डोकेदुखीचे प्रकार कोणते असतात | What Are Types Of Headaches

डोकेदुखी आपल्या सर्वांनाच कधीतरी उद्भवणाऱ्या समस्या पैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का ही डोकेदुखी वेगवेगळ्या प्रकारचे असते. पण बहुतेक लोकांना माहीत नसते, की आपले डोके का दुखत आहे. WHO च्या अनुमानानुसार सर्व प्रौढ व्यक्तींनी कमीत कमी एकदा डोकेदुखीचा  अनुभव घेतलेला असतो.

डोकेदुखी एक सामान्य तक्रार असली तरी कधी कधी त्रासदायक आणि हतबल करणारी ठरु शकते. डोकेदुखीचे 150 पेक्षा अधिक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. या लेखामध्ये आपण डोकेदुखीचे प्रकार कोणते असतात ? ते बघणार आहोत. इथे आपण डोकेदुखीचे सामान्य प्रकार त्यांची लक्षणे आणि कारणे बघणार आहोत.  त्याआधी आपण बघूया डोकेदुखी मध्ये नेमकं काय होतं.

डोकेदुखीचे प्रकार कोणते असतात

‘ डोकेदुखी ‘ म्हणजे नेमकं काय ?

डोकेदुखी म्हणजे तुमचे डोके चेहरा आणि आसपासच्या भागांमध्ये होणारे दुखणे आहे. जो एखाद्या दबावा प्रमाणे आपल्याला होत असतो. जे सतत कमी किंवा जास्त प्रमाणात दुखत असते. प्रत्येकाच्या डोकेदुखीची कारणे आणि प्रकार हे भिन्न असू शकतात जरी सर्व डोके दुखण्या भयंकर नसल्या तरी काही खूपच वेदनादायक असतात जे कोणत्याही गंभीर समस्येचे लक्षण असू शकतात.

डोकेदुखीचे प्रकार कोणते असतात ?

जसे की मी वर सांगितले डोकेदुखीचे 150 पेक्षा जास्त प्रकार असतात. असे असले तरी आपण कधी चुकीचे दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकतो.

1) प्रायमरी डोकेदुखी     2) सेकंडरी डोकेदुखी

1) प्रायमरी डोकेदुखी –

ही डोकेदुखी कोणत्याही कारणाशिवाय होत असते. न्यूरोलॉजिस्ट तज्ञांच्या मते जास्त आढळून येणारी डोकेदुखी ही प्रायमरी डोकेदुखी असते. जवळजवळ 90% पेशंट्स हे प्रायमरी डोकेदुखीचे असतात. त्यामुळे तुम्हाला होणारे डोकेदुखी ही प्रायमरी असू शकते म्हणून घाबरण्याचे काही कारण नसते.

या प्रायमरी डोकेदुखीचे मुख्य दोन प्रकार आहेत.

1. मायग्रेन (अर्धशिशी) –

या आजाराची सुरुवात साधारणतः 35 ते 40 या वयामध्ये होते. यामध्ये डोक्याचा मेंदूचा अर्धा भाग दुखत राहणे, ठणकत राहणे, आवाज प्रकाश गंध सहन न होणे, डोळ्यांसमोर काजवे चमकल्यासारखे दिसणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे अशा प्रकारची लक्षणे यात दिसून येतात.काही लोकांना डबल डबल दिसणे,  काही क्षणांसाठी बोलता न येणे अशी लक्षणे ही डोकेदुखी सोबत दिसू शकतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

मायग्रेन ही डोकेदुखी ३ तासांच्या वर राहू शकते आणि 3-4 ते 10-15 वेळापर्यंत होऊ शकते. जनरली अंधार केल्याने, आराम केल्याने मायग्रेनची डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. मायग्रेनमध्ये काही वेळा  अत्यंत तीव्र मायग्रेन चे अटॅक येऊ शकतात. ज्यामध्ये डोक्याच्या मागे तीव्र डोकेदुखी होणे, डोक्यावर कुणी काहीतरी जोराजोरात मारत आहे एवढ्या जोरात दुखणे असे होऊ शकते. अशावेळी तुमच्या डॉक्टरांनी prescribed केलेली मायग्रेन अटॅक वरची औषधे तुम्ही प्राथमिक उपचार म्हणून घेऊ शकता. त्यानंतरही जर बरे वाटत नसेल तर आपल्याला डॉक्टर कडे जाणे जरुरी असते.

2. टेन्शन टाईप डोकेदुखी-

या डोकेदुखीच्या प्रकारांमध्ये मायग्रेन सारखी तीव्रता नसली तरी यामध्ये डोकं हे जास्त वेळा पर्यंत दुखत राहते. असे 24 ते 48 तास तर काही जणांना सात दिवसांपर्यंत हलकसं डोक्यामध्ये भारी पण राहतं. यामध्ये जनरली डोक्याच्या मागील भागापासून समोर पर्यंत डोक्यामध्ये भारीपणा, मुंग्या येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

डोकेदुखीच्या या प्रकारामध्ये डोळ्यांसमोर अंधार किंवा फ्लॅश ऑफ लाईट असं काही दिसत नाही आणि ही डोकेदुखी ही ठणकणारी नसते. अत्यंत सामान्य आणि कॉमन असणारा हा आजार आहे. अशा प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर आपल्या मेंदू तज्ञांना दाखवून योग्य ते उपचार तुम्ही घेतले पाहिजे. या प्रकारांशिवाय अजून काही छोटे छोटे डोकेदुखीचे प्रकार आहेत त्यामध्ये डोळ्यांमध्ये पाणी येणे डोळे खूप लाल होणे नाकातून पाणी येणे चेहऱ्यावर सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात.

अशा प्रकारांमध्ये पण तीव्रता खूप कमी असते ही डोकेदुखी फार कमी वेळासाठी होत असते 10-15  मिनिटे ते अर्ध्या तासापर्यंत ही होते त्याच्यावर होत नाही. अशा प्रकारच्या डोकेदुखींना आपण ट्रायजेमनल ऑटोनोमिसफेलेजिया असे म्हणतो.

2) सेकंडरी डोकेदुखी –

ही डोकेदुखी खालील कारणामुळे होऊ शकते.

काही organic brain diseases  जसे मिरगीचे झटके (फिटचे), मेंदूज्वर, डोक्याला मार लागणे, डोक्यातून हेवी ब्लीडिंग होने, शारीरिक आजार जसे उच्च रक्तदाब असणे, डोळ्यांचे आजार, इन्फेक्शन ग्लोकोमा सारख्या आजार यामुळे होणारी डोकेदुखी सेकंडरी प्रकारामधली डोकेदुखी असते.

सेकंडरी डोकेदुखीची काही धोकादायक लक्षणे –

  • सेकंडरी डोकेदुखी मध्ये काही धोकादायक लक्षणे दिसून येऊ शकतात ती आपण बघू.
  • हाता पायाला मुंग्या येणे
  • अचानक हात पाय ढिला पडणे.
  • तोंड वाकडे होणे डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे. बेशुद्ध होणे.

अशी लक्षणे आढळल्यास आपल्याला त्वरित मेंदू तज्ञांना दाखवणे आवश्यक आहे ज्यामध्ये एम आर आय, सी टी स्कॅन द्वारे आपल्याला काही ट्यूमर गाठ, इन्फेक्शन किंवा अन्य काही प्रॉब्लेम असतील तर ते समजेल आणि त्यावर योग्य ते उपचार करता येतील.

डोकेदुखी कोणाला प्रभावित करू शकते ?

डोकेदुखीची समस्या हि  कुणालाही होऊ शकते.त्यामध्ये लहान मुलं किशोरवयीन आणि प्रौढ पण सामील आहेत.जवळ जवळ 96% लोक आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा तरी डोकेदुखीचा अनुभव करतात.

डोकेदुखी ही अनुवंशिक असते का ?

काही वेळा डोकेदुखीचे फॅमिली बॅकग्राऊंड पण असू शकते. विशेष करून मायग्रेन. ज्या लहान मुलांना मायग्रेन असतो त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाला तरी मायग्रेन असतोच. तसेच डोकेदुखी ही काही फॅमिली मध्ये काही अन्य कारणांमुळे पण उत्पन्न होऊ शकते जसे

  • केफिन दारू चॉकलेट आणि पनीर यांसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने.
  • एलर्जीच्या संपर्कामध्ये आल्याने
  • केमिकल परफ्युमच्या उग्र वासामुळे.
  • कंप्यूटर लॅपटॉप समोर बराच वेळ बसल्याने ही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

जर तुम्ही तुमच्या डोकेदुखीचे कारण लवकर ओळखले तर तुम्ही त्यापासून मुक्त ही लवकर होऊ शकता.

डोकेदुखीसाठी डॉक्टर कडे कधी जाल ?

प्रत्येक वेळी होणारी डोकेदुखी ही धोकादायक नसते म्हणून आराम करून, कधी पेन किलर घेऊन त्यावर तुम्ही घरीच उपचार करू शकता पण डोकेदुखी सोबत खालील लक्षणे पण दिसून येत असतील तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची, उपचाराची आवश्यकता असते म्हणून खालील लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.

  • डोकेदुखी सोबत तापही असतो आणि मान ताठ होते.
  • डोक्याला झालेल्या दुखापती नंतर सुरू झालेली डोकेदुखी.
  • अशा प्रकारची डोकेदुखीची बरी होण्यासाठी औषधांच्या जास्त डोसची गरज लागते.
  • एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ होत असलेली डोकेदुखी.
  • नजर, बोलणे आणि वागण्यातील झालेल्या बदलांसंबंधीत डोकेदुखी.

समारोप-

तर मित्रांनो आज या लेखामध्ये आपण डोकेदुखी चे प्रकार कोणते असतात डोकेदुखीची कारणे कोणती असू शकतात आणि कधी डॉक्टरांकडे दाखवले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आणि आरोग्य विषयक अन्य माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top