एकाग्रता म्हणजे काय ? एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावे ?

मित्रांनो एकाग्रता, कंसन्ट्रेशन किंवा आधुनिक भाषेमध्ये आपण त्याला फोकस म्हणतो. या एकाग्रतेचे आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. मोठ्या ध्येयाची प्राप्ती असो व छोटी छोटी कामे एकाग्रता हि प्रत्येक ठिकाणी खूप गरजेची आहे. पण एकाग्रता म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का ? तसं तर आपल्याला माहित असत एकाग्रता म्हणजे एका वेळी एक काम करणे. आपण लहानपणापासून एकल असत एकाग्रतेने अभ्यास कर, अमुक कर. तुम्हाला मन एकाग्र करायला त्रास होतो का ?? तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. इथे मी तुम्हाला एकाग्रता म्हणजे नक्की काय असत? त्यासोबत आपले मन एकाग्र का होत नाही याची करणे पण तुम्हाला इथे वाचता येतील आणि शेवटी मी तुम्हाला एकाग्रता वाढवण्यासाठीचे काही उपाय पण सांगणार आहे तर लेख शेवटपर्यत नक्की वाचा.

एकाग्रता म्हणजे काय ? एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावे ?

एकाग्रता म्हणजे काय ?

मित्रांनो एकाग्रता या शब्दाची आपण फोड केली तरी आपल्याला त्याचा आशय समजू शकतो.

एकाग्रता = एक + अग्रता (म्हणजे एकाच गोष्टीकडे पूर्ण लक्ष )

सोप्या शब्दात एकाग्रता म्हणजे जे पण काम आपण या क्षणी करत आहोत त्याकडेच लक्ष देणे आणि मनात पण त्याचाच विचार करणे. जेव्हा आपण आपली पूर्ण ऊर्जा, पूर्ण शक्ती तेच एक काम करण्यामध्ये लावतो तेव्हा ते काम सफल होणे निश्चितच असते. जगातील कितीही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी एकाग्रतेच्या शक्तीने पूर्ण करता येऊ शकतात.

स्वामी विवेकानंद म्हणतात, यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये एकच फरक असतो तो म्हणजे एकाग्रता. आपल्या देशात तर प्राचीन काळापासूनच ऋषीमुनींनी एकाग्रतेला खूप महत्व दिले आहे. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे कि गेल्या काही वर्षांमध्ये व्यक्तीचा aatension span (लक्ष केंद्रित करण्याचा वेळ ) खूप कमी झाला आहे. असे २०१४ मध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या एका संशोधनात आढळून आले होते. या संशोधनानुसार १३ – १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००० पर्यंत व्यक्तीचा aatension span १२ सेकंद होता जो २०१४ पर्यंत ८.२५ इतका झाला होता. आणि आता तर त्याला अजून १० दहा वर्ष झाली आहेत म्हणजे आता तो अजून कमी असेल.

असे का झाले असेल ?  तर याचे कारण हे technology मध्ये झालेली प्रगती असू शकते हे आपल्याला नाकारता येत नाही. कारण २००० नंतर आपल्याकडे tv केबल, कॉम्पुटर, इंटरनेट, स्मार्टफोन अशा गोष्टी हळू हळू येत गेल्या. याशिवाय मन एकाग्र न होण्याची अजून काही करणे असू शकतात. ती आपण खाली बघू.

मन एकाग्र न होण्याची करणे –

1) मन शांत नसणे –

ज्यावेळी आपले मन शांत असते तेव्हा एकावेळी आपण एकाच गोष्टीचा विचार करत असतो. अशावेळी आपण कोणतेही काम अधिक चांगले करू शकतो. मानलं शांत करण्यासाठी आपण २ – ५ मिनिट खोल श्वास घेण्याची practice करू शकतो. कारण जेव्हा आपले श्वास संथगतीने सुरु असतात तेव्हा आपलं मन आपोआप स्थिर व्हायला लागत.

2) झोप न होणे –

रात्री तुम्ही ६ ते ८ तास झोप घेत नसाल तर दिवस तुम्हाला fresh वाटणार नाही. कोणत्याही कामामध्ये तुम्ही आपलं  १००%  देऊ शकणार नाही. रात्रीची झोप हि तुमच्या मन आणि शरीराला ताजेतवाने करते. म्हणून पुरेशी झोप जरूर घ्या.

3) मोबईल, सोशल मीडियाचा अतिवापर –

मोबाईल हा आजच्या काळात सर्वात मोठा distaction बनला आहे. कोणतेही काम करताना जर मोबईल जवळ असेल तर सारखे तुमचे लक्ष व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर असते. त्यामुळे तुम्ही काव्य तश्या एकाग्रतेने काम करू शकत नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा मोबईल पासून स्वतःला दूर ठेवा.

4) कामात आवड नसणे –

जे काम तुम्ही कोणाच्या सांगण्याने किंवा जबरदस्तीने करत असाल त्यावर तुम्ही concentrate करू शकणार नाही. कारण ते करण्याची तुमची मनापासून इच्छा नसते.

5)मूड चांगला नसणे –

कोणत्याही कारणाने तुमचा मूड चांगला नसेल तर तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकणार नाही.

6) वातावरणाचा प्रभाव –

जर तुमच्या आजूबाजूला गडबड गोंधळ , डिस्टर्ब करणारे वातावरण असेल तर अशा परिस्थितीमध्ये पण तुम्हाला एकाग्रतेने काम करणे कठीण होईल.

एकाग्रता कशी वाढवाल ??

→  हे प्रश्न स्वतःला विचारा –

तुम्ही जे काम करत आहात ते का करत आहात ? हे करून मला काय मिळणार आहे ? कोणी सांगितले म्हणून हे मी करत आहे कि हे करण्याची माझीच इच्छा आहे ? किती महत्वाचे ते आहे ? या प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचाराल तर आपोआपच त्याचे महत्व तुम्हाला समजेल आणि जर खरंच तुमच्या आयुष्यात ते महत्वाचे असेल तर तुम्ही मन लावून कराल. आणि तुम्हाला त्या गोष्टीचे आपल्या आयुष्यातले महत्व समजल्यावर त्याकामाबद्दल तुम्ही अधिक सिरीयस व्हाल आणि मग एकाग्रतेने ते काम करू शकाल.

→ पुरेशी झोप घ्या –

चांगली झोप तुमची कार्यक्षमता वाढवते. दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. झोप पूर्ण झालेली  असेल तर तुमची कार्यक्षमता पण वाढते. कारण शरीराला पूर्ण आराम मिळाला तर ते कोणतेही काम एकरूपतेने पूर्ण करू शकते.

→ एकाच कामाकडे पूर्ण लक्ष द्या –

या क्षणी तुम्ही जे काम करत आहेत त्याकडेच पूर्ण लक्ष असू द्या. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका.  हे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामांचा विचार करा.

→ ध्यान(meditation) जरूर करा –

मेडिटेशनमुळे तुमची एकाग्रता तर वाढतेच त्यासोबत stress , चिंता यांसारखे मानसिक आजार दूर होऊन मन सशक्त बनते. रोज १० – १५ मिनिटे ध्यान जरूर करा. ध्यान हा मनाला सशक्त बनवण्याचा प्रभावी मार्ग आहे. मेडिटेशन मुळे मन शांत पण होते आणि सोबतच ध्यानामुळे एकाग्रता वाढायलापण मदत होते.

→ निरर्थक गोष्टींपासून स्वतलाला वाचवा –

आपला काहीच फायदा नसलेल्या वेब सिरीज, मुव्हीज तसेच सोशल मेडिया वरचे स्टेटस बघण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत असतो. जास्त वेळ अशा गोष्टी बघितल्याने, ऐकल्याने आपल्या मनात डीसटरबंस निर्माण होतो, नेगेटिव्हिटी निर्नाम होते सोबतच आपला वेळ पण यामध्ये वाया जातो. म्हणून मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण मनाला योग्य आणि मत्त्वाच्या गोष्टीच दिल्या पाहिजे जेणेकरून मन शांत राहून आपण एकाग्रतेने आपलं काम करू शकू.

एकाग्रतेसंबंधित काही किस्से –

एकाग्रतेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे दारहसवणारे काही किस्से आपण आत बघू :

पहिला किस्सा स्वामी विवेकानंद यांचा आहे. विदेशात असताना स्वामीजी एकदा एका तळ्याच्या शेजारून जात होते. तिथेच त्यांना काही तरुण तळ्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या अंड्याच्या शेल वर बंदुकीच्या साहाय्याने निशाणा साधण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण कोणालाच निशाणा साधता येत नव्हता. स्वामीजी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले मी प्रयत्न करू का ?? त्यांनी बंदूक स्वामीजींकडे दिली. मग स्वजींनी एकामागून एक असे १२ निशाणे अचूक लक्ष्यावर साधले.

ते बघून त्या मुलांना आश्चर्य वाटले ते म्हणाले, तुम्ही हे कसं केलं ?? त्यावर स्वामीजी म्हणाले, लक्ष्यावर नेम धरताना माझं पूर्ण लक्ष फक्त त्या अंड्याच्या टरफलावरच होत बाकी पूर्ण जगाला मी विसरून गेलो होतो.

दुसरा किस्सा आहे एका दुसऱ्या भारतीयाचा ज्याचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगेल. हा भारतीय ब्रिटनमधल्या त्रैणमधून प्रवास करत होता. अचानक त्याने ट्रेन ची चैन खेचली आणि ट्रेन थांबली. ट्रेन मधले लोक त्याला बोलायला लागले तू असं का केलस ?? यासाठी तुला जेलमध्ये जायला लागू शकत. त्यावर तो भारतीय बोलला, समोर बघा रेल्वे ट्रॅक तुटलेलं आहे. लोकांनी बघितलं तर खर्च ट्रॅक तुटल  होत .

लोकांनी विचारले, ” तुला आधीच कसं समजलं ??”  यावर त्या भारतीयाने उत्तर दिले , ” हे मी एकाग्रतेमुळे करू शकलो. माझं मन शांत आणि एकाग्र होत म्हणूनच ताईंच्या स्पीड आणि मुव्हमेंट मधाळ बदल मला समजला. आणि मी चैन खेचली “. हा भारतीय म्हणजे भारतातला पहिला सिविल इंजिनिअर मोक्षगुंडम विसवेश्वराय हे होते.ज्यांना १९५५ मध्ये भारताच्या विकासासाठी भारतरत्नाने सम्मानित करण्यात आले आणि त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १५ सप्टेंबरला आपण इंजिनिअर्स डे साजरा करतो.

समारोप –

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण बघितले कि एकाग्रता म्हणजे काय आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आपण काय कर्याला हवे. तर तुमचे पण मन सारखे इकडे तिकडे भातकात असेल तर मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करा नक्की फायदा होईल. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते माळ अकंमेंट मध्ये नक्की सांगा आणि अन्य इंटरेस्टिंग लेख वाचण्यासाठी आरोग्यमंत्र २४ ला पुन्हा भेट द्या. हा लेख वाचल्याबद्द्दल खूप खप धन्यवाद !!!!!!

FAQs-

Q1. एकाग्रता कशी वाढवायची?

Ans – एकाग्रता वाढवण्यासाठी –

१)मेडिटेशन आणि ध्यानाचा सराव करा.  २) शांत आणि पुरेशी झोप घ्या.

यांनी तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.

Q2. एकाग्रता या शब्दाचा अर्थ काय आहे? 

Ans – कोणत्याही कामात मन केंद्रित करण्याच्या प्रक्रियेला एकाग्रता म्हणतात.

Q3. एकाग्रता विकसित होण्यासाठी किती वेळ लागतो?

Ans  – आपली एकाग्रता वाढण्यासाठी किंवा विकासित होण्यासाठी ४ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. या कालावधीनंतर तुम्हाला आपल्या एकाग्रततमध्ये फरक दिसू लागेल.

Q4. मानव किती काळ एकाग्र राहू शकतो?

Ans – साधारणतः प्रत्येकाचा एकाग्र रहाण्याचा कालावधी वेगळा असू शकतो. असे असले तरी संशोधनातून असे दिसून आले आहे कि एखादी प्रौढ व्यक्ती सरासरी २० मिनिटांपर्यंतच एका कामावर एकाग्र राहण्यास सक्षम आहे. त्यानंतर त्या कामामध्ये लक्ष देण्यासाठी व्यक्तीला एक्सट्रा एफर्टस घ्यायला लागतात.

Q5. मी माझे लक्ष आणि एकाग्रता कशी सुधारू शकतो? 

Ans – या साठी तुम्ही दररोज शांत बसून डोळे बंद करून आपल्या श्वासांवर आणि आजूबाजूच्या आवाजावर लक्ष केंद्रित करू शकता. रोज ५ ते १० मिनिटे याची प्रॅक्टिस करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top