२ महिन्याच्या बाळाच्या वजन किती असावे – Babies Weight Should Be How Much

आपले बाळ हे निरोगी आणि सुदृढ असावे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. बाळाला थोडं जरी काही झालं तरी आपण काळजी करत असतो. पण जोपर्यंत व्यवस्थित खात असते आणि चांगले खेळत राहते म्हणजे काळजी करण्यासारखे काही नाही. तरी वयानुसार आपल्या बाळाचे योग्य वजन आणि उंची किती असायला हे आपल्याला माहित असणे गरजेचे असते. या पोस्टमध्ये आपण दोन महिन्यांच्या सोबतच १२ महिन्यांपर्यंत बाळाची उंची आणि वजन किती बघणार आहोत.
जन्मानंतर पहिल्या वर्षांमध्ये बाळाचे वजन हे कमी होता कामा नये, ते continue वाढायलाच हवे. निरोगी बाळ म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आपल्याकडे सामान्यतः बाळ हेल्दी असेल तर त्याला निरोगी आणि चांगली तब्येत आहे, असे मानले जाते. पण ती संकल्पना चुकीची आहे. जर बाळाचं वजन ज्या वयामध्ये जेवढे योग्य आहे तेवढ असेल, त्या वयामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज त्याने पाहिजेत त्या करत असेल, सहा महिन्यापर्यंत व्यवस्थित दूध पित असेल त्यानंतर व्यवस्थित वरचं अन्न खात असेल, नेहमी नेहमी आजारी पडत नसेल तर त्याला हेल्दी बाळ म्हणतात.

२ महिन्याच्या बाळाच्या वजन किती असावे

बाळाचे वजन हे बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही हे जाणून घेण्याचे महत्त्वाचे फॅक्टर आहे. नवजात बाळाचे योग्य वजन हे अडीच ते चार किलो पर्यंत असते. डॉक्टरांच्या मते, बाळाच्या वजन हे दर आठवड्याला जवळपास ३०० ग्रामने वाढते. महिन्याला साधारणतः एका किलोच्या आसपास बाळाचे वजन हे वाढत असतं. हे काही प्रमाणात कमी किंवा जास्त असू शकते.

दोन महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे ?

बाळ दोन महिन्याचे झाल्यावर बाळाचे वजन किती असेल, हे पूर्णपणे दोन गोष्टी वर अवलंबून असते. पहिल्या म्हणजे बाळाचा जन्माच्या वेळी वजन किती होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळ आता कशा पद्धतीने दूध पिते आहे. साधारणतः दोन महिन्याच्या बाळाचे वजन हे 4.5kg  7 kg  च्या दरम्यान असते. मुलगा आणि मुलीचा विचार केला तर मुली या वजनाने हलक्या असतात. म्हणजे मुलींचे वजन मुलांपेक्षा कमी असते. त्यांच्या वजनामध्ये साधारणतः 200 ते 300 ग्रामचा फरक असू शकतो. त्यापेक्षा जास्त नाही.

एक वर्षाचा पूर्ण झाल्यावर बाळाचे वजन वाढण्याची गती कमी होते. उंची वाढते बाकीच्या development होतात वजन जास्त प्रमाणात वाढत नाही. वर्षाला दोन ते तीन किलोनेच वाढते. बाळाचे वजन व्यवस्थित वाढतआहे की नाही हे माहित करण्याची एक सोपी पद्धत आहे. ती म्हणजे जन्मानंतर सहा महिन्यात बाळाचे वजन हे जन्माच्या होतं त्याच्या दुप्पट असायला पाहिजे म्हणजे जन्माच्या वेळी तर बाळ तीन किलोचा असेल तर सहा महिन्याचे झाल्यावर ते वजन सहा किलो असलं पाहिजे. त्याचप्रमाणे एक वर्षापर्यंत हे वजन तिप्पट म्हणजे तीन किलो जर जन्माच्या वेळी असेल तर सहा महिन्यांचं झाल्यावर सहा किलो आणि एक वर्षाचे झाल्यावर ते नऊ किलो असायला पाहिजे.

समारोप –

तर आज या पोस्टमध्ये आपण नवजात बाळाचे तसेच २ महिन्याच्या बाळाच्या वजन किती असावे आणि एक वर्षापर्यंत बाळाचे वजन किती असायला पाहिजे यासोबतच बाळाच्या वजनाबद्दल महत्वाची माहिती बघितली. अन्य आरोग्य विषयक पोस्ट असण्यासाठी आरोग्यमंत्र २४ पुन्हा भेट नक्की द्या.

ही पोस्ट पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top