घरगुती उपायांनी चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे | Home Remedies On Facial Hair Marathi

महिलांना भेडसावणारी एक महत्वाची समस्या म्हणजे चेहऱ्यावरील अनावश्यक केस. चेहऱ्यावर, अप्पर लिप्स वर जर जास्त केस असतील तर ते आपले सौंदर्य कमी करण्यासोबतच आपला आत्मविश्वास पण कमी करत असतात. त्यामुळे स्वतःबद्दल हिनपणाची भावना निर्माण होते. चेहऱ्यावरील हे केस आपण घरगुती उपायांनीही कायमचे दूर करू शकतो. घरगुती उपायाने चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे हे आज आपण या लेखांमधून बघणार आहोत.

घरगुती उपायांनी चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे

चेहऱ्यावरील केस हे hormonal imbalance, अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे, जीवनशैली मधले बदल इत्यादीमुळे येऊ शकतात. चेहऱ्यावर वॅक्सिंग, थ्रेडिंग करणे हे नक्कीच चुकीचे आहे. कारण चेहऱ्याची त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते. वॅक्सिंग मुळे स्किन डॅमेज होऊन काळी पडू शकते.

घरगुती उपायांनी चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे ?

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच करता येतील असे नैसर्गिक उपाय आपण इथे बघणार आहोत. हे उपाय natural आहेत आणि यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही.

एक चमचा साखरेमध्ये थोडं पाणी मिक्स करून साखर विरघळवून घ्या. त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चेहऱ्याच्या जास्त केस असलेल्या भागावर लावा. 25 ते 30 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा धुऊन टाका.  हा उपाय आठवड्यातून दोनदा तरी करावा. म्हणजे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होते.

एक चमचा बाजरीचा पिठामध्ये एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट जास्त केस असलेल्या भागावर लावा. २० ते २५ मिनिटे राहू द्या. मग हळुवारपणे मसाज करून पेस्ट काढण्याचा प्रयत्न करा आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाका. आठवड्यातून 2 – 3  वेळा हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जाण्यास मदत होईल.

एक चमचा मध एक चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या ही पेस्ट चेहऱ्याला लावा. वीस मिनिटे तसेच राहू द्या चेहरा थोडा कोरडा झाल्यावर हलक्या हाताने मसाज करत चेहऱ्याचे केस काढण्याचा प्रयत्न करा हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही करू शकता.

एक चमचा बेसनाचे पीठ घ्या यामध्ये एक चमचा हळद आणि दूध घेऊन घट्टसर पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण चेहऱ्यालाही लावू शकता किंवा जास्त केस असलेल्या ठिकाणी हे लावली तरी चालेल‌. १५-२० मिनिटे राहू द्या. नंतर मसाज करत हळूहळू ती काढण्याचा प्रयत्न करा. मग चेहरा स्वच्छ धुऊन टाका.

दोन चमचे बेसन, दोन चमचे खोबऱ्याचे तेल व्यवस्थित मिक्स करून स्मूथ पेस्ट बनवून घ्या. मग त्यामध्ये दोन चमचे गुलाब जल करा. चेहऱ्यावर, मानेवर तुम्ही ही पेस्ट लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील केसांसोबत ब्लॅकहेड्स निघून जायला मदत होते. 25- 30 मिनिटांनी चेहऱ्यावर स्क्रब करत हे मिश्रण काढा मग थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका.

हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. 4 – 5 आठवड्यातच तुम्ही चेहऱ्यावर फरक बघू शकाल आणि तुमची चेहऱ्यावरील नको असलेले केसांपासून सुटका होईल.

वरील घरगुती उपाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा –

वर आपण जे घरगुती उपाय बघितले ते नैसर्गिक असले तरी प्रत्येकालाच ते सूट होतील असे नाही. म्हणून कोणतीही पेस्ट चेहऱ्याला लावण्या अगोदर हातावर आधी पॅच टेस्ट करून बघा. तुम्हाला कुठला त्रास जाणवत नसेल तरच तुम्ही ते चेहऱ्यावर लावू शकता.

एका वापराने तुम्हाला फार जास्त फरक जाणवणार नाही. म्हणून कमीतकमी ४ ते ५ आठवडे उपाय नक्की करून बघा. प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागू शकतो. या उपायांनी तुमच्या चेहऱ्यावरचे केस हळू हळू कमी होऊन मग ते येणे कमी होतात आणि चेहरा स्मूथ दिसतो.

कधी हा कधी तो असे सर्व उपाय न करता कुठलाही एकच उपाय तुम्ही ४ ते ५ आठवडे करून बघा. तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

हळदी चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी खूप उपयोगी आहे पण रेडिमेड मिळणाऱ्या हळदीपेक्षा तुम्ही हळकुंड आणून ते बारीक करून त्याचा उपयोग केला पाहिजे.

चेहऱ्यावर कोणताही पॅक किंवा पेस्ट लावल्यानंतर फेस वॉश ने चेहरा धुऊ नका साध्या पाण्यानेच चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे.

समारोप –

तर आज आपण घरगुती उपायाने चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे याबद्दल जाणून घेतले. तुमच्या चेहऱ्यावर पण जर के जास्त केस असतील तर हे उपाय करून बघा आणि तुमच्या प्रियजनांना ही याबद्दल माहिती द्या. अधिक ब्युटी आणि आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  !!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top