकळून गरम गरम प्यायल्याने फायदा मिळतो.
- ज्येष्ठमध हे घसादुखीवर उपयुक्त आहे. कोमट पाण्यामध्ये ज्येष्ठमधाचे थोडी पावडर टाकून ते प्यायल्याने आराम मिळतो.
- ग्लासभर पाण्यामध्ये १ चमचा त्रिफळा पावडर टाकून उकळवून घ्या. हे थोडं थंड झाल्यावर गुळण्या करू शकता किंवा हे पाणी तोंडात ठेवू शकता.
समारोप –
तर आज आपण या लेखामध्ये घास दुखणेची कारणे आणि सोपे आयुर्वेदिक उपाय बघितले. सुरवातीला आपण घसादुखण्याची कारणे कोणती असू शकतात ते बघितले. सामान्यपणे सर्दी, व्हायरल इन्फेशनमुळे घसादुखीचा त्रास हा होत असतो. नंतर आपण सोपे घरगुती उपाय पण बघितले ज्यांचा उपयोग करून घसादुखीमध्ये आराम मिळवता येतो. तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट मध्ये जरूर विचारा.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!
FAQs
Q1. घसा दुखण्यासाठी लसूण कसे खावे?
Ans – घसादुखीवर लसूण हा एक प्रभावी उपाय आहे. लसणाची पाकळी तुम्ही ५ ते १० मिनिटे दाताखाली ठेवून चघळला पाहिजे.
Q2. थंड हवेमुळे घसा दुखू शकतो का?
Ans – थंड हवामानाचा परिणाम हा आपल्या नाक कान आणि घशावर होत असतो. थंड हवा घशातील सेल्सला कोरडे करू शकते. अशामध्ये तोंडानें श्वास घेणे अधिक त्रासाचे ठरू शकते. थंड हवेमध्ये घसा खवखवणे तसेच घसा दुखणे हे सामान्य आहे.
Q3. घशाच्या संसर्गामुळे घसा दुखतो का?
Ans – घसा खवखवण्याचे सर्वात सामान्य कारण सर्दी किंवा फ्लू मुळे होणारा संसर्ग हेच असते. अशा संसर्गामुळे होणारा त्रास हा काही दिवसांनंतर स्वतःच बरा होतो.
Q4. घसा खवल्यासाठी मध कसे वापरावे?
Ans – कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मधटाकून पिऊ शकता तसेच चहामध्येमध टाकून पिऊ शकता. घसा खवखवणे कमीकरण्यासाठीचहा एक प्रभावी उपाय आहे.